Sambhajinagar : जालना रोडचे विस्तारीकरण; पुलांच्या कठड्यांची उंची कधी वाढवणार

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील सिडको उड्डाणपुलाच्या दुभाजकाला एलपीजी गॅस वाहणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने गॅस लिकेज झाला. दरम्यान पहाटे साडेपाचच्या दरम्यान जालनारोडसह परिसरातील आजूबाजूच्या १ किमीपर्यंत रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. दरम्यान, या घटनेमुळे जालनारोडला जोडणारे सर्व रस्ते बंद करण्यात आल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

Sambhajinagar
Tender Scam : विनाशकाले विपरीत बुद्धी! 'त्या' टेंडर आयडीचे गौडबंगाल काय?

शहरातील मुकुंदवाडी चौक चिकलठाणा औद्योगिक क्षेत्र, एपीआय कॉर्नर ते कलाग्राम, सिडको वसंतराव नाईक चौक ते जळगाव रोड, सिडको एसबीआय चौक ते जकातनाका, चिश्तिया चौक ते बळीराम पाटील शाळा, सेव्हनहील ते जकातनाका ते टीव्ही सेंटर मुकुंदवाडी चौक ते महालक्ष्मी चौक ते कामगार चौक ते जयभवानी नगर चौक ते गजानन मंदिर चौक ते सुतगिरणीचौक ते एकता चौक ते शहानुरवाडी,सिडको वसंतराव नाईक चौक ते जयभवानी नगर चौक या अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अनेक मुख्य कार्यालये  जालना रोडवर असल्याने नागरिकांना सिडको चौक हा वाहतुकीचा मुख्य पर्याय आहे. मात्र तोच बंद केल्याने नोकरदार वर्गाची प्रचंड गैरसोय झाली. सेव्हन हील आणि मुकुंदवाडी चौक आणि सिडको उड्डाणपुलाच्या खालून प्रोझोन मार्गे वाहतूक वळवण्यात आल्याने नागरिकांची कोंडीत अडकुन त्रेधातिरपीट उडाली. दरम्यान इतक्या मोठ्या घटनेनंतर आता तरी संबंधित प्रशासनाने एकतर जालनारोडचे विस्तारीकरण, पुलांच्या कठड्यांची उंची वाढवावी, असा सुर नागरिकांमधून उमटला.

Sambhajinagar
Sambhajinagar : नागरिकांनी अडवलेल्या जलवाहिनीचा प्रश्न अखेर सुटला; पोलिस बंदोबस्तात...

छत्रपती संभाजीनगर शहरातील लाईफलाईन म्हणून जालना रोडची ओळख आहे. हे कालच्या घटनेने पुन्हा एकदा समोर आले आहे. शहरातील कानाकोपऱ्यात राहणाऱ्या प्रत्येकाला जालना रोडवर यावेच लागते. जालना रस्त्याला समांतर असणाऱ्या एमजीएम ते लक्ष्मण चावडी, आकाशवाणी ते दमडीमहल या रस्त्यांसह जालनारोड विस्तारीकरणाशिवाय जालनारोडची कोंडी फोडण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे कालच्या घटनेनंतर समोर आले. शहराच्या मंध्यवर्ती भागातून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहराच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यात जालनारोडचे महत्त्व आहे. नुसतीच शहराची लाइफलाइन नसुन हा रस्ता मराठवाड्यासह इतर राज्यांना जोडणारे विकासाचे हृद्य आहे. त्यामुळे या रस्त्याचे विस्तारीकरण आणि त्याला जोडणार्या पर्यायी मार्गांचे विस्तारीकरण होणे आवश्यक असल्याचे मत शहरातील काही नामांकित तज्ज्ञ मंडळीने टेंडरनामा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. या रस्त्याचे विस्तारीकरण व पर्यायी मार्ग शोधल्याशिवाय वाहतुकीची व विकासाची कोंडी फुटुच शकत नाही,शहरात काहीच होऊ शकत नाही, असे देखील ठामपणे तज्ज्ञांनी सांगितले.

Sambhajinagar
Sambhajinagar : नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिकेला मिळणार 1068 कोटी

एकेकाळी बावन्न दरवाजांच्या तटबंदीत असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहरात पैठण गेटमधून बाहेर पडल्यानंतर आताच्या क्रांतीचौक ते रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर काला चबुतऱ्याशिवाय काहीही नव्हते. उस्मानपुऱ्यात काही काळ ब्रिटीश छावणी होती. चिकलठाणा, मुकुंदवाडी, गारखेडा,उस्मानपुरा, आदी गावांकडे जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते. चारशे वर्षांच्या काळात शहराने तटबंदीच्या बाहेर हातपाय पसरले. पाकिस्तानातून निर्वासित होऊन आलेल्या सिंधी, शिख बांधवांनी आताच्या क्रांतीचौकाच्या आसपास जमिनी घेतल्या. साठच्या दशकात रोकडिया हनुमान कॉलनीची मुहुर्तमेढ रोवण्यात आली आणि या रस्त्यावर नागरीकरणाला सुरुवात झाली. त्यापूर्वी या भागाचे महत्त्व मोंढ्यात माल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांपुरतेच होते. म्हणून तर मोंढा नाक्यावर ऑटोमोबाइल्सचे मार्केट फार पूर्वीच तयार झाले. सिडकोने 'नवीन छत्रपती संभाजीनगर ' हे जुळे शहर वसविण्यास सुरुवात केल्यानंतर जालना रोडचे महत्त्व वाढत गेले. कालांतराने चिकलठाणा एमआयडीसी स्थापन झाल्यानंतर जालना रोडचे महत्त्व पुन्हा वाढले. या रस्त्यावरच पुढे आता शेंद्रा पंचतारांकित एमआयडीसी व डीएमआयसी आहे. महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर या रस्त्यावरील चिकलठाणा व मुकुंदवाडी या गावांचा समावेश शहरात करण्यात आला. गारखेड्याचे गावठाणही शहरात आले. शहराच्या विकासासोबत जालना रोडचे रुप सतत बदलत गेले.

Sambhajinagar
Mumbai : बीएमसीने फक्त सत्ताधारी आमदारांनाच दिले 700 कोटी; कॉंग्रेसकडून पक्षपाताचा आरोप

जालना रोडवर शहरातील सर्व प्रमुख बँका आहेत. एचडीएफसी, ॲक्सीस, आयसीआयसीआय, इंडिया बँक, एसबीआय,  जिल्हा सहकारी बँक, भूविकास बँक, महाराष्ट्र बँक, युनियन बँक यासह अनेक छोट्या मोठ्या सहकारी बँका पतसंस्था याच रस्त्यावर आहेत. याशिवाय शासकीय दूध डेअरी, एलआयसी, जिल्हा व हायकोर्ट, कुटुंब न्यायालय, मॅट, अपघात न्यायालय, धर्मादाय आयुक्त, सहकार कार्यालय, कृषी विभाग, आरोग्य विभाग, गोदावरी पाटबंधारे कार्यालय, सिंचन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आकाशवाणी यासह जालना रोडला लागूनच सिडकोचे कार्यालय आहे. विमानतळ, सिडको बसस्थानक, एसटी वर्कशॉप, हॉस्पिटल, शाळा, कॉलेज, चर्च, क्रीडांगण, पेट्रोल पंप आदी सर्व व्यवस्था जालना रोडवर आहेत.

हॉटेल अन् मॉल

शहर पर्यटननगरी असल्याने येथे हॉटेल उद्योगाचे मोठे महत्त्व आहे. हॉटेल रामा इंटरनॅशनल, अजिंठा ॲम्बिसिएडर ही जुनी पंचतारांकित हॉटेल जालना रोडवर आहेत. याशिवाय शहरातील सर्वाधिक लहान-मोठी हॉटेल्स याच रस्त्यावर आहेत. बिग बाजार, मोर हे मॉल याच रस्त्यावर आहेत. प्रोझोन मॉल, कलाग्रामला जाण्यासाठी जालना रोडच वापरावा लागतो.

Sambhajinagar
Mumbai Pune Expressway : Good News; सहापदरी एक्स्प्रेस-वे होणार आठपदरी! काय आहे प्लॅन?

विस्तारीकरण आवश्यकच

शहराच्या विस्तारासोबतच जालना रोडवर वाहतूक वाढली. पूर्वी मराठवाड्यातून फक्त हैदराबाद-पुणे हा एकमेव राष्ट्रीय महामार्ग उमरगा मार्गे जात होता. कालांतराने सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्ग २११ निर्मिती  करण्यात आली. जालना रोड म्हणजे या राष्ट्रीय महामार्गाचा भाग आहे. १९९० च्या दशकात जालना रोडवरील अपघातात अनेक बळी गेले. त्यामुळे जालना रोडला पर्याय म्हणून बीड बायपास काढण्यात आला. आता बीड बायपासवरही अपघात वाढल्याने त्याला पर्यायी मार्ग म्हणून आडगाव फाटा ते करोडी हा तीस किलोमीटरचा बायपास करण्यात आला. जालना रोडवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सेव्हन हिल्स, क्रांती चौक, मोंढा नाका, सिडको, बाबा पेट्रोल पंप उड्डाणपूल  बांधले आहेत. मात्र शहराची वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार दिवसेंदिवस वाहनांची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन जालनारोडचे विस्तारीकरण तसेच त्याला पर्यायी मार्ग असलेल्या आकाशवाणी ते दमडीमहल, एमजीएम ते लक्ष्मण चावडी या रस्त्यांचे विस्तारीकरण आता तातडीने होणे आवश्यक राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाने जालना रोडच्या विस्तारीकरणाबाबत पहिल्या डीपीआरमध्ये शहरवासीयांनी दिलेल्या सूचनांचा अभ्यास करून दुसरा सुधारित डीपीआर तयार केला. जालना रोडसह बीड बायपासच्या विस्तारीकरणाला विलंब झाला असून आठवडाभरात हे काम सुरू होईल, अशी माहिती दिल्लीतील सूत्रांनी दिली. 

तेरा वर्षापूर्वी केंद्रीय जलवाहतूक दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी २५ डिसेंबर २०१५ रोजी शहरातील ७५० कोटींच्या कामांना मंजुरी दिल्याचे जाहीर केले होते. जालना रोड ४५ मीटर रुंद होऊन त्याचे रुपडे पालटणार , अशी ग्वाही त्यांनी दिली होती. त्यांनी जालना रस्ता विस्तारीकरणाची जबाबदारी राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाकडे सोपवली होती.दरम्यान या प्राधिकरणातर्फे वर्षभर या जालनारोड विस्तारीकरणाबाबत खटाटोप सुरू होता. पहिल्या टप्प्यात महानगरपालिका व इतर  सर्वच सरकारी विभागांची बैठकही झाली होती. यात असा असेल जालना रोड याचे प्रातिनिधिक मॉडेल तयार केले होते.यात हा रस्ता सहा पदरी होईल असे गडकरींनी सांगितले होते. यात आठ फूट वे ब्रिजसह तीन ठिकाणी भुयारी मार्गही सुचवण्यात आले; यानंतर महानगरपालिकेने जालनारोडवर पाडापाडी देखील सुरू केली होती. मात्र पुढे विस्तारीकरणात महानगरपालिकेचे कारभारी व  राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचा असमन्वय नडला; पण तत्कालीन महानगरपालिका आयुक्त ओप्रकाश बकोरिया यांच्यासह तत्कालीन जिल्हाधिकारी निधी पांडे यांनी चांगला पुढाकार घेतला होता.  मात्र, काही मालमत्ताधारकानी  जालनारोड विस्तारीकरणात बाधा आणला.  आक्षेप नोंदवत प्रकरण न्यायप्रविष्ट केले आणि काम थांबले. केंब्रिजस्कूल ते नगर नाका असा चौदा किलोमीटरचा हा रस्ता शहराच्या मध्य भागातून जातो. त्यावर प्रचंड वाहतुकीचा ताण असल्याने त्याचे विस्तारीकरण आवश्यक आहे. चालू अवस्थेत रस्ता मोठा करताना त्याला समांतर असणारा एमजीएम ते लक्ष्मण चावडी हा रस्ता मोठा कसा करता येईल, तसेच याच रस्त्यावर बाबा पेट्रोल पंप, क्रांती चौक, मोंढा नाका, सेव्हन हिल्स आणि नाईक कॉलेजचा उड्डाणपूल असे पाच उड्डाणपूल झाले. त्यावर अनेकदा डांबरांचे थर चढवल्याने संरक्षित कठड्यांची उंची कमी झाल्याने कठडे असुरक्षित झाल्याने मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कठड्यांची उंची वाढवणे आवश्यक आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com