Sambhajinagar : बाळापूर रेल्वेगेट ते बीड बायपास रस्त्याचे काम कासवगतीने

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील मुकुंदवाडी-बाळापुर रेल्वेगेट क्रमांक-५६ ते बीड बायपास या रस्त्याचे कासवगतीने काम सुरू आहे. कंत्राटदाराने ड्रेनेजलाईनवरील चेंबरचे बांधकाम केले. संपूर्ण रस्ता खोदून त्यावर खडीकरण मजबुतीकरण केले. मात्र पुढील काम बंद केल्याने जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरातील 200 कोटींचा 'हा' महत्वाचा बायपास कधी पूर्ण होणार?

यासंदर्भात प्रतिनिधीने माजी नगरसेविक मोहन साळवे यांना विचारले असता महापालिकेकडे कंत्राटदाराचे ९ कोटी रूपये थकल्याने पैसेच नसल्याने त्याने काम थांबवले, असे त्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडे विचारले असता गेल्या महिन्यात आम्ही रस्त्याची पाहणी केली होती. आमच्याकडे काम चालू असल्याचे फोटो असल्याचा दावा अधिकार्यांनी केला आहे. मात्र प्रतिनिधीने मंगळवारी स्पाॅट पंचनामा करत रस्त्याची पाहणी केली असता गत सहा महिन्यांपासून काम बंद असल्याचे म्हणत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. रस्त्याच्या मधोमध चेंबरवर आल्याने याभागात रखडलेल्या रस्त्यावर वाहतुक कोंडी होत असल्याचे व अपघाताला चेंबर आमंत्रण देत असल्याचे दिसून आले. गेल्या तीस वर्षांपासून दुरूस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या बाळापुर रेल्वेगेट क्रमांक - ५६ ते बीड बायपास रस्त्याच्या कामाला वर्षभरापूर्वी सुरुवात झाली.‌ महापालिकेने‌ दिड किलोमीटर अंतराच्या या रस्त्यासाठी दोन कोटी रुपयाचा भरभरून निधी मंजूर केला. वर्षभरापूर्वी कंत्राटदाराने उत्साहात काम सुरू केले. मात्र रस्त्याच्या मधोमध ड्रेनेजलाईन टाकुन त्यावर चेंबर बांधले. त्यानंतर संपुर्ण रस्ता खोदून त्यावर खडीकरण मजबुतीकरण करून काम अर्धवट सोडले. सद्यस्थितीत रस्त्याची दुरवस्था झाली असून त्यात रस्त्याच्या मधोमध चेंबर उंच झाल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे जिकीरीचे बनले आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : 'त्या' प्रकल्पांची किती वर्षे प्रतीक्षा करावी?; बिडकीनमध्ये नुसतीच उद्योगांची घोषणा

रस्त्याच्या रुंदीकरण करुन सिमेंट रस्त्याचे काम सुरू झाल्याने आसपासच्या वसाहतीतील नागरिकांसह प्रवास वर्गातून समाधान व्यक्त होत असतानाच मागील सहा महिन्यांपासून हे काम संथ गतीने सुरू आहे . रस्त्याच्या बांधकामासाठी निधी नसल्याचे म्हणत कंत्राटदाराने संपूर्ण रस्त्यावर खडी पसरवली असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात नसल्याने जनतेतून नाराजी व्यक्त होते आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील बीड बायपास परिसरातील सातारा, देवळाई, बाळापुर, गांधेली, आडगाव, झाल्टा, सुंदरवाडी, निपाणीसह पंचक्रोशीतील अनेक गावांना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. गेल्या वर्षभरापासून शिवाजीनगर रेल्वेगेट क्रमांक - ५५ येथे भुयारी मार्गाच्या बांधकामासाठी रस्ता बंद करण्यात आल्याने या भागातील प्रवाशांना सिडको बसस्थानक, चिकलठाणा विमानतळ, चिकलठाणा औद्योगिक वसाहत, जालनारोड तसेच मुकुंदवाडी व सिडको, हडकोसह जळगावरोडकडे येण्यासाठी हाच एकमेव पर्यायी रस्ता आहे. परिणामी या रस्त्यावरती सातत्याने वाहनांची वर्दळ असते. कंत्राटदाराने रस्ता दुरूस्त करण्याऐवजी केलेल्या खडीकरण मजबुतीकरणातील खडी व मुरूम बाहेर पडल्याने व‌ त्यात रस्त्यात खड्डेच खड्डे पडल्याने प्रवास करणे जिकरीचे बनले आहे. प्रवाशांना रस्त्याच्या मधोमध अती उंचीचे चेंबर अपघाताला घातक ठरत आहेत.‌  या दिड किलोमीटर अंतराच्या रस्त्याला सिमेंटीकरणाची मंजुरी मिळाली आहे . संबंधित ठेकेदाराने वर्षभरापूर्वी या रस्त्यावरील रुंदीकरणाच्या व‌ काॅक्रीट कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली होती. रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण करून पुढे काम बंद केले आहे. गेल्या तीस वर्षापासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाल्याने जनतेतून समाधान व्यक्त झाले . मात्र गत सहा महिन्यांपासून रस्त्याचे काम ठप्प आहे. त्यामुळे जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com