Mumbai: जाहिरातींतून ST कमावणार 250 कोटींचा महसूल; 'लालपरी'ने शोधला कमाईचा नवा मार्ग

पाच वर्षांसाठी जाहिरात टेंडर मंजूर; बसस्थानके, बसेस आणि परिसरातील जाहिरातींमधून महसूलवाढीचा आराखडा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
ST Bus Stand - MSRTCTendernama
Published on

मुंबई (Mumbai): राज्यभर धावणारी एसटीची ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांची वाहतूक करणारे साधन राहिलेले नाही. उलट ती एसटी महामंडळासाठी मोठ्या महसूलवाढीचे माध्यम ठरणार आहे. पुढील पाच वर्षांत जाहिरातींच्या माध्यमातून एसटी महामंडळाला तब्बल २५० कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
Samruddhi Mahamarg News: महामार्गावर वीज निर्मितीचा देशातील पहिला प्रयोग 'समृद्धी'वर

मंत्रालयातील एसटी महामंडळाच्या मुख्यालयात पार पडलेल्या संचालक मंडळाच्या ३१० व्या बैठकीनंतर सरनाईक यांनी ही माहिती दिली. या बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सहाय्यक कामगार आयुक्त पल्लवी सहारे यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

राज्यात एसटी महामंडळाची सुमारे २५१ आगारे आणि ६१० हून अधिक लहान-मोठी बसस्थानके कार्यरत आहेत. जवळपास १२ हजार बसेसच्या ताफ्याद्वारे दररोज ५० ते ५५ लाख प्रवाशांची ने-आण केली जाते. भविष्यात बससंख्या वाढल्यास ही प्रवासी संख्या एक कोटींच्या आसपास पोहोचू शकते, असे सरनाईक यांनी सांगितले. एवढ्या व्यापक संपर्कक्षमतेमुळे एसटी हे जाहिरातींसाठी प्रभावी माध्यम ठरू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
सिंहस्थ कुंभमेळा 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वरसाठी पायाभूत सुविधा व सांस्कृतिक आराखडा अंतिम टप्प्यात

बसस्थानके, त्यांचा परिसर, बसेसच्या आतील आणि बाहेरील भाग तसेच उपलब्ध असलेली इतर जागा यांचा वापर करून जाहिरात महसूल वाढविण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी स्पर्धात्मक टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली असून, पुढील पाच वर्षांसाठी २५० कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल देणारे टेंडर मंजूर करण्यात आले आहे.

सध्या कार्यरत असलेल्या जाहिरात परवानाधारकांचा करार संपल्यानंतर जाहिरातींचे अधिकार नव्या परवानाधारकांकडे दिले जाणार आहेत.

सध्या एसटी महामंडळाला जाहिरातींतून दरवर्षी सुमारे २२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. नव्या टेंडरमुळे या उत्पन्नात दुपटीहून अधिक वाढ होण्याची अपेक्षा आहे. तिकीट विक्रीव्यतिरिक्त पर्यायी स्रोतांमधून उत्पन्न वाढविणे ही एसटीसाठी दीर्घकालीन आर्थिक स्थैर्याची दिशा ठरेल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com