Sambhajinagar : जलकुंभाचे काम दोन वर्षांपासून रखडले

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : नवीन पाणीपुरवठा योजनेतून माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांच्या पाठपुराव्याने महापालिकेने निश्चित केलेल्या व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मंजुर केलेल्या चिकलठाणा परिसरातील सावित्रीनगरातील जलकुंभाचे काम दोन वर्षांपासून रखडले आहे. जलकुंभाचे काम रखडल्यामुळे चिकलठाणासह पुष्पकगार्डन, सावित्रीनगर, चौधरी काॅलनी व महापालिका हद्दीतील सावंगी बायपास रोडवरील विस्तारित भागांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.

Sambhajinagar
Nashik : निधी पुनर्नियोजनाला ठाकरे गटाच्या आमदार दराडेंचाही आक्षेप

शहरातील पुर्वभागाला भागाला सिडको एन-पाच जलकुंभातून पाणीपुरवठा केला जातो. चिकलठाणा परिसरातील शहरातील महापालिका हद्दीच्या या शेवटच्या टोकावरील भागाला व इतर विस्तारित भागाला पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होतो. याशिवाय चिकलठाणा परिसरातील सावंगी बायपास भागातील विस्तारीत भागाचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांनी छत्रपती संभाजीनगर नवीन पाणी पुरवठा  योजनेतून कोट्यावधी रुपये निधी मंजूर करून जलकुंभाच्या कामाला मंजुरी मिळवून आणली होती. त्यावेळी महापालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला चिकलठाण्यातील आठवडी बाजारात जलकुंभाचे काम हाती घेण्यात यावे याबाबत कळविण्यातआले होते. यासाठी जीव्हीपीआर कंपनीला त्याच ठिकाणी जागाही निश्चित करून दिली होती. मात्र, तीन दोन काळ लोटूनही या जलकुंभासाचे अद्याप जमीनस्तरावरील आडव्या बीमचे देखील  काम पूर्ण करण्यात आलेले नाही. सध्या २० ते २५ फुट खोल खोदकाम करून आडवे बीमचे कामंच रखडलेले आहे.  ठेकेदाराकडून काम पूर्ण केले जात नसल्याने लाेकभावना तीव्र आहेत.

Sambhajinagar
Mumbai : 'बेस्ट'चे 150 वातानुकूलित डिझेल बसेससाठी टेंडर

जल 'जीवन' खाबुगिरी नको

गेल्यातीन दोन वर्षांपासन मंजूर झालेले हे काम केवळ टक्केवारीमुळे थांबले आहे. महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचा ठेकेदारावर कुठलाही वचक नाही. शहरातील महत्त्वाकांक्षी समजल्या जाणाऱ्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम योग्यरित्या पार पाडावे यासाठी खास विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती देखील शहरातील रखडलेल्या या योजनेवर ठोस कारवाई करायला तयार नाही. प्रशासनाने देखील निष्काळजीपणाचे पांघरून बाजूला सारून काम करणे अपेक्षित आहे. चिकलठाणा परिसरातील विस्तारित भागाना पाणीपुरवठा करण्यासठी या जलकुंभाचे काम तातडीने करणे आवश्यक आहे. मात्र, काम रखडल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. या जलकुंभाचे काम तातडीने पुर्ण व्हावे यासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा आमदारांच्या सुचनांकडेही दुर्लक्ष केले जाते. याअर्थी लोकशाहीत लोकप्रतिनिधींच्या शंब्दांनाही किंमत नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो.

Sambhajinagar
Sambhajinagar : जीव्हीपीर कधी सुधारणार; जलवाहिनीचे काम रखडले

चिकलठाण्यातील जलकुंभाच्या रखडलेल्या कामासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रतिनिधीने  सविस्तर माहिती घेण्यासाठी स्पाॅट पंचनामा केला असता तिथे थेट आठवडी बाजाराच्या मध्यभागी भयंकर चित्र दिसले. ५० ते ६० फुट महाकाय खड्डा खोदून जलकुंभाचे काम हाती घेतले गेले. मात्र आडवे बीम बांधुन त्यावर सेंट्रीगचे आच्छादन देउन पुढे काॅलमचे काम तसेच राहीले. धक्कादायक म्हणजे येथील सुरक्षारक्षकाला माहिती विचारली असता, कामावरील मजुरांना अंत्यल्प पगार आणि तोही वेळेवर  मिळत नसल्याने मजुर काम सोडून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. संपूर्ण शहरातील जलकुंभांच्या बाबतीत तीच ती कारणे पुढे येत आहेत.

Sambhajinagar
Sambhajinagar : अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीपर्यंत धोकादायक वाट

सर्वसामान्यांना झळ

विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि माजी मंत्री राहिलेले आमदार बागडे यांच्या फुलंब्री मतदार संघातील या भागातील मतदारांना खुश करण्यासाठी महापालिका प्रशासनाने चिकलठाण्यातील आठवडी बाजाराची जागा निश्चित करून जलकुंभाचे काम हाती घेतले होते. मात्र, या महाकाय खड्ड्यात नुसते आडवे बीम टाकुन हे काम पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. मजुरांचे पगार अन् बांधकाम साहित्य खरेदीकरण्यासाठी पैसे नसल्याचे कारण पुढे करत हे काम थांबल्याने याची झळ मात्र सर्वसामान्यांना बसणार आहे. काम अपूर्ण असल्याने या योजनेत सर्वसामान्यांनी दुष्कळाचा फटका फटका बसून झळ सोसावी लागण्याची शक्यता जास्त आहे.

दोन्ही पर्याय झाले बंद

चिकलठाणा परिसराला पाणीपुरवठा करण्यार्या मुर्तिजापूरच्या जलकुंभाची क्षमता  पाहून आठवडी बाजार येथील सावित्रीनगरात काही विस्तारित भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी जलकुंभ बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. पाइपलाइनचे कामही करण्यात आले आहे. मात्र जलकुंभाचेच काम एक टक्काही पुर्ण नसल्याने शाश्वत पाणीपुरवठा होण्याचे मार्गही बंद झाला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com