Sambhajinagar : मोठ्या अपघातानंतरही संभाजीनगरातील 'त्या' पुलाचे काम का रखडले?

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : रामायना कल्चरल हाॅल ते विभागीय क्रीडा संकुल मार्गावर उल्कानगरी येथील नाल्यावरील आरसीसी पुलाचे काम रखडल्याने तीन बुलेटस्वार मित्र पुलासाठी केलेल्या खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाले होते. यावर सर्वप्रथम 'टेंडरनामा'ने वाचा फोडताच कंत्राटदाराने पुलाच्या दोन्ही बाजुंना पत्रे ठोकले. मात्र इतकी गंभीर घटना घडूनही पुलाचे काम थंडावल्याने पादचाऱ्यांना नाल्यावरील चिंचोळ्या बंधाऱ्यावरून नाला ओलांडावा लागतो. वाहन चालकांना दुरचा फेरा मारत वेळ आणि इंधन गमवावे लागत असल्याने व पादचाऱ्यांच्या जिवाशी स्मार्ट सिटी कार्पोरेशन आणि कंत्राटदार खेळत असल्याची प्रतिक्रिया  येथील रहिवाशांनी दिली.

Sambhajinagar
Nashik : रोजगार हमीत उजळमाथ्याने ठेकेदारीला प्रवेश; आमदारांची दीड हजार कोटींची...

जवाहरनगर पोलिस स्टेशन ते टिळकनगर मार्गावरील दक्षिणेकडे उल्कानगरी ते विभागीय क्रीडा संकुलाकडे मोठा रस्ता जातो. वळण मार्गाच्या पुढेच रामायना कल्चरल हाॅल लगत नाला आहे. उल्कानगरी ते विभागीय क्रीडा संकुल यांना जोडणारा नाल्यावरील पूल धोकादायक झाला होता. स्मार्ट सिटी कार्पोरेशनच्या माध्यमातून कंत्राटदार ए. जी. कंन्सट्रक्शन मार्फेत पुलाचे काम मागील दोन महिन्यांपासून रखडले आहे.

पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून नाला ओलांडावा लागत आहे. महिन्याभरापूर्वी याच ठिकाणी तीन बुलेटस्वार पुलासाठी केलेल्या खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाले होते. कंत्राटदाराच्या व स्मार्ट सिटी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मुले खड्ड्यात पडल्याने शहरभर संताप व्यक्त करण्यात आला होता. संबंधित अधिकाऱ्यांवर व कंत्राटदारावर कारवाई व्हावी, गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी देखील नागरिकांनी उचलून धरली होती.

Sambhajinagar
पुणेकरांच्या सोईसाठी वाघोली ते शिरुरपर्यंतच्या उड्डाणपूलाची लांबी वाढणार 4 किमी

मुळात कंत्राटदाराला शहरातील ३१७ कोटीतील १११ रस्ते नऊ महिन्यांतच पूर्ण करण्याची मुदत दिली होती. संपूर्ण कामात केवळ तीन पुलांचा समावेश करण्यात आला होता. आधीच या कंत्राटदाराबाबत शहरभर निकृष्ट कामाचा डंका पिटत असताना त्यात मुदतीत काम पूर्ण झाले नाही. त्यानंतर पुन्हा मुदतवाढ करण्यात आली. याच कामादरम्यान दोन महिने उलटून देखील उल्कानगरी पुलाचे काम झाले नाही. स्थानिक विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी, रुग्णालय, बाजारपेठेत जाण्यासाठी पर्यायी मार्गच शिल्लक नाही. दूरचा फेरा मारावा लागतो आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com