Sambhajinagar : पुरातत्व खात्याचे चाललंय तरी काय?; मकई गेटसाठी वर्षभरातच पुन्हा टेंडर कसे?
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : मकई गेटसाठी जी-२० दरम्यान पुरातत्व खात्याने गेटच्या सुशोभिकरणासाठी व दुरूस्तीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यात निधीला मंजुरी मिळाल्यानंतर याकामासाठी एप्रिल-मे २०२३ दरम्यान एल.१ टेंडर काढण्यात आले होते. त्यात छत्रपती संभाजीनगर येथील प्रवीन चव्हान यांच्या साई कन्स्ट्रक्शन कंपनीने ४.२५ इतक्या कमी टक्के दराने टेंडर भरल्याने त्यांना हे काम देण्यात आले. कामाची अंदाजपत्रकीय रक्कम ८२ लाख इतकी होती.
या कामांचा होता समावेश
यात खाम नदीच्या दोन्ही बाजूने काँक्रिट भिंत, जागेचे सपाटीकरण व त्यात काळी माती टाकणे व लोखंडी ग्रिल तसेच मोकळ्या जागेत लाॅन व फुलझाडे लावने तसेच दरवाजांची दुरुस्ती संज्यांच्या छत्र्यांची दुरुस्ती आतुन-बाहेरून गिलावा करणे, छताची वाॅटर प्रुफींग, दरवाजांसमोर उद्यान विकसित करणे व प्रकाशझोत व्यवस्था आदी कामांचा समावेश होता. दरम्यान याच कामांसाठी पुन्हा पुरातत्व खात्याने तब्बल दिड कोटीचे टेंडर प्रसिद्ध केले.यातही त्याच कामांचा समावेश करण्यात आला आहे, मग जी-२० च्या काळातील ८२ लाखात नेमकी काय कामे केली की जुनीच कामे दाखवून कागदावरच बिल काढल्याचा संशय बळावत आहे. मकई गेट समोरील निष्कर्षित केलेल्या अतिक्रमणाच्या जागी पुन्हा अतिक्रमण होऊ नये, या नावाखाली चक्क ८२ लाखाचे सुशोभिकरणाचे काम राज्य पुरातत्त्व खात्यामार्फत गत वर्षी सुरू करण्यात आले होते.
दरम्यान याच कामांसाठी पुन्हा पुरातत्व खात्याने नव्याने दिड कोटीचे "टेंडर" काढल्याने जुन्या आणि नव्या दोन्ही टेंडरची तपासणी केली असता कंत्राटदारामार्फत केवळ खाम नदीच्या दोन्ही बाजूने केवळ अडीच फुटाची काॅक्रींट भिंत व त्यावर एक फुटाचे लोखंडी ग्रील लाऊन काम गत वर्षभरापासून बंद ठेवण्यात आल्याचे आसपासच्या नागरिकांनी सांगितले. ज्या जागेचे सपाटीकरण करण्यात आले. त्या जागेत काळी माती टाकलेली दिसली नाही. तसेच मोकळ्या जागेत लाॅन व फुलझाडे लाऊन उद्यान व सुशोभिकरणाचे काम देखील झालेले नाही. याऊलट मोकळ्या जागेत रानटी झाडाझूडपांनी वेढा घातला असून गाजरगवत आकाशाला गवसणी घालत असल्याचे दिसून आले. तसेच दरवाजांची दुरुस्ती संज्यांच्या छत्र्यांची दुरुस्ती आतुन - बाहेरून गिलावा करणे, छताची वाॅटर प्रुफींग, व प्रकाशझोत व्यवस्था आदी कामांना बगल देण्यात आल्याचे दिसून आले. दरम्यान याच कामांसाठी पुन्हा पुरातत्व खात्याने तब्बल दिड कोटीचे टेंडर प्रसिद्ध केले.यातही त्याच कामांचा समावेश करण्यात आला आहे, मग जी - २० च्या काळातील ८२ लाखात नेमकी काय कामे केली की जुनीच कामे दाखवून कागदावरच बिल काढल्याचा संशय बळावत आहे.