'घाटी'चा कायापालट! मराठवाड्यातील आरोग्य सेवेत होणार मोठी क्रांती

छत्रपती संभाजीनगरच्या आरोग्य व्यवस्थेचा कायापालट होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्य सरकारची मोठी घोषणा
Devendra Fadnavis, Maharashtra Government, MantralayaTendernama
Published on

मुंबई (Mumbai): छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) हे मराठवाड्याचे आरोग्य केंद्र म्हणून ओळखले जाते. आता या रुग्णालयाचा दर्जा उंचावून त्याला 'एम्स' (AIIMS) चा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे आक्रमकपणे पाठपुरावा करणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानपरिषदेत केली. यामुळे मराठवाड्याच्या आरोग्य सेवेत मोठी क्रांती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्य सरकारची मोठी घोषणा
Samruddhi Mahamarg News: महामार्गावर वीज निर्मितीचा देशातील पहिला प्रयोग 'समृद्धी'वर

विधानपरिषदेत सदस्य विक्रम काळे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या 'घाटी' रुग्णालयाला एम्सचा दर्जा मिळण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना मंत्री मुश्रीफ यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

"राज्यातील काही शासकीय रुग्णालये सध्या एम्सच्या तोडीच्या सुविधा देत आहेत. जर 'घाटी'ला हा अधिकृत दर्जा मिळाला, तर केंद्राकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होईल आणि अत्याधुनिक उपचार सामान्यांपर्यंत पोहोचतील," असे त्यांनी नमूद केले.

केंद्र सरकारने २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात एम्ससाठी तब्बल ११,३०७ कोटी रुपयांची तरतूद केली असून, चार नवीन संस्था स्थापन करण्याचे धोरण जाहीर केले आहे. हीच संधी ओळखून मुख्यमंत्री स्तरावरून केंद्र सरकारकडे तातडीने प्रस्ताव पाठवला जाणार आहे. या प्रस्तावाचा व्यक्तिशः पाठपुरावा करण्याची ग्वाही मंत्री मुश्रीफ यांनी दिली. या प्रक्रियेत केंद्राचा निधी मिळाल्यास पायाभूत सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या वाढण्यास मदत होईल.

राज्य सरकारची मोठी घोषणा
Mumbai: जाहिरातींतून ST कमावणार 250 कोटींचा महसूल; 'लालपरी'ने शोधला कमाईचा नवा मार्ग

अहिल्यानगर वैद्यकीय महाविद्यालयाबाबतही स्पष्टोक्ती

यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी अहिल्यानगर (अहमदनगर) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत महत्त्वाची माहिती दिली. या महाविद्यालयासाठी तीन जागांची निवड करण्यात आली असून, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व मंत्री गिरीश महाजन यांची समिती लवकरच जागेचा अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘घाटी’ मराठवाड्यासाठी का महत्त्वाचे?

'घाटी' रुग्णालय हे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह खान्देशातील रुग्णांसाठीही आधारवड आहे. सध्या येथील वाढता रुग्णसंख्या पाहता, खाटांची कमतरता आणि अद्ययावत उपकरणांची गरज भासत आहे. 'एम्स'चा दर्जा मिळाल्यास रुग्णालयाच्या विस्तारासाठी केंद्र सरकारचा हजारो कोटींचा निधी मिळेल. उच्च दर्जाचे वैद्यकीय संशोधन येथे शक्य होईल. हृदयविकार, कर्करोग आणि मेंदूविकारांवरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया स्वस्त दरात उपलब्ध होतील.

राज्य सरकारची मोठी घोषणा
छत्रपती संभाजीनगर, नागपूरकरांना सरकारने दिली गुड न्यूज

घाटी रुग्णालयाला एम्सचा दर्जा मिळाल्यास मराठवाड्यातील गोरगरीब जनतेला उपचारासाठी मुंबई-पुण्यासारख्या शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही. हा दर्जा मिळवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.

- हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण मंत्री

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com