Ajit Pawar: थेट रस्त्यावर उतरून अजितदादांनी प्रशासनाला लावले कामाला

Hinjawadi IT Park: ‘आता कोणाची गय करायची नाही', अजितदादांनी काय दिले आदेश?
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंजवडी आयटी पार्कला भेट दिली
AJit PawarTendernama
Published on

पुणे (Ajit Pawar Visit To Hinjawadi IT Park): मागील काही काळापासून वेगवेगळ्या समस्यांमुळे चर्चेत असलेल्या हिंडवडी आयटी पार्क आणि परिसरातील समस्यांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: लक्ष घातले आहे. समशांच्या गर्देत जात असलेल्या हिंजवडी आयटी पार्कला अजित पवार हे वाचविणार का याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंजवडी आयटी पार्कला भेट दिली
मुंबईत समुद्रातच उभारणार देशातील सर्वोत्तम विमानतळ; फडणवीसांचा काय आहे प्लॅन?

हिंजवडी आयटी पार्कातील रस्त्यांची दुरवस्था, रस्त्यांना येणारे तळ्यांचे स्वरूप, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे येथील कर्मचारी आणि रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक, आयटीयन्स, लोकप्रतिनिधी आदींनी गुरुवारी (ता. ९) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन, त्यांच्यासमोर आक्रमकपणे वस्तुस्थिती मांडली.

हिंजवडी परिसरात काम करणाऱ्या पीएमआरडीए, एमआयडीसी, मेट्रो, जिल्हा प्रशासनासह पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन यांच्यात समन्वय साधून कार्यवाही करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

त्यानंतर तीनच दिवसांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः पाहणी करत ‘आता कोणाची गय करायची नाही’ असे संकेत देत समस्याग्रस्त भागासह, हिंजवडीतील रस्ते, पाणी तुंबण्याची ठिकाणे व मेट्रो मार्गिकाच्या कामांची पाहणी केली. आयटीतील समस्या तत्काळ सोडविण्याचे आदेश जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यां‍ना दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंजवडी आयटी पार्कला भेट दिली
सरकारचा मोठा निर्णय; शेतजमिनीच्या वाटणीवरून होणारे वाद टळणार

राजीव गांधी आयटी पार्क हिंजवडी-माण परिसरातील समस्यांचा आढावा घेत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता. १३) सकाळी सहा वाजल्यापासूनच पाहणी केली. विकास कामांबाबत ‘जो आडवा येईल, त्याला उचला’ अशा स्पष्ट शब्दांत आदेश देत समस्यामुक्त हिंजवडीसाठी त्यांनी अधिकाऱ्यांना कार्यवाही व कारवाई संदर्भात मोकळीक दिली.

आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, एमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीसीएमसीचे आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, मुख्य अभियंता रिनाज पठाण यांच्यासह हिंजवडी-माण येथील रहिवासी, अनक्लॉग हिंजवडी मोहीम व आयटी फोरमचे सदस्य उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंजवडी आयटी पार्कला भेट दिली
Pune: जमिनींच्या पोटहिश्श्यांबाबत 'भूमी अभिलेख'ने काय घेतला निर्णय?

आयटी संघटनांच्या तक्रारी
अनक्लॉग हिंजवडी मोहिमेतील सदस्यांनी समस्या व उपाययोजनांबाबत ५७ पानांचा अहवाल मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सादर केला होता. त्याचा आधार घेत त्यांनी हिंजवडी मेट्रो स्थानक क्रमांक सहा (क्रोमा), स्थानक क्रमांक तीन, स्थानक क्रमांक दोन, हेलिपॅड सर्कल, हिंजवडी-माण रस्ता आणि माणगाव आदी ठिकाणाची पाहणी केली. आयटी पार्कमधील रस्त्यांच्या दुरवस्थेसह इतर समस्यांवर तातडीने कारवाई करण्याचा आदेश दिला.

अजित पवार म्हणाले....
- विकास कामांत आडवे येईल त्याला उचला, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा
- स्वतःच्या मालकीची जागा जात असेल त्यांना टीडीआर देऊ
- नुकसान होऊ देणार नाही पण, सरकारच्या कोणत्याही विभागाचा रस्ता असेल तर त्यासाठी परत पैसे दिले जाणार नाहीत.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंजवडी आयटी पार्कला भेट दिली
Hinjawadi मधील रस्त्यांचा आता Water Park होऊ देऊ नका! मुंबईतील बैठकीत नेमके काय ठरले?

हिंजवडीतील रस्त्यांच्या दुरवस्थेसह इतर समस्यांवर तातडीने कारवाई करण्याचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला. आमच्या सूचनाही ऐकून घेतल्या.
- पवनजीत माने, अध्यक्ष, एफआयटीई

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीची तातडीने पाहणी केली. क्रोम मॉल मेट्रो स्थानकाचा रस्त्याला अडथळा ठरणारा जिना हलविण्याचे त्यांनी आदेश दिले. ही नक्कीच स्वागतार्ह बाब आहे.
- अंकित कोठारी, सदस्य, अनक्लॉक हिंजवडी

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com