Sambhajinagar : जागेअभावी रखडले PM ग्रामसडक योजनेतील रस्त्याचे काम

Road
RoadTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ (ए) जालनारोड ते शेंद्राकमंगर ते वरूडकाझी ते कच्चीघाटी ते पळशी रस्त्याचे खडीकरण मजबुतीकरण पूर्ण झाले. ३० छोट्या पुलांपैकी पंधरा पुलांची कामे पुर्ण झाली. मात्र उर्वरीत काही भागातील शेतकऱ्यांनी जागा ताब्यात न दिल्याने काम रखडल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Road
Thane : 600 कोटींच्या रस्त्यांची कामे विशिष्ट ठेकेदारांना मॅनेज

जालनारोडवरून समृद्धी महामार्गाला जोडणारा शेंद्रा कमंगर-वरूडकाझी-कच्चीघाटी-पळशी रस्ता जिल्हा परिषद शाळा वरूड ते समृद्धी महामार्गादरम्यान तसेच पळशी ते पळशीतांडा दरम्यान काही शेतकऱ्यांनी अडविला आहे. शेतकरी जागा देत नसल्याने रस्त्याचे रूंदीकरण करता येत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे जालनारोड ते हिरापुर ते वरूड या रस्त्याचे काम देखील याच कारणाने रखडल्याचे अधिकारी म्हणत आहेत. त्यामुळे वरूडकाझी, सुलतानपुर, पळशी व पळशी तांड्यासह आसपासच्या पंचक्रोशीतील नागरिकांना या दोन्ही  रस्त्यावरून जालनारोडकडे येताना खड्डे, खडी आणि चिखलातून जावे लागत आहे. त्यामुळे जालनारोड ते समृद्धी महामार्गाला जोडणारा रस्ता हा नेहमीच प्रकाशझोतात राहिला आहे. ही अडचण कायमची दूर करण्यासाठी नागरिकांना पर्यायी रस्ते देखील उपलब्ध नाहीत.

Road
Covid Scam: बदलापूर नगरपरिषदेत 600 कोटींवर कोणी केले हात साफ!

एकीकडे शेंद्रा पंचतारांकीत औद्योगिक वसाहत आणि ऑरिक सिटीत उद्योग उभारणीसह शेंद्रा-बिडकीन औद्योगिक वसाहतींना एका रस्त्याने जोडण्याच्या वेगाने घोषणा सुरू असताना शेंद्रा पंचतारांकीत औद्योगिक वसाहत आणि ऑरिक सिटीला जोडणारे आसपासचे पंचक्रोशीतील गावरस्ते मात्र दुरुस्तीकरणापासून नेहमीच दुर्लक्षित राहिले आहेत. याच औद्योगिक वसाहतीला जोडणारा शेंद्रा कमंगर ते वरूडकाझी ते कच्चीघाटी ते पळशी या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. दुचाकी आणि चारचाकी स्वारांसाठी हा मार्ग अत्यंत धोकादायक ठरला आहे. पाणकळ्यात खड्डे तुडुंब भरल्याने रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे. रस्त्यावर किनारही उरली नसल्याने जीव धोक्यात घालून खड्ड्यांमधून अंदाज बांधून दुचाक्या, चारचाकी काढाव्या लागत आहेत. खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली असून रस्ताच खड्ड्यात गेल्याचे पाहायला मिळत आहे.

Road
मुंबई तुंबली तरी Mumbai Metro नाही थांबणार; 'MMRDA'चा मोठा निर्णय

या रस्त्याच्या दुरुस्तीकरणासाठी आमदार हरिभाऊ बागडे यांच्या प्रयत्नाने पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून १० कोटी ५८ लाख ७५ हजार इतका निधी मिळवून दिला आहे. या रस्त्याच्या दर्जोन्नतीसाठी जानेवारी २०२२ मध्ये टेंडर काढण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगर येथील शिवसाई कंन्सट्रक्शनचे संजय वाढणे यांना या रस्त्याचा ठेका मिळाला आहे. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांना वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. एकूण ११.४१० किलोमीटर लांबी आणि ७ मीटर रूंदीच्या रस्त्यात त्यांनी ३० पैकी १५ छोट्या पुलांचे काम केले. १६ व्या पुलाचे काम चालु आहे. रस्त्याचे खडीकरण-मजबुतीकरण करण्यात आलेले आहे. डांबरीकरणासाठी त्यांनी खडीचे डोंगर देखील रस्त्यात उभे केले आहेत. मात्र आता काही शेतकऱ्यांनी तहसिलदारांकडे जागेच्या वादातून तक्रार केल्याने प्रकरण तालुका भूमिअभिलेख कार्यालयाकडे मोजणीसाठी प्रलंबित असल्याने रस्त्याच्या कामाला ग्रहन लागले आहे. याकडे संबंधित विभागांनी दप्तर दिरंगाई न करता तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. आता चार महिने पावसाळ्यात डांबरीकरणाचे काम करता येणार नसल्याने नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे. त्यात खडीच्या डोंगराने निम्मा रस्ता व्यापल्याने वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Road
Nashik: जून संपूनही ना ताळमेळ ना नियोजन; प्रशासक काळात बिघडले गणित

जालनारोडकडून वरूडकाझी, कच्चेघाटी आणि पळशी रस्ता दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. हा रस्ता विकसित करण्याची १२ महिन्याची मुदत होती. पण ठेकेदाराने मुदतीत काम पूर्ण केले नाही. काही शेतकऱ्यांनी जागेचा वाद घातल्याने ठेकेदाराला सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र मुदतवाड दिल्यानंतर देखील काम पुर्ण करण्यात आलेले नाही. याऊलट ठेकेदाराने केलेले खडीकरण व मजबुतीकरण पार उखडून गेल्याने सद्यःस्थितीत रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अनेक वर्षांपासून हा रस्ता आपल्या दुर्दैवावर अश्रू ढाळत आहे. अनेकदा तक्रारी निवेदने देऊनही या रस्त्याचे पूर्णपणे दुरुस्तीकरण करण्यात आले नाही. गतवर्षी आमदार हरिभाऊ बागडे यांच्या प्रयत्नाने या खडतर मार्गासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेथून निधी प्राप्त झाला. ठेकेदारही मिळाला पण आता काही मुठभर शेतकऱ्यांनी विघ्न घातल्याने रस्त्याच्या कामाला ग्रहण लागले आहे.

Road
Pune-Nashik रेल्वेचा पोपट का मेला? रावसाहेब दानवेंचा गौप्यस्फोट...

याच मार्गाने जालनारोडवर खाजगी इंग्रजी माध्यमिक शाळा असून विद्यार्थी, पालक व शिक्षकांना नेहमी या रस्त्याने जाणे येणे करावे लागते. वरूडकाझीसह आसपासच्या पंचक्रोशीतील नागरिक व शेतकरीवर्ग दैनंदिन खरेदी व कामकाजाकरिता नेहमी शहरात येत असतो. कित्येकदा या रस्त्यावरून दुचाक्या घसरून पडल्याने नागरिक जखमी झाले आहेत. रस्त्यासाठी जागा न देणाऱ्या शेतकऱ्यांची बागडे यांनी अनेकदा विनंती करूनही शेतकरी ऐकायला तयार नाहीत. दुसरीकडे हा तिढा सोडवण्यासाठी पंतप्रधान ग्रामसडक सडक योजना कार्यान्वित यंत्रनेणे देखील तहसिलदारांना पत्र दिले आहे. मात्र सरकारी काम बारा महिने थांब याप्रमाणे कागदी घोडे नाचवत प्रत्येक विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे ग्रामस्थांनाकडून बोलले जात आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकरणाची कित्येक वर्षांपासून ओरड सुरु होती. आता निधी असतानाही संबंधित बांधकाम विभाग याकडे डोळेझाक करीत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमधून मार्ग काढतांना मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित बांधकाम विभाग दुर्घटना होण्याचीच वाट बघत आहे की काय असे वाटू लागले आहे. ठेकेदाराने केलेले खडीकरण व मजबुतीकरण देखील उखडून गेल्याचे दिसत आहे. थातुर-मातुर रस्त्यांची डागडुजी करून कागदोपत्री बांधकाम साहित्य दाखवून निधीची आपसात विल्हेवाट लावली जात असल्याचेही आता उघडपणे बोलले जात आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com