Sambhajinagar : प्रशासकसाहेब, आता बोला!; उड्डाणपुलाच्या कठड्यासमोरच धोकादायक होर्डिंग

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : दिसलं चांगल लोकेशन की उभी करा होर्डिंग या तत्वावर छत्रपती संभाजीनगरात प्रमुख रस्त्यांवर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या कारभाऱ्यांनी मुंबईच्या एका कंत्राटदाराला कंत्राट दिले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी होर्डिंग उभी करण्यात आली आहेत. तसेच होर्डिंग्ज उभी करण्याचा सपाटा सुरुच आहे. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या कारभाऱ्यांची मनमानी आणि कंत्राटदाराचे महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट यामुळे शहरातील अत्यंत वर्दळीच्या महावीर चौकातील उड्डाणपुलाच्या कठड्यासमोरच पोट कठडे बांधून पुलाच्या दोन्ही बाजूंना धोकादायक होर्डिंग उभारण्यात आली आहेत. त्यामुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सिडको उड्डाणपूलावर होर्डिंग उभारण्यासाठी उकरलेल्या खड्डयातील मातीचा ढिगारा रस्त्यावर पसरल्यामुळे एलपीजी गॅस टॅंकर पलटी झाल्याची घटना ताजी असल्याने महापालिकेने अशा धोकादायक होर्डिंगमुळे कोणाच्या जिवीतास हानी पोहोचणार नाही, यासाठी महावीर चौक उड्डाणपुलावरील धोकादायक होर्डिंगची तपासणी करण्याची गरज आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : जालना रोड विस्तारीकरणाच्या केवळ गप्पाच! कुठे गेली आश्वासने?

छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको उड्डाणपुलाच्या चढ-उताराच्या शेजारीच धावपट्टी समोरील दुभाजकात मुंबईचा कंत्राटदार प्रो ॲक्टिव्ह कंपनीमार्फत होर्डिंग लावण्यासाठी खड्डा तयार करून मातीचा ढिगारा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पसरला होता. गुरूवारी याच ढिगाऱ्याला वाचवत वळण घेत असताना गॅस टॅंकरचा अपघात झाला. त्यामुळे अचानक त्यातून गॅस गळती सुरू झाल्याने संपुर्ण शहर हादरले. दुष्काळात शेकडो टँकरचा पाण्याचा मारा करावा लागला. त्यामुळे शहरातील होर्डिंगच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महावीर चौकातील उड्डाणपुलावरील होर्डिंगच्या बाबतीत देखील काही जागृक नागरिकांनी "टेंडरनामा" प्रतिनिधीकडे तक्रार केल्यानंतर प्रतिनिधीने पाहणी केली असता अत्यंत धोकादायक पद्धतीने होर्डिंग उभारली असल्याचे समोर आले आहे. यात कंत्राटदाराने वाहतुकीची कोणतीही काळजी घेतली नसल्याचे टेंडरनामा तपासात उघड झाले आहे. महापालिकेला कर आणि कारभाऱ्यांना वरकमाई आणि कंत्राटदाराला कोट्यवधींचा महसूल मिळत असल्याने दिसलं चांगलं लोकेशन की उभारा होर्डिंग अशीच स्थिती सध्या छत्रपती संभाजीनगर शहरात झाल्याचे दिसत आहे. त्यासाठी महापालिकेच्या मालमत्ता विभागाने परवानगी देताना शहर वाहतूक शाखा, संबंधित बांधकाम विभाग, आरटीओ आणि जिल्हा रस्ते सुरक्षा समितीमार्फत पहाणी करूनच ती योग्य त्या सुरक्षेच्या जागी परवानगी देणे बंधनकारक असताना या सर्व बाबी पडताळून परवानगी दिली आहे का यांची खातरजमा प्रशासकांनी करणे गरजेचे आहे.

Sambhajinagar
Mumbai-Goa Highway : भूसंपादनाचे प्रस्ताव 15 दिवसांत निकाली काढा: नितीन गडकरी यांचे निर्देश

महावीर चौक उड्डाणपुलाच्या कठड्यासमोरच पोटकठडे बांधून या ठिकाणी तर धोकादायक पद्धतीने होर्डिंग उभारण्यात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. ती अत्यंत वर्दळीच्या मार्गावर असल्याने होर्डिंगसाठी बांधलेल्या कठड्याला वाहनांची धडक बसून मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. उड्डाणपुलाच्या रस्त्यावर अशी धोकादायक होर्डिंग उभी करण्यात आली, ती कोणाच्या आशीर्वादाने उभी केली, ती आता महापालिका प्रशासकांनी नियुक्त केलेल्या पथकाच्या तपासणीतून समोर येईल का? की कुणाच्या दबावाखाली दुर्लक्ष केले जाईल, हाही प्रश्न यानिमीत्ताने समोर आला आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com