दुरुस्तीसाठीचे पाच कोटी गेले कुठे?

Aurangabad

Aurangabad

Tendernama

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद शहरातील (Aurangabad)) रस्त्यांवर २४ तास नजर राहावी, शहर सुरक्षित राहावे, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत व्हावी, गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (Smart City Devlopment Corporation) माध्यमातून राबवण्यात आलेल्या मास्टर सिस्टिम इंटिग्रेटर (MSI) प्रकल्पांतर्गत शहरात सातशे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र या कॅमेऱ्यांचे खांब उभे करताना खोदलेल्या खड्ड्यांच्या मातीचे ढिगारे व वीज कनेक्शन जोडण्यासाठी खोदलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे ठेकेदाराने पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

Aurangabad

मुंबई-गोवा सुसाट...; आता थेट सिंधुदुर्गापर्यंत पर्यायी मार्ग

मग पाच कोटी गेले कुठे?

या संदर्भात स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, खोदकामानंतर रस्ते दुरुस्तीसाठी पाच कोटी भरल्याचा दावा त्यांनी केला आहे. शहरातील रोवलेल्या या सीसीटीव्ही खांबांची पाहणी केली असता दुरुस्ती कुठेही झालेली दिसत नाही. या उलट खांब रोवण्यासाठी उकरलेले अर्धवट मातीचे ढिगारे तसेच पडून आहेत. मग महापालिकेने रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली उकळलेले पाच कोटी नेमके गेले कुणीकडे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Aurangabad

पुणे-नाशिक रस्त्याबाबत मोठा निर्णय; आता नाशिक फाटा ते राजगुरुनगर..

शहर सुरक्षित; रस्ते अ-सुरक्षित

शहर सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला 'एमएसआय प्रकल्प' स्मार्ट सिटी अभियानात सहभागी झालेल्या सर्वच शहरांना राबवणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने देखील या प्रकल्पाचे काम हाती घेतले होते. त्यात १७६ कोटी रुपयांच्या 'एमएसआय' प्रकल्पामध्ये शहराच्या महत्त्वाच्या चौकांत व रस्त्यांवर ७०० सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. त्यात या कॅमेऱ्यांवर निगराणी ठेवण्यासाठी पोलिस आयुक्तालयात कमांड अँड कंट्रोल सेंटर, महापालिका मुख्यालयात ऑपरेशन कमांड अँड कंट्रोल सेंटर, पोलिस व्हिव्हींग सेंटर, डेटा सेंटर उभारणीच्या कामांचा यात समावेश आहे.

ही सर्व कामे पूर्ण झाल्याचे 'एमएसआय' प्रकल्पाचे औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अधिकारी मोठ्या तोऱ्यात सांगत आहेत. पण कोट्यावधीची कामे करून पसार होणाऱ्या ठेकेदाराकडून टेंडरमधील अटी - शर्तीनुसार खोदलेले रस्ते पूर्ववत करण्याची काळजी जबाबदार अधिकाऱ्यांनी घेतली नाही. तसेच मातीचे ढिगारे उचलण्याच्या सूचना देखील केल्या नाहीत. परिणामी शहरात सातशे कॅमेऱ्यांची नजर असा गवगवा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी या कामामुळे रस्ते कसे असुरक्षित झाले आहेत, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Aurangabad

ग्रामसडक योजनेचे 'ग्रहण' सुटले; रस्ता दुरुस्तीसाठी अखेर मुहूर्त...

कॅमेऱ्यात ठेकेदाराच्या चुका दिसत नाहीत का?

टेंडरनामा प्रतिनिधीने या समंस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता एमएसआय प्रकल्पात शहरात सातशे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असल्याचे अधिकारी सांगतात. यात सातशे पैकी सहाशे कॅमेरे फिक्स असून शंभर फिरते कॅमेरे असल्याचे ते म्हणाले. पोलीस विभागाकडून करण्यात आलेल्या सूचनेनुसार ४१८ जंक्शनवर हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र हे कॅमेरे बसवण्यासाठी ४१८ ठिकाणी खांब उभे करण्यासाठी रस्ता दुभाजक आणि रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात खोल खड्डे खोदण्यात आहेत. खांब उभारण्यात आल्यानंतर आवश्यक असलेली माती ढकलून खड्डे बुजवण्यात आले. मात्र उर्वरित मातीचे ढिगारे अगदी वळणावर तसेच पडून आहेत.

शिवाय कॅमेऱ्यांसाठी सुमारे १५० किलोमीटरचे रस्ते केबल टाकण्यासाठी खोदण्यात आले होते. या कामात देखील केबलवर उकरलेली माती टाकून ती बुजवण्यात आली मात्र आरपार नाल्या तशाच आहेत. हे काम करणाऱ्या बीएसएनएल कंपनीने लक्ष दिले नाही.

Aurangabad

नवीन इमारतीचा फेरप्रस्ताव सादर करा; कामगार आयुक्तांना पत्र

कोट्यावधींच्या रस्त्यांचे नुकसान

मास्टर सिस्टीम इंटिग्रेटर (एमएसआय) प्रकल्पांतर्गत केल्या जाणाऱ्या या कामांमुळे सिमेंटचे स्मार्ट रस्ते खोदण्यात आले, त्यांच्या डागडुजी करण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने आणि बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केले. याबाबत तेथील अधिकाऱ्यांनी या डागडुजीसाठी महापालिकेकडे पाच कोटी रुपये जमा केले असल्याचे सांगत महापालिकेकडे बोट दाखवले आहे.

Aurangabad

'स्वच्छ भारत'मधील स्वच्छतागृहे ४ वर्षांपासून बंद;20 लाखांचा चुराडा

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी खांब उभारण्यासाठी, तसेच कॅमेऱ्यासाठी वीज जोडणी घेण्यासाठी अनेक ठिकाणी रस्ते ओलांडून खोदकाम करून केबल टाकण्यात आली आहे. त्यामुळे शहरात बहुतेक ठिकाणी सिमेंटच्या रस्त्यांचे नुकसान झाले आहे. ते तातडीने दुरूस्त करावेत.

- मनोज बोरा - तक्रारदार

Aurangabad

औरंगाबादेत ३६ लाखांचे सुरक्षा साहित्य नेमके गेले कुठे?

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या पोलसाठी वीज कनेक्शन घेताना सिमेंटच्या रस्त्यांमध्ये लावलेले गट्टू उखडून टाकले आहेत. गट्टू उखडल्यामुळे संपूर्ण रस्ता खराब होण्याची शक्यता आहे. शहराच्या काही भागात, प्रामुख्याने टी.व्ही. सेंटर चौकाच्या परिसरात रस्त्यातील गट्टू उखडून केबल टाकण्याचे काम केले गेले आहे. स्मार्ट सिटी योजनेच्या अंतर्गत ही कामे होत असल्यामुळे खोदल्या जाणाऱ्या रस्त्यांना औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जबाबदार आहे.

- ज्ञानेश्वर डांगे, शिवसेना उपशहर प्रमुख

Aurangabad

रस्त्यांच्या दर्जावरून औरंगाबादचे खासदार लोकसभेत कडाडले

सीसीटीव्ही बसवण्याच्या कामासाठी रस्ते खोदून स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी शहराचे विद्रूपिकरण केले. याची जराही जाणीव त्यांना नाही.

- डाॅ. अनुराधा धुळेकर

Aurangabad

राधेश्याम मोपलवारांची खरी 'समृद्धी'; सहाव्यांदा मुदतवाढ

रस्त्यांच्या होणाऱ्या नुकसानीपोटी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने महापालिकेला पाच कोटी रुपये दिले आहेत. या रकमेतून महापालिकेने रस्त्यांची डागडुजी करणे अपेक्षित होते. पण नेहमी प्रमाणे खाबुगिरी करणाऱ्यांनी काम न करता पैसे गडप केल्याचा संशय बळावत आहे.

- विशाल नारळे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com