Sambhajinagar : तब्बल 40 वर्षानंतर 'या' उद्यानातील रस्त्यांचे उजळले भाग्य

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : अनेक वर्षे हाल सोसलेल्या छत्रपती संभाजीनगरातील सिद्धार्थ उद्यानातील सर्वच रस्त्याचे भाग्य अखेर उजळले आहे. या रस्त्यांचे काम सिद्धार्थ उद्यान विकास या लेखाशिर्षातून पूर्ण करण्यात आले आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : 'IT Park'साठी उद्योजकांचा पुढाकार, उद्योग सचिवांना साकडे

उद्यानातील एकूण ३८० मीटर लांब व ४ मीटर रूंद रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी २४ लाख ९७ हजार ८२५ इतक्या रकमेस महापालिका प्रशासकांची तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर रितसर पद्धतीने ई-टेंडरची कार्यवाही करून एम. बी. इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक व अनुभवी ठेकेदार खाजा अमीन यांनी अंदाजपत्रकापेक्षा २ टक्के कमी दराने टेंडर भरल्याने त्यांना हे काम देण्यात आले होते. उद्यानातील सर्वच रस्ते गुळगुळीत झाल्याने उद्यानाच्या सौंदर्यात भर पडली असून उद्यानप्रेमी पर्यटकांची खड्ड्यांपासून सुटका झाली आहे.

Sambhajinagar
Mumbai-Goa Highway होईना अन् कोकणात आणखी एक मेगा एक्स्प्रेसवेची अधिसूचना

सिद्धार्थ उद्यानातील डांबरी रस्ते हे १९८५ साली तयार करण्यात आले होते. त्यानंतर कालांतराने उद्यानातील नागरिकांची गर्दी तसेच स्थापत्य विषयक मटेरियलची वाहतूक करणारी वाहने, पाण्याचे टँकर, कचरा वाहतूक करणारी वाहने या कारणाने सदरील रस्त्यांची दुरावस्था झाली. मागील तीन वर्षांपासून सदरील रस्त्यांचे पुर्नडांबरीकरण व्हावे यासाठी मुख्य उद्यान अधिकारी तथा प्रभारी मुख्य पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. विजय पाटील (दहिहंडे) प्रयत्न करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. २०२३-२४ या आर्थिक वर्षात सदरील कामासाठी सिद्धार्थ उद्यान विकास या लेखाशिर्षाखाली महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी निधी मंजुर केला. शहर अभियंता आविनाश देशमुख, कार्यकारी अभियंता भागवतराव फड, राजीव संधा व उद्यान विभागाचे अभियंता गोपीकिशन चांडक, कनिष्ठ अभियंता स्वप्नाली माने यांनी तातडीने कागदी कारवाई पुर्ण करून रस्त्यांचे काम करून घेतले. उद्यानातील रस्त्यांचे तब्बल चाळीस वर्षानंतर भाग्य उजळल्याने उद्यानाच्या सौंदर्यात भर तर पडलीच शिवाय उद्यानात फेरफटका मारणाऱ्या नागरीकांची खाच खळग्यातून सुटका झाली आहे. उद्यानात विविध कामे करणाऱ्या अधिकारी व  कर्मचाऱ्यांना देखील काम करताना उत्साह निर्माण झाला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com