वाट पाहीन पण 'खड्ड्या'तूनच जाईन!

Aurangabad Bus Stand
Aurangabad Bus StandTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबादेत एसटीचे (MSRTC) विभागीय कार्यालय असताना देखील बसस्थानक परिसरात अंर्तगत रस्त्यांवर मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य असून, त्याकडे एसटी महामंडळातील अधिकारी कानाडोळा करत आहेत. अचानक एखादी बस आल्यास प्रवाशांना खड्डे चुकविताना मोठी कसरत करावी लागत असून, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रवाशांना दररोज तोंड द्यावे लागणाऱ्या समस्येकडे लक्ष द्यायला प्रशासनाला वेळच नाही. 'वाट पाहीन पण एसटीनेच जाईन', असे म्हणण्याएवजी औरंगाबाद बसस्थानकातून (Bus Stand) ये-जा करणाऱ्या प्रवाशांवर मात्र 'वाट पाहीन पण 'खड्ड्या'तूनच जाईन' असे म्हणण्याची वेळ प्रशासनाने आणली आहे.

Aurangabad Bus Stand
दुरुस्तीसाठीचे पाच कोटी गेले कुठे?

मागील वर्षीच्या अतिवृष्टीने औरंगाबादेतील बसस्थानक व आजूबाजूच्या रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले असून, या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. संपूर्ण बसस्थानकच खड्ड्यात गेले आहे. याचा त्रास प्रवासी, नागरिक व विद्यार्थ्यांना होत आहे. मात्र कोट्यवधीचा महसूल प्रवाशांच्या खिशातून उकळणाऱ्या एसटी महामंडळाला जराही प्रवाशांबाबत सामाजिक बांधिलकी उरली नाही, असा आरोप करत त्वरित खड्डे बुजवा अन्यथा आम्ही लोकसहभागातून खड्डे बुजवू, असा इशारा औरंगाबादेतील समाजसेवक मनोज बोरा यांनी एसटी महामंडळाला दिला आहे.

Aurangabad Bus Stand
आस्तिककुमार पांडेंचा मोठा निर्णय... ठेकेदारांच्या हात सफाईला लगाम

बसस्थानक परिसरातील अंर्तगत रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांतील दगड, खडी आणि वाळू बाहेर पसरली आहे. रस्त्यावर डांबरीकरणाचा सरफेस औषधालाही शिल्लक राहिलेला दिसत नाही.अचानक एखादी बस आल्यास खड्ड्यात पाय पडू नये म्हणून प्रवाशांची मोठी धावपळ होत आहे. या धावपळीत एखादा अपघात होण्याची भीती आहे. आत - बाहेरील रस्त्यांवर गुडघाभर खड्डे पडले आहेत. रात्रीच्या अंधारात सदर खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे दुचाकी, चारचाकी गाड्या अपटून अपघात घडत आहेत. दररोज साधारणपणे ३० ते ४० हजार प्रवासी येथून प्रवास करतात. मात्र, संपूर्ण बसस्थानक खड्ड्यात अडकले आहे. पावसाळ्यात तर येथील परिस्थिती अधिकच वाईट होते.

Aurangabad Bus Stand
समृद्धी महामार्ग 'या' महिन्यात होणार खुला; एकनाथ शिंदेची माहिती

ठेकेदाराच्या 'हात सफाई'ला लगाम कधी लागणार?

बसस्थानकात घाणीचे साम्राज्य असून, सर्वत्र दलदल निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी दुर्गंधी येत आहे. बसस्थानकात साफसफाईसाठी दरमहा लाखो रुपये खर्च केले जातात, असे असताना ठेकेदार नेमके काय काम करतो याकडे देखील कुणाचेही लक्ष नाही. यातच बसस्थानकाचे छत कोसळण्याची भीती असल्याने प्रवाशांना एसटीची वाट पाहत बाहेर उभे राहावे लागत आहे. पन्नाशी उलटलेल्या बसस्थानकाकडे एसटी महामंडळाचे लक्ष नसल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com