Sambhajinagar : 'अ'स्मार्ट रस्त्यांचे ऑडिट सुरु मग आतापर्यंत केले काय?

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन, महापालिका, आमदार-खासदार यांच्या निधीतून तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व एमएसआरडीसीच्या माध्यमातून निकृष्ट झालेल्या सिमेंट आणि डांबरी रस्त्यांवर "टेंडरनामा"ने सातत्याने प्रहार केला. त्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्मार्ट सिटीच्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यासंदर्भात महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे सीईओ जी. श्रीकांत यांच्यासह नवी दिल्ली येथील गृहनिर्माण आणि नगरविकास विभागाचे सचिव आणि सहसचिव आणि मिशन डायरेक्टर तसेच स्मार्ट सिटीच्या सचिवांना पत्र दिले. अद्याप यापत्राची दखल घेत कंत्राटदारांवर कारवाई झाली नाही. आता जी. श्रीकांत यांनी शहरातील आमदार-खासदार यांच्या निधीसह सर्वच रस्त्यांचे ऑडिट करणार, असे  सांगत आहेत. मग आतापर्यंत काय झोपले होतात काय की यापुढे ही निकृष्ट रस्त्ते होण्याची वाट बघत होता, असा संतप्त सवाल टेंडरनामाच्या वृत्तमालिकेनंतर शहरातील नागरिकातून उमटत आहेत.

Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात MSRDC का झाली नापास?

मुळात टेंडरनामाच्या वृत्तमालिकेनंतर जी. श्रीकांत यांनी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून होत असलेल्या रस्त्यांची पाहणी केली होती. त्यात जवाहरनगर पोलिस स्टेशन ते टिळकनगर रस्त्याची दुरावस्था पाहून अधिकारी, कंत्राटदार आणि प्रकल्प सल्लागाराची कानउघडणी केली होती. पण रस्त्याचा जो खराब भाग आहे तो काढुन नव्याने करा, केवळ खराब भागाचे बिल काढू नका, असे म्हणत कंत्राटदाराला अभय दिले. मात्र या संपूर्ण रस्त्याचे आभाळच फाटले आहे. त्यामुळे ढिगळ लावणार कुठे कुठे, असा प्रश्न आहे. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून होत असलेल्या रस्त्यांसाठी पवईच्या आयआयटी कंपनीची तांत्रिक सल्लागार समिती म्हणून निवड केली आहे.त्यांच्या मार्फत होत असलेल्या रस्त्यांचे ऑडिट करणे हे त्यांचे कामच आहे. यासाठी प्रकल्पाच्या एकून अंदाजपत्रकीय किंमतीपैकी दोन ते अडीच टक्के रक्कम आयआयटीला दिलेली आहे. त्यामुळे रस्त्यांची पाहणी करणे हे आयआयटीच्या पथकाचे कामच आहे.

Sambhajinagar
Mumbai : 'धारावी पुनर्विकास' टेंडरमध्ये सरकारचे मोठे नुकसान; 'या' कंपनीचा उच्च न्यायालयात दावा

आयआयटीचे प्राध्यापक डॉ. धर्मवीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडीट करण्यासाठी व कांचनवाडी येथील रेडीमिक्‍स प्लांटला भेट देऊन रेडीमिक्स काॅक्रीटची पाहणी करणे आवश्यक आहे. त्यांनी रस्ते बांधकाम साहित्याची तयार करण्याची प्रक्रिया तपासणे गरजेचे. रस्त्याचे सँपल क्यूब घेऊन होते. त्या क्यूबला तोडून त्याची मजबूती तपासणे गरजेचे आहे. याशिवाय त्यांनी टेस्टिंग संबंधित कागदपत्रे सुद्धा तपासले पाहिजेत. रस्ता कन्स्ट्रक्शन जॉइंटसाठी एपॉक्सी ट्रीटमेंट करून काम होते किंवा नाही याची देखील तपासणी करणे गरजेचे आहे. तयार होत असलेल्या रस्त्याचा एक सँपल तुकडा काढून त्या नमुन्याची तपासणी आयआयटीच्या प्रयोगशाळेत करणे अपेक्षित आहे. झालेल्या पाहणी व तपासण्याची विस्तृत अभ्यास करून संबंधित तज्ज्ञांनी  स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना अहवाल देणे अपेक्षित आहे त्यानुसारच संबंधित कंत्राटदाराकडून काम करून  घेणे अपेक्षित आहे. मात्र २९ मार्च २०२३ नंतर पथक शहरात रस्त्यांची तपासणी करण्यासाठी आलेच नाही. यावर टेंडरनामा प्रतिनिधीने वृत्तमालिकेनंतर पाठपुरावा सुरु करताच प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी.श्रीकांत यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आयआयटीचे पथक रस्त्यांच्या ऑडीटसाठी येणार असल्याचे सांगितले. मात्र पथक अद्याप आलेले नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com