Sambhajinagar : 'IT Park'साठी उद्योजकांचा पुढाकार, उद्योग सचिवांना साकडे

Auric City
Auric CityTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : राज्यात सत्तांतर होऊन भाजप व शिंदे गट आणि आता पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत आल्यानंतर छत्रपती संभाजीनगरातील रखडलेल्या विकासकामांच्या घोषणांचा सपाटा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू ठेवला. असे असले तरी औद्योगिक विकासकामांच्या बाबतीत काही प्रमाणात मागे राहणाऱ्या शेंद्रा पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीतीसह ऑरिक सिटीत आयटी पार्कला चालना देण्यासाठी मसीआ आणि सीएमएआय या उद्योजक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी नॅसकाॅमच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन ऑरिकमध्ये आयटी उद्योगासाठी पूरक वातावरण असल्याची साद घालत येथे उद्योग उभारणीसाठी आमंत्रण दिले आहे. याशिवाय राज्याचे उद्योग सचिव डाॅ. हर्षदीप कांबळे यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत २५ एकर जागा आय.टी. उद्योगासाठी राखीव ठेवण्याची मागणी केली आहे.

Auric City
Satara-Kagal National Highway : 'या' दोन टोल नाक्यांवर बेकायदेशीर टोलवसुली; 'टोलच्या झोल'वर...

चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील टी सेक्टरमधील ओस पडलेल्या आयटी पार्क संदर्भात टेंडरनामाने वृत्तमालिका प्रकाशित केल्यानंतर शेंद्रा पंचतारांकीत औद्योगिक वसाहत व ऑरिक सिटीत आयटी पार्क तयार करण्यासाठी मसिआ व सीएमआयए या उद्योग संघटनांनी पुढाकार घेतला. छत्रपती संभाजीनगर इंडस्ट्रीयल टाऊनशिप अर्थात ऑरिक सिटींतर्गत असलेल्या दिल्ली, मुंबई इंडस्ट्रीयल काॅरिडाॅर (DMIC) च्या शेंद्रा औद्योगिक क्षेत्रात जगभरातील आयटी उद्योगांनी उद्योग उभारणीसाठी तयारी दर्शवली आहे. नुकत्याच एका आयटी कंपनीने ऑरिक सिटीची प्रशासकीय इमारत भाडेतत्वावर घेऊन कामकाज सुरू केले आहे.

Auric City
Sambhajinagar : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात

या कंपनीने दहा एकर जागेची मागणी केलेली आहे. याशिवाय सीएमएआयच्या पाच ते सहा सदस्यांनी देखील आयटी उद्योग सुरू करण्यासाठी एक ते दिड एकर जागेची मागणी केली आहे. यामुळे आगामी काळात शेंद्रा पंचतारांकीत औद्योगिक क्षेत्रात व ऑरिक सिटीत २५ एकर जागा राखीव ठेवण्याची विनंती राज्याचे उद्योग सचिव डाॅ. हर्षदीप कांबळे यांना केली आहे. छत्रपती संभाजीनगरात आयटीसाठी पोषक वातावरण आहे. येथील विविध अभियांत्रिकी महाविद्यालये आणि विद्यापीठात आयटीचे शिक्षण देणाऱ्या विविध संस्था आहेत. ही बाब येथील उद्योग संघटनांनी नॅशनल असोसिएशन ऑफ साॅफ्टवेअर ॲण्ड सर्व्हिस कंपनीच्या (NESSCOM) लक्षात आणून दिली. त्यावर संबंधित कंपनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी देखील तयारी दर्शवली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com