Sambhajinagar : कारभाऱ्यांचा जुगाड; 10 वर्षापासून 'या' जलकुंभाला..

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : दहा वर्षापूर्वी अवकाळी पावसात क्रांतीचौक येथील जलकुंभाचा स्लॅब कोसळला. अर्धवट स्थितीत कापून काढण्यात आला. आतील मलब्याची सारवासारव केली. जलकुंभाचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्यात जुना स्लॅब कापून दुसरा नवा स्लॅब टाकण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले. टेंडर प्रसिद्ध करण्यात आले. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून या जलकुंभाला छताचाच आधार आहे. यामुळे स्लॅबचा निधी गेला कुणीकडे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. धक्कादायक म्हणजे जलकुंभाच्या अशा उघड्या अवस्थेमुळे अकरा हजार नळकनेक्शनधारकांच्या जीवाला धोका असल्याची शक्यता नाकारता येत नाही. टेंडरनामाकडे आलेल्या तक्रारीवरून प्रतिनिधीने स्पाॅट पंचनामा केला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Sambhajinagar
BMC: दर्जेदार रस्त्यांसाठी कठोर अंमलबजावणी; सबटेंडर, जेव्हीला मनाई

क्रांतीचौक येथे एकुण चार जलकुंभ आहेत. यात १५ लाख लिटरच्या जलकुंभाचे बांधकाम हे १९९० मध्ये झालेले आहे. ११ लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे बांधकाम १९६० मध्ये झाले आहे. ५ लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे बांधकाम १९७९ मध्ये झाले आहे. २० लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे बांधकाम हे २००१ मध्ये झालेले आहे. शहर पाणी पुरवठा योजनेअंतर्गत क्रांतीचौक येथेच मुख्य योजनेच्या ७०० व १४०० मीमी व्यासाच्या जलवाहिन्यातून पाणीपुरवठा होऊन क्रांतीचौक येथील  विविध क्षमता व उंचीच्या जलकुंभ, संप तसेच पंपगृहात साठवले जाते. दोन्ही योजनेद्वारे शहराकरिता येणारे पाणी येथुनच वितरीत करण्यात येते.

Sambhajinagar
Mumbai : मनपातील रस्त्याच्या कामांचे टेंडर विहित पद्धतीनेच : सामंत

याच ठिकाणी तत्कालिन नगर परिषदेच्या काळातील १९६० मध्ये बांधलेला जमीनस्तरावरील ११ लाख लिटरचा जलकुंभ आहे. वयाची ६३ वर्ष पुर्ण करणार्या या जलकुंभाची कार्यक्षमता संपलेली असताना अद्यापही तो कार्यान्वित ठेवला आहे. या जलकुंभातून रमानगर, कुशलनगर, पटेलगल्ली, सिंधी काॅलनी, रोकडीया हनुमान काॅलनी, जुना मोंढा व अन्य वसाहतींना पाणीपुरवठा करण्यात येतो. दहा वर्षांपूर्वी मुसळधार पावसात या जलकुंभावरील स्लॅब पडला.  नागरिकांना दुषित पाणीपुरवठा होऊ लागला. या संदर्भात संतप्त नागरिकांनी महापालिका प्रशासनातील पाणीपुरवठा विभागातील कारभार्यांना जाब विचारल्यावर यंत्रणा जागी झाली. माजी  उपमहापौर संजय जोशी यांनी स्ट्रक्चरल इंजिनिअर रवींद्र बाभोळे यांच्यासह  महापालिकेतील कारभार्यांना सोबत घेऊन जलकुंभाची पाहणी केली होती. दरम्यान जलकुंभात थेट  क्लोरीनची खोली व भिंत पडल्याचे दिसताच जोशी यांनी कारभार्यांवर संताप व्यक्त केला होता. या पाहाणीनंतर जलकुंभात पडलेला मलबा काढण्याचे काम रात्रीतून करण्यात आले होते.

Sambhajinagar
Nashik : महापालिकेत टीसीएस राबवणार 706 पदांची नोकरभरती

या धोकादायक जलकुंभाचा स्लॅब हा दहा हजार चौरस फुटाचा आहे.त्यापैकी जवळपास दिड हजार चौरस फुटाचा स्लॅब कोसळला आहे. शिल्लक राहीलेला स्लॅब देखील फारच कमकुवत झाला आहे. तो पूर्ण कापून काढणे व दुसरा नवीन स्लॅब टाकणे गरजेचे आहे, असे म्हणत ३ ऑगस्ट २०१३ रोजी स्लॅब टाकण्याचे काम लवकरात लवकर हाती घेण्याची घोषणा देखील केली गेली. या कामासाठी क्रांतीचौक जलकुंभावरील पाणीपुरवठा आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर  स्लॅब तोडण्याचे व नवीन स्लॅब टाकण्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञांमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल मागवला. मात्र गत दहा वर्षापासून जलकुंभावर स्लॅब टाकलाच नाही. 

Sambhajinagar
Sambhajinagar : आरोग्य केंद्राची अवस्था रोगापेक्षा इलाज भयंकर

हजारो नळधारकांना धोका

क्रांतीचौक जलकुंभावरून सिंधीकॉलनी, भानुदासनगर, कैलासनगर, बालाजीनगर, महूनगर, रोकडीया हनुमान कॉलनी, मोंढा परिसर, अजबनगर या भागाला पाणी पुरवठा होतो. या संपूर्ण भागात सुमारे अकरा  हजार नळ कनेक्शन्स आहेत. उघड्या जलकुंभातून  पाणीपुरवठा होत असल्याने अद्यापही या भागात दुषित पाण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आहेत.

असा केला पालिकेने जुगाड

छत कोसळल्यामुळे उघड्या पडलेल्या जलकुंभावर तात्पुरत्या स्वरूपाचे छत टाकण्याचा निर्णय आजही कायम असल्याचे दिसते. ढासळलेला भाग पत्र्यांनी झाकून ठेवण्यात आला आहे. पाणी दुषित होऊ नये म्हणून जलकुंभातील पाण्याला क्लोरिनचा जास्तीचा डोस देण्याचा दावा महापालिका करीत असली तरी पाण्यात अति क्लोरिनचा मारा देखील जीवास घातक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.याउलट यंत्रणेने क्लोरिनवर अधिक खर्च न करता तितक्या पैशात छतावर स्लॅब टाकता आला असता असे देखील मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मात्र कारभार्यांनी गत दहा वर्षांपासून या जीवनावश्यक बाबीकडे दुर्लक्ष केले आहे. 

Sambhajinagar
Sambhajinagar : 'या' रस्त्याचे काम कासवगतीने; अधिकारी नाॅट रिचेबल

कारभाऱ्यांचा उरफाटा कारभार

एकीकडे गेल्या दहा वर्षांपासून येथील जलकुंभाचा कोसळलेला स्लॅब दुरूस्त न करता येथील १५ व २० लाख लिटरच्या जलकुंभातून इतर जलकुंभ व वसाहतींना होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा वेग वाढविण्यासाठी या दोन्ही जलकुंभामध्ये ३३ बाय १२ चौमी जागेपेकी २५ बाय ८ मी. शिल्लक जागेत ५ लाख लिटर क्षमतेची साठवण टाकी व पंपगृह तसेच आवश्यक क्षमतेच्या पंपिंग मशिनरीची उभारणी करण्याचा प्रस्ताव तयार केला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या २०१६-१७ नुसार ५ लाख लिटर क्षमतेचा प्रि फॅब्रिकेटेड संप, आरसीसी बांधकामातील पंपगृह त्यासाठी आवश्यक जलवाहिनी व विविध व्हाॅल्वह व अनुषंगीक कामांचे ४६ लाख ७१ हजार ८४९ रूपयाचे अंदाजपत्रक तयार केले. त्याला १४ जुन २०१८ रोजी सभागृहाने मान्यता दिल्याचे दिसून येत आहे. मात्र प्रतिनिधीच्या पाहणीत हे काम कुठेही दिसून आले नाही. याउलट छत फाटलेल्या जलकुंभालगत पंपगृहाची भयानक अवस्था झाल्याचे दिसून आले. जुना पंपगृह जलकुंभावर कोसळल्यास दुष्काळात तेरावा महिना होणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com