Sambhajinagar:महापालिकेतील 1000 कोटीच्या TDR घोटाळ्याची चौकशी कधी?

Aurangabad
AurangabadTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : महापालिकेतील बहुचर्चित एक हजार कोटीच्या टीडीआर घोटाळ्याची चौकशी गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित आहे. या घोटाळ्यातील मास्टरमाईंड डी. पी. कुलकर्णी यांच्यासह तीन बड्या अधिकाऱ्यांना  तत्कालीन महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांनी निलंबित केले होते. या दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करायचे आदेशही काढले होते. गुन्हे दाखल करण्यास चालढकल करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्यामार्फत वठणीवर आणले होते. त्यानंतर या बहुचर्चित घोटाळ्यातील महाघोटाळेबाजांची चौकशी सुरू करण्यात आली होती. मात्र काही राजकीय पुढाऱ्यांनी एकतेची वज्रमुठ बांधत अधिकाऱ्यांवर दबाब आणला आणि चौकशी थांबवली. परिणामी या प्रकरणात घोटाळेबाजांवर गुन्हे दाखलच न झाल्याने ते अद्यापही मोकाट आहेत.

Aurangabad
MahaRERA: मुंबई, पुण्यातील बिल्डर्सला दणका; तब्बल100 कोटींची वसुली

महापालिकेच्या नगररचना विभागाने मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस टीडीआर दिल्याची तक्रार एका आरटीआय कार्यकर्त्याने तत्कालीन महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांच्याकडे केली होती. या प्रकरणी तक्रारीत नमुद मुद्दे आणि त्यासोबत त्याने माहिती अधिकारात मिळवलेल्या काही टीडीआर प्रकरणांची कागदपत्रे याची शहानिशा करण्यासाठी बकोरीयांनी चौकशी समिती नेमली होती. त्यात प्राथमिक चौकशीत प्रकरणात सत्यता आणि गांभीर्य आढळून आले होते. त्यानंतर या प्रकरणी जबाबदार असलेले नगररचना विभागाचे सहाय्यक सहसंचालक डी. पी. कुलकर्णी यांच्यासह तीन अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले.

Aurangabad
369 कोटींचे अपार्टमेंट अन् 19 कोटी मुद्रांक शुल्क; कोण आहे मालक?

बकोरीयांनी टीडीआर प्रकरणी चौकशी सुरू करताच या महाघोटाळ्यात खिसे गरम केलेल्या नगर रचना विभागातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी तसेच खिसे फुल करणारे बडे बांधकाम व्यावसायिक यांचे धाबे दणाणले. सहाय्यक संचालक कुलकर्णींसह तीन बड्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या या धक्कादायक कारवाईनंतर २५ एप्रिल २०१६ रोजी बकोरीयांनी नगररचना विभागातील डी. पी. कुलकर्णीसह इतर अधिकाऱ्यांवर २४ तासात फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. बकोरीयांच्या आदेशानंतर २८ एप्रिल २०१६ रोजी महापालिकेचे संबंधित प्राधिकृत अधिकारी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले झाले.

Aurangabad
Mumbai: गडकरींकडून घोषणांचा पाऊस! 15000 कोटीच्या प्रकल्पांची घोषणा

पोलिसांची चालढकल

टीडीआर प्रकरणात गुन्हे दाखल करण्यासाठी गेलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यांना तेथील अधिकाऱ्यांचे आधीच राजकीय आणि प्रशासकीय कान टोचल्याने अधिकाऱ्यांनी आधीच फाजलपुरा येथील टीडीआर प्रकरणात अगोदरच एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच विषयात गुन्हा दाखल केलेला असेल तर दुसरा गुन्हा कसा दाखल करायचा, असा प्रश्न उपस्थित करत उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर गुन्हे दाखल करण्यासाठी गेलेले महापालिकेचे प्राधिकृत अधिकारी माघारी फिरले.

Aurangabad
Sambhajinagar : स्नेहनगर शासकीय वसाहत की कोंडवाडा?

दोन सिंघम फेम अधिकाऱ्यांची चर्चा

दरम्यान, पोलिस अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेले कारण प्राधिकृत अधिकाऱ्यांनी बकोरीयांना कळवताच त्यांनी या प्रकरणात तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्यासोबत सखोल चर्चा केली होती. अमितेशकुमार यांनी टीडीआर घोटाळ्याची चौकशी करण्यास सहमती दर्शवली. या घोटाळ्याची सर्व कागदपत्रे पोलिसांकडे स्वाधीन देखील करण्यात आली होती.  त्यानंतर टीडीआर घेणारे आणि देणारे यांचा नेमका उद्देश काय होता,  हे तपासण्यात येणार होते. कोणी कोणत्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बोगस कागदपत्रांचा आधार घेऊन टीडीआर घेतले, यामागे त्यांचा उद्देश गुन्हेगारी स्वरूपाचा होता काय. पोलिस या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून कोणत्या प्रकरणात गुन्हे दाखल करता येऊ शकतात हे सांगणार असल्याचे बकोरीयांनी जाहीर देखील केले होते.

Aurangabad
Sambhajinagar : 'या' प्रकल्प कार्यालयाकडे महापालिकेची पाठ का?

बकोरीयांची बदली, दोषींना बढती

बकोरीयांची पुढे बदली झाली. याऊलट ज्या अधिकाऱ्यांना बकोरीयांनी निलंबित केले होते. ज्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा, असे आदेश काढले होते. ज्यांची या महाघोटाळ्यात चौकशी सुरू केली होती. त्याच अधिकाऱ्यांना महापालिकेत बढती मिळाली. विशेष म्हणजे या प्रकरणातील मास्टरमाईंड डी. पी. कुलकर्णी यांची चक्क अतिरिक्त आयुक्त म्हणून सेवा निवृत्ती झाली. यातील काही अधिकारी सद्यःस्थितीत महापालिकेत उच्च पदावर आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com