शिवाजीनगर भुयारी मार्गात महापालिकेच्या मलनिःसारण वाहिनीचा अडथळा; रेल्वेकडून...

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : समस्त छत्रपती संभाजीनगरकरांचे लक्ष लागलेल्या शिवाजीनगर रेल्वेगेट क्रमांक ५५ येथे भुयारी मार्गासाठी मनपाच्या मलनिःसारण वाहिनीचा अडथळा निर्माण झाला होता. त्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे मार्फतच भुयारी मार्गातील खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी शिवाजीनगर नाल्यांपर्यंत पाचशे मीटर अंतरात मोठी मलनिःसारण वाहिनी टाकण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. याशिवाय भुयारी मार्गातील नकाशात ही थोडे तांत्रिक बदल करण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी टेंडरनामा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Sambhajinagar
Sambhajinagar : शरणापूर-साजापूर सुसाट! असा होणार चकाचक बायपास

शहराच्या दक्षिण दिशेला असलेल्या शिवाजीनगर रेल्वेगेट आणि रेल्वेगेट ते देवळाई चौक या अरुंद रस्त्यामुळे अनेक दशकांपासून निर्माण होणारी वाहतूक कोंडी मार्च २०२४ अखेर अखेर फुटणार असल्याची ग्वाही रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. भुयारी मार्गाचा प्रश्न तातडीने सुटावा यासाठी महापालिका अंतर्गत विशेष भुसंपादन अधिकारी विश्वनाथ दहे यांनी देखील येथील रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या ७ मालमत्तांच्या भूसंपादन प्रक्रियेला वेगाने हालचाली करत रेल्वेला जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला.

Sambhajinagar
Sambhajinagar : मोठ्या अपघातानंतरही संभाजीनगरातील 'त्या' पुलाचे काम का रखडले?

रेल्वेगेट ते बीड बायपास देवळाई चौक दरम्यान २४ मीटर रस्त्याचे रूंदीकरणासह जागा ताब्यात मिळाल्यावर रेल्वेने तीन महिन्यांपूर्वी तातडीने भुयारी मार्गाचे काम सुरू केले. रेल्वे गेट बंद करून तीस ते चाळीस फुट खोल खंड्डा तयार केला. त्यानंतर आरसीसी बाॅक्सचे काम देखील हाती घेण्यात आले. मात्र खोदकामात मनपाची मलनिःसारण वाहिनी फुटली. त्यात अवकाळी पावसामुळे पाणीच पाणी झाले. या पार्श्वभूमीवर रेल्वेने तातडीने रेल्वेगेट ते शिवाजीनगर नाल्यांपर्यंत पाचशे मीटर अंतरावर मोठी मलनिःसारण वाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याकामामुळे भविष्यात भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचणार नाही, असा दावा कंत्राटदार नुरसिंहा कंपनीमार्फत करण्यात आला आहे.मलनि:सारण वाहिनीचे काम झाल्यानंतर बाॅक्स आणि गर्डर तयार करण्यासाठी रेल्वेने कंत्राटदाराला सुचना केल्या आहेत. तातडीने रेल्वेच्या हद्दीतील काम केले जाणार आहे. त्यामुळे तब्बल तीन दशकानंतर हा मार्ग मार्च २०२४ मध्ये मोकळा श्वास घेणार आहे. विशेष म्हणजे यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांकडून जलदगतीने काम सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com