Aditya Thackeray
Aditya ThackerayTendernama

BMC: 'नवा दिवस…नवी लूट'; आदित्य ठाकरे यांचे आयुक्तांना पुन्हा पत्र

मुंबई (Mumbai) : मुंबईतील स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याबाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे महानगरपालिका आयुक्तांनी अद्याप दिलेली नाहीत. कंत्राटदार मित्रासाठी आणि सरकारमधील काही लोकांसाठी राज्य सरकारची ही हेराफेरी सुरू असून या स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याबद्दल आयुक्तांनी उत्तर द्यावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात आयुक्तांना पत्र पाठवून काही प्रश्न केले आहेत.

Aditya Thackeray
EXCLUSIVE: महानिर्मितीत लाखोंची उधळपट्टी; बैठकीच्या नावाखाली चुना

आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांना पाठवलेले हे पत्र ट्विटरवर पोस्ट केले आहे. 'नवा दिवस… नवी लूट' असे शीर्षक त्यांनी त्या पोस्टला दिले आहे. मुंबईकर नागरिक आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून स्ट्रीट फर्निचरबाबत आपण तसेच इतर पक्षांच्या लोकप्रतिनिधींनीही प्रश्न विचारले होते, परंतु आयुक्तांनी त्यावर काहीच प्रतिसाद दिलेला नाही. रस्त्यांसाठी काढलेली टेंडर, सॅनिटरी पॅड घोटाळा, सौंदर्यीकरण घोटाळा यासंदर्भात ते प्रश्न होते असे आदित्य ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

Aditya Thackeray
Pune-Mumbai महामार्गासह 'द्रुतगती' विकएंडला का झाला जॅम?

महापालिकेचे प्रशासक आणि राज्य सरकारला सहन करणाऱ्या मुंबई शहराच्या आर्थिक स्वातंत्र्याला तडा तर गेला नाही ना याची खात्री करण्यासाठी आपण हे प्रश्न विचारले होते असे त्यांनी पुढे म्हटले आहे. त्या प्रश्नांची उत्तरे द्याल तेव्हाच आमचे समाधान होईल आणि तुमच्या प्रशासनात घोटाळे होत नाहीत याची खात्री पटेल, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. स्ट्रीट फर्निचरबाबत आयुक्त चहल यांना विचारलेले पुढील प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

Aditya Thackeray
Navi Mumbai : मेट्रोची एका तपानंतर सुद्धा रखडपट्टी; ठेकेदार मोकाट

आदित्य ठाकरे यांचे प्रश्न -
-
कंत्राटदार किंवा पुरवठादाराने सर्व 13 वस्तू उघडपणे खरेदी करणे का आवश्यक आहे?
खरेदीद्वारे कोणत्या वस्तू मागवल्या गेल्या आणि किती प्रमाणात?
- हे महत्त्वाचे प्रश्न असले तरी नागरिक म्हणून पुढील बाबीही जाणून घ्याव्याशा वाटतात असेही म्हणत आदित्य ठाकरे यांनी त्या पुढीलप्रमाणे नमूद केल्या आहेत.
- आरोप झाल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय तथ्य शोध समितीचा अहवाल
व्हीजेटीआयने बनवलेला सर्व बोलीदारांचा गुणवत्ता चाचणी अहवाल
- महापालिकेच्या रस्ते आणि वाहतूक विभागाची टिप्पणी
- शहरी नियोजक/सल्लागारांच्या आवश्यकतेवर टिप्पणी तसेच शहरी नियोजकांची निवड ईओआयद्वारे करण्यात आली होती की अशीच केली?
- खरेदीचे टेंडर सीपीडी (आरोग्य विभागाचे प्रभारी) कडून का काढण्यात आली, रस्ते विभागाकडून का नाही?
- कंत्राटदाराने पुरवठा करण्यासाठी आवश्यक वस्तूंची बाजारभावानुसार किंमत किती आहे? 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com