शेंद्रा ते वाळूजपर्यंत डबलडेकर उड्डाणपुलाची घोषणा

Aurangabad
AurangabadTendernama
Published on

औरंगाबाद (Aurangabad) : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि मेट्रोतर्फे (Metro) संयुक्तपणे शेंद्रा ते वाळूजपर्यंत डबलडेकर उड्डाणपूल बांधणार असून, त्यासाठी सहा हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी जाहीर केले.

Aurangabad
गडकरींच्या दाव्याला तडा; ४५० कोटींच्या रस्त्याला भेगाच भेगा

औरंगाबाद येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पन कार्यक्रमावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, शेंद्रा एमआयडीसी ते वाळूजपर्यंत एनएचएआयच्या उड्डाणपुलासाठी आणि मेट्रोरेलचा संयुक्त डीपीआर तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्याची लांबी २५ किमी आहे. यात चौपदरी उड्डाणपूल १६ किमी आणि ९ किमीच्या डबलडेकर पूलाचा समावेश आहे. हा सहा हजार कोटींचा संयुक्त प्रकल्प असेल.

Aurangabad
'समृद्धी'वर वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी तब्बल 'इतके' कोटी खर्च

२०२४ पर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात २५ हजार कोटींची कामे सुरू करून पूर्ण करण्याचा दावा करीत गडकरी म्हणाले, शेंद्रा एमआयडीसी ते चिकलठाणा या चौपदरी उड्डाणपूलाची लांबी साडेसात किमी असून, हा रस्ता आठ पदरी असेल. चिकलठाणा ते क्रांती चौकपर्यंत ८.५ किमी अंतर्गत डबलडेकर उड्डाणपूल असेल.

एमआयडीसी पर्यंत ९ किमीचा चौपदरी पूल व रस्ता खाली असेल . शेंद्रा ते वाळूज २५ किमी रेल्वेपूल ३० ते ४५ मीटरचा असेल. रेल्वेपुलाखाली आठ पदरी रस्ता व चौपदरी रस्ता असेल. ३० मीटरच्या पुलाखाली चौपदरी रस्ता व पूल असेल.

Aurangabad
लोकांनी सोडला नोकऱ्यांचा नाद; 'ब्लूमबर्ग'चा धक्कादायक अहवाल

औरंगाबादेत मेट्रोसाठी डीपीआरचे काम होत आहे. त्यात दोन कॅरिडाॅर होत आहेत. चिकलठाणा ते क्रांतीचौक असा १२ किमी मार्ग असेल. या अंतरात ९ किमी डबलडेकरचा उड्डाणपूल असेल. दुसरा मार्ग हर्सूल ते सिडको बस स्थानकापर्यंत १३ किमी मार्ग असेल. २०१४ साली जिल्ह्यात १४५ किमी राष्ट्रीय महामार्ग होता. त्यानंतर ४५० किमी नवीन महामार्ग जिल्ह्यासाठी देण्यात आले. सध्या ५९५ किमी महामार्ग जिल्ह्यात आहेत. ७ वर्षांत ४ हजार ४२२ कोटींच्या कामांपैकी ५ पूर्ण, ८ बाकी आहेत. २२५३ कोटींची चार कामे प्रस्तावित असून सीआरएफमधून ४०० कोटींची ३० कामे पूर्ण केली आहेत.

Aurangabad
तहान लागल्यावर विहीर खोदणार का?; टंचाईची कामे फायलीतच

औरंगाबादेत १०० कोटीतून पीटलाईन करू : दानवे

जालन्यात रेल्वेची १०० कोटीची पीटलाईन पळविण्यात आल्यामुळे भाजपत अंतर्गत राजकारण सुरू झाले होते. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचीच वक्तव्ये एकमेकांविरोधात सुरू झाली होती. रविवारी गडकरी याच्यासमक्ष दानवे यांनी औरंगाबादमध्येही १०० कोटीतून एक पीटलाईन करून टाकतो, असे जाहिर करत पक्षांतर्गत सुरू असलेल्या वादाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com