मराठवाड्यातील 'त्या' महत्त्वाच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी सरकार देणार 181 कोटी

Minister Hasan Mushrif: २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन आर्थिक वर्षांसाठींच्या खर्चासाठी प्रशासकीय मान्यता
विधिमंडळ पावसाळी अधिवेशन
Mumbai, Maharashtra Assembly's Monsoon SessionTendernama
Published on

मुंबई (Mumbai): बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने १८१ कोटींच्या प्रशासकीय मान्यता दिल्या आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिली.

विधिमंडळ पावसाळी अधिवेशन
Exclusive: देवेंद्र फडणवीसांच्या आदेशालाच 'सामाजिक न्याय'कडून वाटाण्याच्या अक्षता!

विधानसभा सदस्य नमिता मुंदडा, श्रीजया चव्हाण यांनी विधानससभेत प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री मुश्रीफ म्हणाले की, अंबेजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये १५० एमबीबीएस व ८७ पीजी विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेनुसार शैक्षणिक व रुग्णसेवा सुविधा असून, क्षमतेच्या तुलनेत रुग्णसंख्या अधिक असल्याने तातडीने सुधारणा आवश्यक आहे.

त्यासाठी २८० खाटांची दुरुस्ती, २५० क्षमतेच्या वसतिगृहाचे बांधकाम, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, डांबरी रस्त्यांचे बांधकाम, जीएनएम नर्सिंग महाविद्यालयाचे बीएससी नर्सिंगमध्ये रुपांतर करणे यासाठी २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन आर्थिक वर्षांसाठी १८१ कोटी रुपयांच्या खर्चासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

विधिमंडळ पावसाळी अधिवेशन
Ajit Pawar: थेट रस्त्यावर उतरून अजितदादांनी प्रशासनाला लावले कामाला

याचबरोबर रिक्त प्राध्यापक पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती प्रक्रिया सुरू आहे. महाविद्यालयात कॅन्सर उपचारासाठी एल-१, एल-२, एल-३ सुविधांची उभारणी करण्यात येणार असून, त्यासाठी नवीन धोरण लवकरच मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार आहे.

तसेच, न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, कार्डिओलॉजी यासारख्या सुपर स्पेशालिटी सेवा उपलब्ध होण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘एनपीएनजीसी’ योजनेंतर्गत प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. या सर्व आरोग्य सुविधा या आर्थिक वर्षातच कार्यान्वित करण्यात येतील, असे आश्वासनही मुश्रीफ यांनी सभागृहात दिले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com