Sambhajinagar : वीर सावरकर उड्डाणपुलाखाली कायापालट; इतका खर्च

Bridge
BridgeTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावरील उड्डाणपुलाखाली काही भागात सुशोभीकरण करून नवनिर्माण करण्यात येत आहे. याकामावर मराठवाडा मुक्ति संग्राम अमृत महोत्सवानिमित्त व मंत्रिमंडळाच्या बैठकीनिमित्त नगर विकास विभागाने शहर सुशोभिकरण व पायाभुत सुविधांच्या विकासासाठी तब्बल ४० कोटी रूपये छत्रपती संभाजीनगर महापालिकेला दिले होते. यात एकून तीस विकासकामांचा समावेश होता. मात्र यातील काही महत्वाची व मोठी कामे अजूनही बाकी असल्याने महापालिकेकडून ती आता पूर्णत्वास नेली जात आहेत.

Bridge
Sambhajinagar : कार्यकारी अभियंत्यांकडून कानउघडणी होताच खड्डे भरण्याची लगीनघाई

याच निधीतून आता वीर सावरकर उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणावर सुशोभीकरणाचे काम महापालिकेने सुरू केलेले आहे. याकामावर महापालिकेने तब्बल ४८ लाख ८ हजार ६१४ रूपयाचे टेंडर मंजूर केले आहे. शहरातील सिध्दीकी जलीलउद्दीन मोईजुद्दीन या कन्स्ट्रक्शन कंपनीने २०.२३ % कमी दराने याकामासाठी त्याने सहभाग नोंदवल्याने त्याला हे  मिळाले असून  २६ सप्टेंबर रोजी दिलेल्या कार्यारंभादेशानुसार महिन्याभरात त्याला संरक्षण भिंत व प्रवेशद्वार उभे करण्याची मुदत दिलेली आहे. शहरातून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावरील सिडको एन-दोन समोरील सर्व्हिस रस्त्यालगत एक वाईन शाॅप आहे. येथुन वाईन खरेदी करून काही तळीरामांची  दररोज सकाळपासूनच ते रात्री उशिरापर्यंत उड्डाणपुलाखाली शाळा भरत असे. दरम्यान येथे प्लास्टीक ग्लास आणि खाद्यपदार्थांच्या प्लास्टीक पिशव्यांचा मोठा कचरा पसरत असे. शिवाय दैनंदिन उपक्रमादरम्यान तळीराम पुलाखालीच उघड्यावर शौच करत असल्याने महामार्गावरील प्रवाशांना विशेषतः महिला प्रवाशांची मोठी कुचंबना होत असे. अगदी व्हीआयपी मार्गावरील उड्डाणपुलाखालील हा प्रकार पाहून राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मंत्रीमहोद्यांसह केंद्रीय मंत्री व सरकार दरबारी बड्या अधिकाऱ्यांसह न्यायमुर्तींना देखील धक्का बसत असे. याच उड्डाणपुलाखाली सुमनांजली रूग्णालयासमोरील भाग व सिडको एन -  दोन महाजन काॅलनीतील दुसरा भाग वगळता सुरक्षित जाळ्या लावून शहरातील विकासकांच्या मदतीने  मोठ्या प्रमाणावर सुशोभीकरण केले आहे. मात्र महाजन काॅलनीसमोरील सुशोभीकरणाअभावी या भागाला बकालपण आले होते.

Bridge
Toll Plaza : ...तर 'या' टोल नाक्यांवर आता टोल माफ!

तळीरामांमुळे कचऱ्याचे ढीग दिसून येत असत, त्यामुळे उड्डाणपुलाखाली एकीकडे आल्हाद, तर दुसरीकडे बकालपण अशी स्थिती दिसून येत होती. त्यामुळे महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत व शहर अभियंता आविनाशराव देशमुख यांनी वार्ड कार्यालय झोन क्रमांक - ७ मार्फत याकामासाठी ४८ लाख ०८ हजार ६१४ रूपयांचे अंदाजपत्रक बनवले. टेंडर क्रमांक २०२३ - एमएमसीए ९४०७७० - ३ नुसार टेंडर प्रसिद्ध केले होते. सदर कामासाठी चार कंत्राटदार कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यात शहरातील सिध्दीकी जलीसउद्दीन मोईजुद्दीन या कंत्राटदाराने २०.२३ इतक्या कमी टक्के दराने टेंडर भरल्याने अखेर त्याला हे काम देण्यात आले   आहे. यात दोन्ही बाजुने शंभर मीटर लांबीची विटांची सुरक्षाभिंत आणि दोन मुख्य प्रवेशद्वार सुशोभीकरण आदी स्थापत्य कामे आटोपून येथील उड्डाणपुलाखालील बकाल जागेचे चांगल्या पध्दतीने सुशोभिकरण करून  नवनिर्माण करण्यात येत असल्याने प्रवाशांनी विशेषतः महिला प्रवाशांकडून महापालिका आयुक्त जी.श्रीकांत व शहर अभियंता आविनाशराव देशमुख यांचे अभिनंदन केले जात आहे. सदर कामाची क॔त्राटदारासह प्रतिनिधीने पाहणी केली असता पैठणच्या विटा , वाळू व दगड खरेदी केली जात असून स्कॅश सॅन्डमध्ये मानकाप्रमाणे सिमेंट टाकले जात आहे. दोन्ही बाजूने शंभर मीटर अंतरात भिंत आणि प्रत्येक तीन मीटर अंतरात आडवा व ऊभा काॅलम असल्याने भिंतीचे काम देखील मजबुत होताना दिसत आहे. त्यामुळे इतक्या कमी टक्के दराने हे काम ठेकेदाराला पडवणार काय ? किंवा आधीच अंदाजपत्रक फुगवले की काय हा संशोधनाचा विषय आहे. 

Bridge
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील 'त्या' कंत्राटदाराला 'जोर का झटका'? BMC ने उचलले मोठे पाऊल

पण, अजूनही महामार्गांवर...

पण, अजुनही महामार्गावर सुमनांजली हाॅस्पिटल ते देवगिरी बँकेसमोरील उड्डाणपुलाखालील एका भागात अशाच पद्धतीने सुशोभिकरण करणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेकडे निधीचा तूटवडा असल्याने येथील रस्त्यालगत बड्या उद्योजकांनी पुढाकार घेतल्यास व सुशोभिकरणासाठी हातभार लावल्यास त्यांच्या व्यापार वृद्धीत भर पडेल. वीर सावरकर उड्डाणपूल उभारण्यात आल्यानंतर या पुलाखालील जागेवर सुशोभीकरण करण्याचा एमएसआरडीसीला विसर पडला. महापालिकेने काही विकासक व उद्योजकांच्या पुढाकाराने पुलाखालील खुल्या जागेवर उद्यानाच्या प्रतिकृती, सुंदर देखावे साकारण्यात आले. मात्र, शहरातील काही उड्डाणपुलाखालील बऱ्याच जागांवर आजही कचऱ्याचे ढीग व घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. काही ठिकाणे वाहनतळच बनल्याने तिकडे सुशोभीकरणाचे नवनिर्माण करण्यासाठी झोन अधिकाऱ्यांच्या लक्षातच येत नसल्याचे दिसून येत आहे, याकडे देखील महापालिका प्रशासकांनी व शहर अभियंत्यांनी तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे.

Bridge
Nashik : पेलिकन पार्कच्या टेंडरमध्ये कमी दराने काम करणारे ठेकेदार केले अपात्र

याकडे तातडीने लक्ष द्या...

याच महामार्गावर मुकुंदवाडी चौकाच्या दक्षिण बाजूस असलेल्या सरकारी रस्त्याच्या जागेवरील मास विक्रेत्यांचे अतिक्रमण काढून रस्ता मोकळा केल्याचे कौतूकास्पद धाडस् महापालिकेने केले. मात्र अद्याप येथील अतिक्रमण काढण्याबाबत कारवाई अर्धवट आहे. त्यात एनएचएआयच्या अभियंत्यांनी याच चौकात बिनडोकपणे आवश्यकता नसताना चुकीच्या ठिकाणी तीस लाखाचा पादचारी ओव्हरब्रीज बांधून सर्व्हिस रस्ता अडवला आहे. यापुलाचा गत तीन वर्षात एकाही पादचार्याने उपभोग घेतला नाही. पुलावर दिवसरात्र तळीरामांच्या पार्ट्या सुरू असतात. शिवाय पुलांच्या पायर्यांखालच्या मोकळ्या भागात या ठिकाणी काही युवक, नागरिक गाड्या थांबवून या ठिकाणी झुरके व नशा करीत असल्याचे दिसून येत आहे. अत्यंत वर्दळीच्या या महामार्गावरील सर्व्हिस रस्त्यावरील अतिक्रमण महापालिकेने काढले. मात्र रस्ता रूंदीकरण व फुटपाथ तसेच सुशोभिकरणाचे काम गत सहा महिन्यापासून रखडल्याने या ठिकाणी हे अनेक लहान-मोठे अपघात होत आहे. येथील मोठ्या प्रमाणावरील वाहतुकीमुळे अनेक नागरिकांना चिकलठाणा औद्योगिक व वसाहत व जालन्या दिशेने इच्छा असूननही रस्त्याच्या विरूध्द दिशेचा वापर करावा लागतो. याच महामार्गातील काही अंतरावर इतक्याच तत्परतेने हे काम देखील महापालिकेने केले तर त्याचा आनंद नागरिकांना द्विगुनित आनंद  लुटता येऊ शकेल. कारण मुकुंदवाडी चौकात वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने वाहतूकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर होते. प्रत्येकाला महामार्ग ओलांडताना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो.याकामासाठी देखील महापालिकेने मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवानिमित्त मिळावेल्या निधीतून ७० लाखाचे पॅकेज जाहीर केले आहे.

वाहनतळाचे स्वरूप

सद्यःस्थितीत महापालिकेने अर्धवट केलेल्या कारवाईनंतर  येथील खुल्या जागेला वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक लहान-मोठी वाहने या ठिकाणी उभी केली जातात. त्याचबरोबर या जागेचा काही वापर काही जणांकडून कचरा टाकण्यासाठी केला जात असल्याने येथील काही भागाला अक्षरशः कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या जागेचा वापर रात्री दुकाने बंद झाल्यावर बऱ्याचदा स्वच्छतागृह म्हणूनसुद्धा केला जात असतो. त्यामुळे या जागेचे तातडीने रूंदीकरण केले, तर ते निश्चितच लोकोपयोगी ठरू शकेल, असे नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com