Sambhajinagar : बघा उघड्या चेंबरमुळे काय घडले; नशीब बलवत्तर म्हणून पोलिस...

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील रस्त्यावरील उघड्या ड्रेनेज चेंबरध्ये पडून शनिवारी ब्रिजवाडीत एक बालिका गंभीर जखमी झाली. त्याचबरोबर रविवारी सिडको पोलिस स्टेशनअंतर्गत पोलिसांचे वाहनच चेंबरमध्ये अडकून पडले. नशीब बलवत्तर यात पोलिसांचा जीव वाचला. शहरात उघड्या चेंबरमुळे वारंवार अपघात होत आहेत. शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी असे उघडे चेंबर पाहायला मिळत आहेत.

Sambhajinagar
Sambhajinagar : अखेर कटकटगेट नाल्यावरील भगदाड दुरूस्तीचे काम सुरू

काही ठिकाणी महापालिकेचे ड्रेनेजचे झाकण रस्त्यापासून खाली रूतलेत. काही वरती आलेत. त्याचबरोबर बीएसएनएल, रिलायन्स फोरजीसह अन्य कंपन्यांचे केबल डंक्ट देखील उघडे असल्याने रात्रीच्या अंधारात दुचाकीस्वार व कारचालकांना अंदाज येत नसल्यामुळे अपघात होतात. मागील शनिवारी भरदिवसा शहरातील ब्रिजवाडीतील उघडया गटारावरील चेंबरमध्ये एक चिमुकली पडून गंभीर जखमी झाली. त्याचबरोबर रविवारी सिडको टाऊन सेंटर परिसरातील जीएसटी कार्यालय ते अग्रसेन मार्गावर महाराष्ट्र बॅंकेसमोर उघडया गटारीच्या ड्रेनेज चेंबरमध्ये रात्री कॅनाॅट परिसरात गस्तीवर असलेल्या एका पोलिसांचे वाहन रूतले. नशीब बलवत्तर म्हणून पोलिसांचे प्राण वाचले. ही घटना रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.
यापूर्वी अशा खाजगी व सरकारी कंपनींच्या उघड्या केबल डंक्टमुळे शहरात शंभर बळी गेल्याची पोलिसांत नोंद आहे. तसेच अनेक लोक गंभीर जखमी व काही कायमचे अंथरूणात खितपत पडलेले आहेत.

Sambhajinagar
Mumbai : रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम रखडणार; 'ते' 1362 कोटींचे टेंडरही रद्द

या घटनांना जबाबदार कोण?

महापालिकेतील ड्रेनेज, जलवाहिनी आणि सीसीटीव्ही तसेच वाहतूक सिंग्नल व पथदिव्यांच्या केबल टाकण्यासाठी रस्ते खोदला जातात. त्याचबरोबर काही खाजगी व सरकारी केबल कंपन्या विविध कामांसाठी रस्ते खोदतात. ठराविक अंतरावर केबल डंक्ट तयार करतात. पण ना रस्त्यांची दुरूस्ती होते, ना केबल डंक्टवर झाकनं ठेवतात. परिणामी तिथे अपघाताला  निमंत्रण देणार्या घटना कायम घडतात. ड्रेनेज चेंबरची दुरुस्ती अथवा पाण्याची पाइप बदलण्यासाठी रस्ता खोदल्यानंतर तो चांगल्या पद्धतीने दुरुस्त केला जात नाही. माती टाकल्यानंतर वाहन ये-जा करून खड्डा अधिक खोल होतो. पावसाळ्यात त्यात पाणी साचते. वाहने रूततात. हे प्रकार टाळण्यासाठी सुरक्षेसाठी लोखंडी दुभाजक लावणे, पट्टे बांधणे असे काहीच उपाय होत नाहीत. खोदलेले रस्ते कायम तसेच राहतात. खाजगी व सरकारी केबल कंपन्यांचे डंक्टवरील तसेच महानगरपालिकेच्या ड्रेेनेज चेंबरची लोखंडी ढापे चोरीला जातात. त्यामुळे आता सिमेंटचे झाकण बसविले जात आहेत. मात्र कंत्राटदारांकडून त्यातही कंजुषी केली जात असल्यामुळे त्यावरून अवजड वाहन गेल्यानंतर ते खचते. त्यानंतर अपघात होतात. लोखंडी झाकण चोरीला जात असले तरी त्याचा तपास होत नाही. महापालिकेतील अधिकाऱ्यांना याचे काहीच सोयरसुतक नाही.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com