Sambhajinagar : दोन कोटींच्या 'शिवसृष्टी'ने सौंदर्यात भर पण...

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : दोन कोटींच्या शिवसृष्टीने छत्रपती संभाजीनगर शहराचा सौंदर्यात भर पडली असली तरी महापालिका आणि स्मार्ट सिटी कार्पोरेशन ली. यांनी येथील स्वच्छता आणि पर्यटकांना शिवसृष्टीची माहिती व्हावी, यासाठी शहरातील केंद्रीय व राज्य पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांशी योग्य समन्वय ठेऊन पर्यटन वाढवण्याच्या हेतूने आणि पर्यटनला चालना देण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करणे गरजेचे आहे. 'दोन कोटीच्या शिवसृष्टीवर धुळीचे साम्राज्य' अशा आशयाच्या असंख्य तक्रारीनंतर टेंडरनामा प्रतिनिधीने मंगळवारी छत्रपती संभाजीनगरातील स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत साकार केलेल्या क्रांतीचौक उड्डाणपुलाच्या खाली ' शिवसृष्टी 'या प्रकल्पाची पाहणी केली. 

Sambhajinagar
EXCLUSIVE: महानिर्मितीत लाखोंची उधळपट्टी; बैठकीच्या नावाखाली चुना

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाची महती सांगणाऱ्या म्युरल्स आणि पर्यटकांच्या आसनव्यवस्थेसह ॲम्पीथिऐटरवर तसेच परीसरात मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य पसरलेले दिसले. दरम्यान येथील सुरक्षा रक्षकाकडे विचारणा केली असता हा परिसर झोन क्रमांक ९ व २ च्या दरम्यान येतो. पुलाचा अर्धा भाग दोघे मिळुन साफ करतात पण शिवसृष्टीच्या म्युरल्स स्वच्छतेची जबाबदारी स्मार्ट सिटीकडे असल्याचे म्हणत कानाडोळा करत असल्याचे समोर आले. महिन्याभरापूर्वीच पूर्ण झालेल्या कोट्यावधीच्या या प्रकल्पाची ही स्थिती असेल, तर पुढे या प्रकल्पाची देखील कवितेची बाग, लोककला उद्यान आणि हर्सूल तलावालगत स्मृती उद्यानासारखी वाट लागेल की काय? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी प्रतिनिधीने स्मार्ट सिटीचे उपमुख्याधिकारी सौरभ जोशी यांची भेट घेतली. दरम्यान त्यांनी तेथील सुरक्षितता आणि नियमित स्वच्छतेसाठी एजन्सी नियुक्त करण्यासाठी टेंडर काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी प्रतिनिधिशी बोलताना सांगितले.

Sambhajinagar
BMC: 'नवा दिवस…नवी लूट'; आदित्य ठाकरे यांचे आयुक्तांना पुन्हा पत्र

तत्कालीन महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ अस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद स्मार्ट सिटी मार्फत शिवसृष्टी हा प्रकल्प साकार करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाविषयी नवीन पिढीला आणि पर्यटकांना सचित्र माहिती देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने क्रांतीचौकात  छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ  पुतळा उभारल्यानंतर पुतळा परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी  शिवसृष्टी प्रकल्प साकार करण्यात आला आहे. या प्रकल्पातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापण करताना जिंकलेल्या लढाया गडकिल्ले , महाराजांचा जन्म आदी अनेक गोष्टी सचित्र आकर्षक म्युरल्समधुन सांगण्याचा छान प्रयत्न या प्रकल्पातून साकार केला आहे. पर्यटकांना काही वेळ विसावा घेत पुतळा परिसर न्याहाळता यावा, यासाठी दोन्ही बाजुने उभारण्यात आलेले ॲपिथिएटर, राजमुद्रा, बसण्याची व्यवस्था, रंगरंगोटी, चालण्यासाठी पादचारी पथ, वृक्षारोपण, लांडस्कॅपिंग आणि रोषणाई असे विविध घटक या प्रकल्पात असल्याने पर्यटकांना भुरळ घालत आहेत.

Sambhajinagar
Nashik : स्मार्टसिटीच्या 1250 कोटींच्या कामांना वर्षभराची मुदतवाढ

चौकाच्या एका बाजूला पुलाच्या खाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातले महत्त्वपूर्ण प्रसंगाचे म्युरल्स लावण्यात आले आहेत. तर चौकाच्या दुसऱ्या बाजूला महाराजांनी जिंकलेले गड व किल्ले यांचा म्युरल्स द्वारे चित्रण करण्यात आलेले आहे. छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांच्या देखरेखीखाली करण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली मात्र हा संवेदनशिल झोन आहे. येथे तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे आहे. धुळ साचु नये, यासाठी इनडोअर स्वरूपाचे कवच करणे गरजेचे असल्याचे पर्यटकांचे मत आहे. यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना धुळीचा त्रास होणार नाही. परिसराच्या काही मीटर अंतरावर स्मार्ट स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली तर पर्यटकांची गैरसोय देखील दुर होईल. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com