मराठवाड्यासाठी गुड न्यूज! जायकवाडी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ₹6,477 कोटींची मान्यता

माजलगाव धरणासह पैठण उजवा आणि माजलगाव उजवा कालव्याची कामे होणार; छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी, नांदेडला फायदा
मराठवाड्यासाठी चांगली बातमी
MarathwadaTendernama
Published on

मुंबई (Mumbai): मराठवाड्यातील सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या जायकवाडी प्रकल्प टप्पा-२ला 6 हजार 477 कोटी 88 लाख रुपयांची पाचवी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निधीला मंजुरी देण्यात आली. या टप्प्यातील विविध कामांमुळे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड या पाच जिल्ह्यांतील 1 लाख 31 हजार 652 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

मराठवाड्यासाठी चांगली बातमी
Sambhajinagar: पूर्णा नदीवरील 10 साखळी बंधाऱ्यांची कामे कालमर्यादेत पूर्ण करा

या निर्णयामुळे गोदावरी खोऱ्यातील सिंदफणा नदीवरील माजलगाव धरणाच्या कामास गती मिळणार आहे. या प्रकल्पामुळे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी व नांदेड या पाच जिल्ह्यातील सुमारे १ लाख ३१ हजार ६५२ हेक्टरला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

जायकवाडी प्रकल्प टप्पा-२ ही पाचवी सुधारित प्रशासकीय मान्यता आहे. यामुळे ४५४ द.ल.घ.मी. साठवण क्षमतेचे माजलगांव धरण अस्तित्वात येणार आहे. यावर माजलगांव (लोणी सावंगी) उपसा योजना, साळींबा ठिबक उपसा योजना, शिरस मार्ग निम्नपात्री बंधारा, रोशनपुरी उच्चपातळी बंधारा व १४८ किलोमीटर लांबीचा माजलगांव उजवा कालवा व त्यावरील ६ मार्गस्थ जलाशय (गल्हाटी, धोंड, उकडगांव, मुरंबी, पेंडू, सुभाषनगर) तसेच माजलगांव मासोळी प्रकल्पाची उंची वाढविण्याचे काम समाविष्ट आहे.

मराठवाड्यासाठी चांगली बातमी
CM War Room: कामे रखडवणाऱ्या कंत्राटदारांना यापुढे नवीन Tender नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

जायकवाडी प्रकल्पाच्या कामाचे दोन टप्प्यांमध्ये नियोजन करण्यात आलेले असून पहिल्या टप्प्यातील जायकवाडी धरण, जायकवाडी प्रकल्पाचा २०८ कि.मी. लांबीचा पैठण डावा कालवा, त्यावरील शाखा कालवे, वितरिका, उप व लघु वितरिका या घटकांचे काम पूर्ण झालेले असून टप्पा दोन हा मराठवाड्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण प्रकल्प आहे.

या प्रकल्पाच्या टप्पा-२ ला ६ हजार ४७७.८८ कोटी रुपयांची पाचवी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याअंतर्गत पैठण उजवा कालवा, माजलगाव धरण आणि माजलगाव उजवा कालव्याशी संबंधित कामे होणार आहेत.

या प्रकल्पाच्या टप्पा दोन अंतर्गत पैठण उजवा कालवा ८६०.२३ कोटी, माजलगाव धरण (उर्वरित कामे) १२२३.४५ कोटी रुपये तर माजलगाव उजवा कालव्याच्या ४,३९४.२० कोटी रुपयांच्या कामाचा समावेश आहे.

मराठवाड्यासाठी चांगली बातमी
Gargai-Dev River Link: सिन्नरच्या दुष्काळावर 13,500 कोटींच्या नदीजोड प्रकल्पाचा उतारा

टप्पा दोन प्रकल्पांतर्गत पैठण उजवा कालव्याद्वारे छत्रपती संभाजीनगर (१,७३२ हे.), अहिल्यानगर (१,६९० हे.) व बीड (३८,२६० हे.) असे एकूण ४१,६८२ हे. व माजलगाव उजवा कालव्याद्वारे बीड (२९,१०५ हे), परभणी (४४,४०८ हे.) व नांदेड (११,३३७ हे.) असे एकूण ८४,८५० हे. व साळींबा ठिबक उपसा सिंचन योजना द्वारे बीड (५,१२० हे.) या पाच जिल्ह्यातील एकूण १,३१,६५२ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

Tendernama
www.tendernama.com