Sambhajinagar : रेल्वेच्या शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या कामांना गती द्या; हलगर्जीपणा केल्यास निलंबन

Railway
RailwayTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक-५५ येथे होत असलेल्या भुयारी मार्गात अत्यंत कासवगतीने व कामात हलगर्जीपणा होत असल्याचे लक्षात येताच दक्षिण मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शिवाजीनगर भुयारी मार्ग प्रकल्पावर देखभालीची जबाबदारी असणाऱ्या सहाय्यक अभियंता सुमीत राॅय यांची चांगलीच कानउघाडणी केली. त्यात दिलेल्या सुचनांचे पालन करणे, कंत्राटदार कंपनीच्या कामांवर लक्ष नसने, मजुरांकडून कामे तातडीने पूर्ण न करणे आदी ठपके ठेवत सुमीत राॅय यांना चांगलेच धारेवर धरत यापुढे तक्रारी आल्यास थेट निलंबनाची कारवाई करण्यात येईल, अशा कडक शंब्दात त्याला इशारा देण्यात आला.

Railway
Sambhajinagar : अखेर शेकटा शिवारातील 'त्या' शेतकऱ्याला मिळाला हक्काचा रस्ता

शिवाजीनगर रेल्वे भुयारी मार्गाच्या कामात तसेच रेल्वे स्थानकालगत होत असलेल्या पीटलाईनच्या रेल्वेच्या या दोन्ही अत्यंत महत्वाच्या प्रकल्पांच्या रखडलेल्या कामांना तातडीने गती द्या, कामात हलगर्जीपणा नको, अशा कडक सूचना देत का रेल्वे तुमचा वेळेवर पगार करत नाहीका , असा खडा सवाल करत एका रेल्वेच्या प्रकल्प व्यवस्थापक निमचे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. देवळाईचौक ते वाणी मंगल कार्यालय दरम्यान  वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक-५५ येथे भुयारी मार्ग तयार केला जात आहे. दरम्यान जेव्हा जेव्हा "टेंडरनामा" प्रतिनिधी शिवाजीनगर भुयारी मार्गाची पाहणी करायला जातो तेव्हा तेव्हा भुयारी मार्गाचे कामकाजाची देखभालीची जबाबदारी असणाऱ्या सहाय्यक अभियंता सुमीत राॅय कधीच उपस्थित राहत नसल्याचे प्रतिनिधीच्या लक्षात आले.‌ दुरध्वनीवर संपर्क केल्यास पीटलाईच्या प्रकल्पावर असल्याचे खोटे कारण देत सुमीत राॅय यांनी वेळोवेळी खोटे कारण पुढे करत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

Railway
Sambhajinagar : 60 कोटी खर्चूनही कोणी घातला लिंकरोड खड्ड्यात?

दरम्यान, प्रतिनिधिने गत बुधवारी शिवाजीनगर भुयारी मार्गाची पाहणी केली असता सुमीत राॅय कामावर उपस्थित नसल्याचे दिसले.‌दरम्यान प्रतिनिधीकडून तेथील कंत्राटदार कंपनीच्या मजुरांकडे विचारणा केली असता "वो कभी कबार आते" असे उत्तर मिळाले.‌ दरम्यान प्रतिनिधिने शिवाजीनगर भुयारी मार्गाहुन सुमीत राॅय यांना संपर्क केला असता त्यांनी पीटलाईनवर असल्याचं सांगितलं. प्रतिनिधीने शहानिशा करण्यासाठी थेट शिवाजीनगर भुयारी मार्गाहुण रेल्वे स्थानकातील पीटलाईन गाठली दरम्यान सुमीत राॅय प्रकल्पावर नसल्याचे दिसून आले. प्रतिनिधीने संपर्क करून आपण पीटलाईनवर नसल्याची विचारणा करतात सुमीत राॅयची गाळण उडाली व काही मिनिटांत तो हजर झाला. राॅय यांच्या कामकाजासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रतिनिधीने थेठ सवाल करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले. दरम्यान शिवाजीनगर भुयारी मार्गाचे काम तसेच पीटलाईनचे काम पूर्ण करण्यात येणाऱ्या अडचणी जाणून ही कामे  लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com