
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : चिकलठाणा, वाळुज आणि शेंद्रा औद्योगिक वसाहतीची कनेक्टीव्हीटी वाढविण्यासाठी एमआयडीसीने तब्बल १२८ कोटी १२ लक्ष ३९ हजार इतक्या किमतीच्या नक्त विकासकामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. याकामांसाठी कोट्यावधी रूपयांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. मजबूत रस्त्यांचे जाळे निर्मितीसह अनेक मुलभूत सुविधांची कामे पूर्णत्वास जाणार आहेत. अनेक नव्या कामांना चालना मिळाली आहे.
काय म्हणाले उद्योगमंत्री
ही सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत. ती गुणवत्तापूर्ण असावीत. चांगले रस्ते निर्मितीमुळे विकासाची प्रक्रिया अधिक कशी गतिमान होईल, यावर मर देत अधिकाऱ्यांनी ठेकेदारांकडून दर्जेदार कामे करून घ्यावीत. रस्ते होतील पण ते २५ वर्ष टिकलेच पाहिजेत, पुन्हा निकृष्ट कामे झाल्याच्या तक्रारी नको. याला अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल. वाईट कामांच्या तक्रारी आल्यावर कारवाईपेक्षा येथील चांगल्या कामासाठी मला सत्कार करण्याची संधी द्या असे उद्गार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भूमिपूजन प्रसंगी काढले. यावेळी खा. इम्तियाज जलिल, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार राज्यमंत्री अतुल सावे, उप महापौर राजु शिंदे उपस्थित होते.
राज्य सरकारच्या निधीतून चिकलठाणा, वाळुज आणि शेंद्रा पंचतारांकीत औद्योगिक वसाहतींमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर मुलभूत सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे, माजी उप महापौर राजु शिंदे तसेच मसिआचे अध्यक्ष किरण जगताप व इतर उद्योजकांनी एमआयडीसीसाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे तगादा लावला होता. लोकप्रतिनिधींनी सुचविलेली एमआयडीसी अंतर्गत रस्ते, गटारे, पथदिवे, जलवाहिनी व अन्य मुलभूत पायाभुत सुविधांकरीता भरघोस निधी सामंत यांनी उपलब्ध करून दिला आहे. ही कामे प्राधान्याने आणि दर्जेदारपणे पूर्ण करावीत, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी सांगितले.
चिकलठाणा, वाळुज आणि शेंद्रा औद्योगिक वसाहतीसाठी ८६ कोटीतून होणाऱ्या विकासकामांचे मंत्री सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. खा. इम्तियाज जलिल, पालक मंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्रीअतुल सावे, माजी उप महापौर राजु शिंदे, मसिआचे अध्यक्ष किरण जगताप, एमआयडीसीचे मुख्य अभियंता राजेंद्र केंद्रे, कार्यकारी अभियंता रमेशचंद्र गिरी तसेच माजी नगरसेवक आनंद घोडेले एमआयडीसीचे अधिकारी व उद्योजक यावेळी उपस्थित होते.
उद्योजकांना कसा होणार फायदा
कामाचे नाव : चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांची दुरूस्ती व मजबुतीकरण
अंदाजित :किंमत : ३९ कोटी ३३ लाख २२ हजार ५८८ रुपये.
प्रशासकीय मान्यता : ६८ कोटी ३४ लाख ६४ हजार (नक्त ) ७८ कोटी ५९ लाख ८४ हजार ( उक्त)
तांत्रिक मान्यता : ४८ कोटी ७३ लाख २६ हजार रूपये
कामाचे वैशिष्ट : या कामात ७.५० मीटर रूंदीचे ६.१३ किमी.५.५० मीटर रूंदीचे, ४.५० किमी व ३.७५ मीटर रूंदीचे ८.२० किमी असे एकुन १८.८० किमी चे रस्ते बाधले जाणार आहेत.
कामाचे महत्व : या रस्त्यांना १५० एमएम चे जीएसबी, व डब्लुएम १०० एमएम तसेच डीएलसी आणि २५० एमएम चा पीक्युसी ने मजबुत केले जाणार आहेत. सिमेंट काॅक्रीटने रस्ते मजबुत बनवले जाणार असल्याने उद्योजकांची चांगली सोय केली जाणार आहे.
कामाची सद्यःस्थिती : या कामासाठी ३९ कोटी ३३ लाख २२ हजार ५८८ इतक्या अंदाजित किमतीच्या ई - निविदा २४ एप्रिल २०२३ रोजी मागविण्यात आल्या होत्या. प्राप्त निविदा २८ एप्रिल २०२३ रोजी उघडण्यात येणार आहेत.
शेंद्रा पंचतारांकीत औद्योगिक क्षेत्र
कामाचे नाव : डीएमएलटीचे काॅक्रीटीकरण करणे
अंदाजित किंमत : ११ कोटी ५६ लाख १४ हजार ०४० रूपये
प्रशासकीय मान्यता : १२ कोटी ९० लाख ८६ हजार ( नक्त ) व १४ कोटी ८४ लाख ४९ हजार (ठोक)
तांत्रिक मान्यता : १४ कोटी ३२ लाख ४७ हजार (नक्त )
कामाचे वैशिष्ट : यातून दोन कि.मी.लांबीच्या जुन्या चार पदरी (७.५०×२)=१५ मी.रूंदीच्या काॅक्रीट रस्त्याचे बांधकाम केले जाणार आहे.
कामाचे महत्व : या रस्त्यामुळे शेंद्रा औद्योगिक क्षेत्रातील डी आराखडा , फुडपार्क , डी.एम.आय.सी. तसेच प्रस्तावित जयपुर औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना चांगल्या प्रकारचा रस्ता उपलंब्ध होऊन कच्च्या व पक्क्या मालाची ने - आण करणे सुलभ होईल व पर्यायाने या उद्योगांच्या उत्पादनात वाढ होऊन औद्योगिक विकासास चालना मिळेल.
कामाची सद्य: स्थिती : सदर कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली असून , टेंडर मंजुरीकरिता वरीष्ठ कार्यालयास २४ मार्च २०२३ रोजी प्रस्ताव सादर केलेला आहे.
शेंद्रा पंचतारांकीत औद्योगिक क्षेत्र
कामाचे नाव : स्कोडा कंपनी येथे टेकडी जलकुंभापर्यंत शेंद्रा येथे डी.आय.के - ७ प्रकारच्या जलवाहिनी टाकणे.
अंदाजित किंमत : ९ कोटी १४ लाख ४० हजार २६० रूपये
प्रशासकीय मान्यता : ११ कोटी ८७ लाख ०७ हजार (नक्त) १३ कोटी ६५ लाख (ठोक)
तांत्रिक मान्यता ११ कोटी ३२ लाख ९४ हजार (नक्त )
कामाचे :
वैशिष्ट: शेंद्रा औद्योगिक क्षेत्रातील स्कोडा कंपनी ते टेकडी जलकुंभापर्यंत ९०० मि.मी.व्यासाची ३८०० मि. लांबीची जलवाहिनीचे जाळे पसरवले जाणार आहे.
कामाचे महत्व : शेंद्रा डिएमआयसी व जालना औद्योगिक क्षेत्राकरिता पाणीपुरवठ्यासाठी टाकण्यात आलेली ९०० मि.मी. व्यासाची मे. स्कोडा कंपनी जवळ जलवितरण व्यवस्थेत जोडण्यात आलेली आहे. शेंद्रा , डिएमआयसी व जालना औद्योगिक क्षेत्र यांना यामुळे मुबलक पाणीपुरवठा करताना अडचणी निर्माण होत होत्या. यास्तव मे. स्कोडा कंपनी व शेंद्रा औद्योगिक क्षेत्रातील टेकडीवरील जलकुंभापर्यंत उर्वरित ३८०० मीटर लांबीच्या ९०० मि.मी. व्यासाच्या डी.आय.के. प्रकारच्या जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शेंद्रा , जालना टप्पा क्र.१ ते ३ व डीएमआयसी शेंद्रा व बिडकीन येथील उद्योजकांना मुबलक व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. उद्योजकांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने उत्पादनात वाढ होऊन या भागाच्या औद्योगिक व आर्थिक विकासात व महामंडळाच्या महसुलात वाढ होईल.
कामाची सद्यःस्थिती : सदर कामाचे टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली असून , टेंडर मःजुरीकरिता वरीष्ठ कार्यालयास १७ मार्च २०२३ रोजी प्रस्ताव सादर केलेला आहे.
शेंद्रा पंचतारांकीत औद्योगिक क्षेत्र
कामाचे नाव : शेंद्रा पंचतारांकीत औद्योगिक क्षेत्रांतर्गत ई - १ ते ४ तसेच स्कोडा कंपनीच्या मागील ई - २ झेड.वाय.बी.आणि लिभेर स्टरलाईटच्या समोरील रस्ता झेड , झेड - २ , एक्स - ६ एक्स वाय चे डांबरीकरण करणे
अंदाजित रक्कम : ६ कोटी ९६ लाख ४० हजार १४२ रूपये.
प्रशासकीय मान्यता : अंदाजपत्रकीय रक्कम रूपये ९ कोटी ७ लाख ३३ हजार (नक्त ) १० कोटी ४३ लाख ४३ हजार (ठोक)
तांत्रिक मान्यता : १० कोटी ४३ लाख ४३ हजार
कामाचे वैशिष्ट : १) ४.०० कि.मी. लांबीच्या ५.५० मी.रूंदीच्या रस्त्याचे डांबरीकरण करणे.
२) पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी रस्त्यालगत प्रिकास्ट आर.सी.सी. गटार बांधणे.
कामाचे महत्व : या रस्त्यामुळे शेंद्रा औध्योगिक क्षेत्रातील ए आणि बी आराखड्यातील उद्योजकांना चांगल्या प्रकारचा रस्ता उपलब्ध होऊन कच्च्या व पक्क्या मालाची ने - आण करणे सुलभ होईल व या उद्योगांच्या उत्पादनात वाढ होईल.
कामाची सद्यःस्थिती : सदर कामाचे टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून मंजुरीकरिता प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला २३ मार्च २०२३ रोजी पाठवण्यात आला आहे.
वाळुज औद्योगिक क्षेत्र
कामाचे नाव : पाटोदा ते गेवराई तांडा रस्त्याचे रूंदीकरण व मजबुतीकरण करणे.
अंदाजित रक्कम : १० कोटी ८८ लाख २८ हजार ४१७ रूपये.
प्रशासकीय मान्यता : १५ कोटी १४ लाख १७ हजार (नक्त ) १६ कोटी ८४लाख ९४हजार (ठोक)
तांत्रिक मान्यता : १३ कोटी ४८ लाख ३८ हजार (नक्त )
कामाचे वैशिष्ट : या कामात ५ . कि.मी. लांबीच्या जुन्या खडी, मातीच्या रस्त्याचे ३.५० मीटर ७.५० मी. रूंदीपर्यंत रूंदीकरण व मजबुतीकरण करून डांबरीकरण करणे.
कामाचे महत्व : या रस्त्यामुळे वाळुज औद्योगिक क्षेत्र ते चितेगाव , बिडकीन , पैठण, खांडेवाडी या ठिकाणचा औद्योगिक क्षेत्राचा जोडरस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल. तसेच या रस्त्यामुळे वाळुज औद्योगिक क्षेत्र हे डी.एम.आय.सी. अंतर्गत विकसित केलेल्या बिडकीन औद्योगिक क्षेत्रातशी जोडले जाणार असल्यामुळे याचा फायदा या सर्व क्षेत्रातील उद्योजकास व पाटोदा , गेवराई तांडा, खांडेवाडी परिसरातील नागरिकास होऊन या भागातील उद्योगवाढीस चालना मिळेल.
कामाची सद्यःस्थिती : या कामासाठी १० कोटी ८८ लाख २८ हजार ४१७ इतकया रकमेच्या ई - टेंडर १३ एप्रिल २०२३ रोजी मागविण्यात आले आहे. प्राप्त टेंडर १९ मे २०२३ रोजी उघडण्यात येणार आहे.
वाळुज औद्योगिक क्षेत्र
कामाचे नाव : भूखंड क्र.- एच - १५ ते सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गापर्यंत रस्त्याचे बांधकाम करून डांबरीकरण करणे
अंदाजित रक्कम : ६ कोटी ९० लाख ६५ हजार २०० रूपये.
प्रशासकीय मान्यता : ९ कोटी १७ लाख ४२ हजार (नक्त ) १० कोटी ५५ लाख ०४ हजार (ठोक)
तांत्रिक मान्यता : ८ कोटी ५५ लाख ७१ हजार ७८३ रूपये (नक्त )
कामाचे महत्व : या रस्त्यामुळे घाणेगाव , जोगेश्वरी , ईटावा या परिसरातील नागरीक व वाळुज औद्योगिक क्षेत्रातील E , F, G, H, K, L, M आराखड्यातील उद्योजक यांना छत्रपती संभाजीनगर व मुंबईकडे जाण्यासाठी जवळचा पर्यायी रस्ता उपलब्ध होईल. व वाळुज औद्योगिक क्षेत्रातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल. या रस्त्यामुळे वाळुज औद्योगिक क्षेत्रातील तसेच औद्योगिक क्षेत्रालगत खाजगी जागांवरील उद्योग वाढीस चालना मिळेल. या क्षेत्रातील उद्योग हे निर्यातशिल असल्याने पर्यायाने निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होईल.
कामाची सद्यःस्थिती : सदर कामासाठी ६ कोटी ९० लाख ६५ हजार २०० इतक्या अंदाजित किमतीच्या ई - टेंडर १३ एप्रिल २०२३ रोजी मागविण्यात आले आहे.प्राप्त टेंडर ११ मे २०२३ रोजी उघडण्यात येणार आहे.
वाळुज औद्योगिक क्षेत्र
कामाचे नाव : एल सेक्टरमधील रस्त्याचे ५० मिमी जाडीचे बीएम व २५ मिमी जाडीचे ए.सी. सहित मजबुतीकरण करणे.
अंदाजित रक्कम : १ कोटी १९ लाख ७३ हजार ६१९ रूपये.
प्रशासकीय मान्यता : १ कोटी ६० लाख ८९ हजार (नक्त ) १ कोटी ८५ लाख २ हजार (ठोक)
तांत्रिक मान्यता : १ कोटी ४८ लाख ३५ हजार ३१४ रूपये (नक्त )
कामाचे वैशिष्ट : या कामात २. कि.मी. लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण करणे.
कामाचे महत्व : या रस्त्यामुळे वाळुज औद्योगिक क्षेत्रातील एल आराखड्यातील उद्योजकांना चांगल्या प्रकारचे रस्ते उपलब्ध होऊन कच्च्या व पक्क्या मालाची ने - आण करणे सुलभ होईल व पर्यायाने या उद्योगांच्या उत्टादनात वाढ होऊन निर्यात वाढीस हातभार लागेल.
कामाची सद्यःस्थिती : सदर कामाचा कार्यारंभ आदेश २० एप्रिल २०२३ रोजी देण्यात आला आहे.