Sambhajinagar : शरणापूर-साजापूर रस्ता टेंडरमध्ये नियमानुसार कारवाई

सां. बां. मंडळाचे मुख्य अभियंत्यांची ग्वाही, अधीक्षक अभियंत्यांनी मागितला अहवाल
Aurangabad
AurangabadTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : गंगापूर तालुक्यातील शरणापूर-करोडी-साजापूर या मुख्य रस्त्याचे टेंडर नियमानुसारच खुले केले जाईल. यात प्रशासन कुणाच्याही दबाबाला बळी पडणार नाही, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंडळाचे मुख्य अभियंता डी. डी. उकिर्डे यांनी टेंडरनामा प्रतिनिधीशी बोलताना दिली. येत्या आठ दिवसात रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार, मी स्वतः रस्त्याची पाहणी केलेली आहे. रस्त्याची स्थिती भयंकर आहे असे देखील त्यांनी मान्य केले आहे. दुसरीकडे अधीक्षक अभियंत्यांनी देखील या रस्त्याबाबत गंभीर दखल घेतली असून, त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना आठ दिवसात अहवाल सादर करायचे आदेश दिले आहेत.

Aurangabad
Mumbai : नुसताच सावळागोंधळ; जीटीएसच्या जागेवर RTO आयुक्तालयाचा घाट

या रस्त्याचे टेंडर प्रसिद्ध करून तीन महिन्याचा कालावधी लोटला आहे. यात चार ठेकेदारांनी सहभाग नोंदवला आहे. मात्र अद्याप यातील एकाही इच्छुक ठेकेदाराच्या कागदपत्रांची तपासणी केलेली नाही. तांत्रिक बीड देखील ओपन केले नाही. यासंदर्भात प्रतिनिधीने थेट राज्याचे मुख्यमंत्री तथा बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाम राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे यांना थेट प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, अद्याप त्यांनी त्यांची बाजु मांडली नाही. पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी या रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माहिती घेतो, त्यानंतरच आपल्याशी बोलणे उचित ठरेल. मला आठ दिवसाचा वेळ द्या, असे ते म्हणाले होते. मात्र अद्याप त्यांनी खुलासा केला नाही. आता सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता विवेक बडे, मुख्य अभियंता डी. डी. उकिर्डे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली आणि रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हालचाली देखील सुरू केल्या आहेत. आता या प्रकरणी आमचे आठ दिवस लक्ष असेल.

Aurangabad
Mumbai : मनोर ते पडघा मार्गासाठी सल्लागार नेमणार; 'MMRDA'चे टेंडर

यासंदर्भात खा. इम्तियाज जलील यांनी या रस्त्याची प्रचंड  दुरावस्था झाली असून, या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करत जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याची शोकांतिका व्यक्त केली होती. या रसत्याचा वापर करणारे कामगार, उद्योजक आणि शेतकरी, ग्रामस्थांनी त्यांच्याकडे कैफियत मांडली होती.त्यानंतर त्यांनी स्वतः या रस्त्याची पाहणी केली होती. त्यावर त्यांनी या रस्त्याच्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माहिती घेतली असता यात जीएनआय कंपनीला हे काम मिळावे यासाठी पात्रता सिध्द करणाऱ्या मुंबईच्या ठेकेदाराला पश्चिम मतदार संघातील एका मोठ्या राजकीय नेत्याकडून अश्लिल शिव्यांचा मारा सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सदर कंपनीने टेंडर प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी दबाबतंत्र वापरले जात असल्याचा आरोप जलील यांनी केला होता.एकीकडे रस्ता पोखरलेला, दुसरीकडे अधिकाऱ्यांचे तोंडावर बोट, तिसरीकडे सत्ताधाऱ्यांची मस्ती या वादात जनतेचे हाल यामुळे प्रशासनराज आणि पश्चिम मतदार संघातील त्या राजकीय नेत्याचा सावळागोंधळ लोकसभेत  सचित्र आणि पुराव्यासह  उघड करणार असल्याचे ते म्हणाले होते.

Aurangabad
Sambhajinagar : धक्कादायक! आमदार निधीतील कामे निकटवर्तीयांनाच का?

सार्वजनिक बांधकाम विभागाने सात वर्षांपूर्वी शरणापूर-करोडी-साजापूर रस्त्याच्या दूरूस्तीसाठी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत २०१४-१५ या आर्थिक वर्षात ५ कोटी ७ लाख २४ हजार ८१३ रूपये मंजूर केले होते. यानंतर रस्त्याच्या दुरूस्तीसाठी गंगापूरच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत बी-१ टेंडर काढले होते. त्यात २२.९१ कमी टक्के दराने टेंडर भरणाऱ्या संभाजीनगरच्या धनंजय कन्स्ट्रक्शन कंपनीला १७ जानेवारी २०१५ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली होती. टेंडरमधील अटीशर्तीनुसार १२ महिन्यात रस्त्याचे बांधकाम करून पुढील ३६ महिने त्यांच्याकडे देखभाल दूरूस्तीचा कार्यकाळ निश्चित करण्यात आला होता. मात्र रस्त्याचे खोदकाम सुरू करताच काळ्यामातीचे प्रमाण अधीक असल्याने टेंडररकमेनुसार हे काम परवडत नसल्याचे म्हणत किंमत वाढवा अशी अट टाकत त्या ठेकेदाराने काम थांबवले. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याने त्याचे काही एक ऐकुन न घेता काम सुरू करा म्हणत तगादा लावला. पण ठेकेदार पुढे सरकला नाही. अर्धवट स्थितीत त्याने माघार घेतली.

Aurangabad
Aurangabad : शिवाजीनगर भुयारी मार्ग; मुल्यांकनाला सरकारची मंजुरी

त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात या रस्त्यासाठी १५ कोटी रूपये मंजूर करण्यात आले. टेंडरमध्ये यशस्वी झालेल्या के. एच. कन्सट्रक्शन कंपनोचे खंडू पाटील या ठेकेदाराने मार्गावर चार आरसीसी पूल बांधले. बदल्यात त्याला सार्वजनिक बांधकाम विभागाने ९३ लाख रूपये दिले. मात्र बांधकामात अडथळा निर्माण करणारे इलेक्ट्रीक पोल आणि काही कच्ची पक्की अतिक्रमणे हटवण्याबाबत त्याने अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केला. मात्र विभागाने दुर्लक्ष केले. अखेर या ठेकेदारानेही पहिल्या टप्प्यातील शरणापूर-करोडी रस्त्याला ग्रहण लावले. याबाबत त्याला दंडात्मक कारवाई केली आहे व काम सुरू करायचे आदेशित केल्याचे संबंधित विभागाचे म्हणणे आहे.

Aurangabad
Aurangabad: ओव्हरहेड केबल भूमीगत करण्यासाठी रस्त्यांची लावली 'वाट'

२७ कोटीचा दुसरा टप्प्यातील टेंडर ओपन होईना

यानंतर याच मार्गावरील करोडी ते साजापूर या दुसऱ्या टप्प्यातील रस्त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २७ कोटीचा निधी मंजुर केला. १ डिसेंबर २०२२ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दूरूस्तीसाठी २६ कोटी ९२ लाखाचे अंदाजपत्रक तयार केले. टेंडर प्रसिद्ध केले. त्यात ८ डिसेंबर २०२२ रोजी ड्रीम कन्सट्रक्शन दिल्ली, गंगामाई इंडस्ट्रीज ॲन्ड कंन्सट्रक्शन प्रा. लि. संभाजीनगर, जीएनआय इंन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. संभाजीनगर आणि मुंबईच्या जे. पी. कन्सट्रक्शन कंपनीने सहभाग नोंदवला. मात्र तीन महिन्यांचा कालावधी उलटून देखील इच्छुक ठेकेदारांच्या कागदपत्रांची तपासणी केली जात नाही. तांत्रिक बीड ओपन केले गेले नाही.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com