छत्रपती संभाजीनगर, नागपूरकरांना सरकारने दिली गुड न्यूज

हुडकोकडून 2 हजार कोटींचे कर्ज; छत्रपती संभाजीनगर 822 कोटी, नागपूर 268 कोटी, मीरा भाईंदरसाठी 116 कोटी मिळणार
राज्य सरकारची मोठी घोषणा
Devendra Fadnavis, Maharashtra Government, MantralayaTendernama
Published on

मुंबई (Mumbai): नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेअंतर्गत राज्यातील विविध महापालिकांना विविध प्रकल्प पूर्ण करण्याकरिता स्वहिश्याचा निधी उभारण्याकरिता हुडकोकडून २००० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

राज्य सरकारची मोठी घोषणा
'ते' प्रकल्प ठरणार नागपूरच्या विकासात गेम चेंजर

या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्पासाठी ८२२ कोटी २२ लाख रुपये, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या चार मलनि:स्सारण प्रकल्पासाठी २६८ कोटी ८४ लाख रुपये, मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी ११६ कोटी २८ लाख रुपयांचे कर्ज उभारणी करता येणार आहे.

राज्य सरकारची मोठी घोषणा
दहिसर, मीरा-भाईंदरवासियांना दिलासा; 'त्या' टोल नाक्याबाबत आली मोठी बातमी

राज्यातील विविध महापालिका क्षेत्रात केंद्र पुरस्कृत अमृत २.० अभियान, स्वच्छ भारत अभियान २.०, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान व इतर केंद्र व राज्य स्तरावरील पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत.

हे प्रकल्प निधीअभावी निधी रखडू नयेत व वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजना व त्यातून निधी उभारण्याची कार्यपद्धती निश्चित करून देण्यात आली आहे. त्यानुसार या महापालिकांना व इतरही महापालिकांना स्वहिश्शाचा निधी उभारता यावा यासाठी पहिल्या टप्प्यात हुडकोकडून दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com