Sambhajinagar: जालना रस्त्यावर दुभाजकाची उंची वाढविण्याचे काम सुरू

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : 'टेंडरनामा'ने छत्रपती संभाजीनगर-जालना या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेवर सातत्याने प्रहार केला. दरम्यान हा संपुर्ण रस्ता गुळगुळीत करण्यात आला. आता कॅम्ब्रिज नाका ते जालन्यातील नागेवाडी टोलनाक्यापर्यंत कमी उंचीच्या दुभाजकाची उंची वाढविण्याचे महत्त्वाचे काम सुरू करण्यात आले आहे. सोबतच छोट्या-मोठ्या पुलांच्या कठड्यांची दुरूस्ती व रंगरंगोटीचे काम देखील सुरू करण्यात आले आहे, असे असले तरी रस्ता शोल्डरमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे रस्त्याची शोभा अद्यापही घालवली जात आहे. शिवाय रस्ता दुतर्फा अतिक्रमणांच्या विळख्यामुळे रस्त्याचा श्वास कोंडला गेला आहे, याकडे देखील जागतिक बँक प्रकल्प टप्पा क्रमांक-३च्या अधिकाऱ्यांनी जागरुकता दाखवणे गरजेचे आहे. त्यांनी ठेकेदार सद्भाव प्रकाश जाॅईंट व्हेंचरच्या कंत्राटदाराला सूचना देऊन ही कामे देखील तत्परतेने केली, तरच जालनारोड अपघात मुक्त होईल, अशा प्रतिक्रीया वाहनधारकांनी नोंदविल्या.

Sambhajinagar
बीकेसीत बुलेट ट्रेनच्या कामांना गती; अंतर्गत बांधकामांसाठी टेंडर

जालना मार्गावर झालेल्या अपघातामध्ये अनेकांचा बळी गेला आहे. या बळींचे कारण कमी उंचीचा दुभाजक हे प्रमुख कारण ठरले होते. कॅम्ब्रिज नाका ते जालना या सुमारे ६०.८०  किलोमीटरच्या टप्प्यात सहा इंच उंचीचा दुभाजक शिल्लक राहीला होता. स्थानिक नागरिकांनी दुभाजकाची उंची वाढविण्यासाठी वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनही, प्रशासनाने त्याकडे  दुर्लक्ष केले होते. छत्रपती संभाजीनगर-जालना या राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण अंथरूणावर खिळून आहेत. छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर लाडगाव आणि नागेवाडी येथे दोन टोलनाके उभारले आहेत. दरम्यान, दररोज लाखोंचा गल्ला भरूनही ठेकेदार जमीनदोस्त झालेल्या दूभाजकाच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करीत होता. यामुळे बेशिस्तपणे सहजरीत्या कमी उंचीच्या दुभाजकावरून विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर जाणार्यांची घुसखोरी वाढली होती. यामुळे समोरून येणाऱ्या मोठ्या वाहनांना मोठा अडथळा निर्माण झाला होता. यामुळे अपघाताची संख्या देखील वाढत होती. परिणामी याच कारणामुळे या मार्गावर झालेल्या अपघातामध्ये अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला होता. जमीनदोस्त झालेल्या कमी उंचीचा दुभाजकावरून दुचाकीस्वार विरुद्ध बाजूस जाऊन अपघात होत असतानाही प्रशासन त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करत नसल्याचे वास्तव 'टेंडरनामा'ने सातत्याने मांडले होते. अपघाताचे सत्र कमी करण्यासाठी दुभाजकाची उंची वाढवणे हाच एक रामबाण उपाय असल्याची ठाम भुमिका प्रशासनापुढे मांडली होती. 'टेंडरनामा'च्या वृत्ताची दखल घेऊन अखेर जागतिक बँक प्रकल्प शाखेने  दुभाजकाची उंची वाढविण्याचे काम सुरू केले आहे.

Sambhajinagar
ट्रान्स हार्बर लिंक मुंबईचा कायापालट करेल; जपानच्या हिरोशींचे मत

टेंडरनामाच्या वृत्तमालिकेचे बळ मिळाल्याने दुभाजकाची उंची वाढविण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायती अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करीत होत्या. त्यांच्या प्रयत्नांना देखील अखेर यश आले आहे. खाजगी प्रकल्पांतर्गत औरंगाबाद-जालना रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. तब्बल १९० कोटीतून झाल्टा फाटा ते कॅम्ब्रीज चौक, चिकलठाणा विमानतळ ते जालना दरम्यान ६५.८० कि.मी. रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. या रस्त्याच्या देखभाल दुरूस्तीचा खर्च वसुल करण्यासाठी औरंगाबाद-जालना या राष्ट्रीय महामार्गावर लाडगाव आणि नागेवाडी येथे दोन ठिकाणी टोलनाके उभारण्यात आले आहेत. मुंबईच्या सद्भाव प्रकाश जाॅईंट व्हेंचर या कंत्राटदाराला १ फेब्रुवारी २००७ ते ३१ जुलै २०३० पर्यंतच्या कालावधीत टोलवसुली करून रस्त्यासाठी खर्च झालेली किंमत आणि रस्त्याच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar: MIDCच्या धोकादायक दोन मजली इमारतीत भाडेकरूंचा कब्जा

'बांधा आणि वापरा’ यानुसार' ठेकेदाराने पैठण जंक्शन-झाल्टा फाटा-कॅम्ब्रिज नाका , चिकलठाणा विमानतळ ते नागेवाडी टोलनाका पुढे चार कि.मी. अंतरापर्यंत २००७ मध्ये ६५.८० किलोमीटर रस्ता बांधणीचे काम केले. त्या वेळी महामार्गाच्या मध्यभागी अधीक उंचीचा दुभाजक केला होता. मागील  १८ ते १९ वर्षांत रस्त्याची देखभाल-दुरुस्ती केल्यानंतर या दुभाजकाची उंची कमी झाली. सध्या दुभाजक जमीनदोस्त झाला होता. केवळ सहा इंच इतक्‍या उंचीचा तो  दुभाजक शिल्लक राहिला होता. 'मे. सद्भाव जाॅईंट व्हेंचर'च्या ठेकेदार मात्र कमी उंचीच्या दुभाजकाकडे दुर्लक्ष करत होता. कमी उंचीचा दुभाजकाचा प्रश्‍न दूरच, या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडेही दुर्लक्ष केले जात असल्याची स्थिती 'टेंडरनामा'ने सातत्याने लावून धरली होती.

ठेकेदाराचे एकीकडे टोलनाक्याच्या माध्यमातून गल्लाभरो आंदोलन अन् दुसरीकडे रस्त्याच्या देखभाल दुरूस्तीकडे कानाडोळा केल्याने या मार्गावरील किमाण सव्वा लाख लोकांचा जीव धोक्‍यात होता. छत्रपती संभाजीनगर-जालना रस्ता या महामार्गावर मोठी बाजारपेठ असलेली गावे आहेत. या गावांची लोकसंख्या सव्वा लाखामध्ये आहे. शेती, दुकापे, हाॅटेल्स व शाळा, हॉस्पिटल, बाजार, रेल्वे, बस-एसटी थांबे, पोलिस ठाणे आदी वेगवेगळ्या कारणांसाठी दररोज नागरिकांना रस्ता ओलांडावा लागतो. मात्र, अतिवेगामध्ये येणाऱ्या छोट्या वाहनांसह मोठ्या वाहनांमुळे नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत असे. वाहनांच्या गतीवर मर्यादा नसल्याने अनेकदा अपघात होऊन, त्यामध्ये वाहनचालकांसह स्थानिकांचा जीव गेला आहे. दुभाजकाची उंची वाढवून सेवा रस्ता करावा, यासाठी अनेकदा पाठपुरावा करूनही जागतिक बँक प्रकल्प शाखा ठेकेदाराला जागे करून दुरूस्तीची कामे हाती घेत नव्हती.

Sambhajinagar
Mumbai : 2 हजार कोटींच्या 'त्या' प्रकल्पाला नव्या जागेची प्रतीक्षा

'टेंडरनामा'ची वृत्तमालिकेची अखेर जागतिक बँक प्रकल्प शाखेने गांभीर्याने दखल घेतली. लोकप्रतिनिधींनी देखील या गंभीर प्रश्‍नाकडे लक्ष दिले आणि अखेर दुभाजकाची उंची वाढविण्याचे काम हाती घेतले. कॅम्ब्रिज नाका ते लाडगाव टोलनाका पहिल्या टप्प्यात २५ कि.मी. दुभाजकाची उंची वाढवली जाणार आहे. त्यानंतर पुढील टप्प्याचे काम हाती घेतले जाणार आहे. जालन्याच्या शंकर पार्वती कंन्सट्रक्शन कंपनीला हे टेंडर देण्यात आले आहे. दररोज अडीचशे ते तीनशे मीटरच्या गतीने दुभाजकाचे बांधकाम केले जात आहे. पुढे बांधकाम पाठीमागून रंगरंगोटीचे काम देखील हाती घेण्यात आले आहे.दुभाजकासोबतच छोट्यामोठ्या पुलांची रंगरंगोटी व लिपापोतीचे काम देखील सुरू केले आहे.

आता याकडे लक्ष द्या

कॅम्ब्रिज ते जालना या राष्ट्रीय महामार्गाचा ग्रामपंचायती, ग्रामस्थ आणि व्यावसायिकांनी  ठिकठिकाणी कचरा केला आहे. पंचतारांकित शेंद्रा एमआयडीसी आणि ऑरिक सिटीकडे जाणाऱ्या विदेशी उद्योजकांसाठी असे चित्र उद्योगपंढरीची शोभा घालवणारे आहे. शिवाय उकीरड्यावर ताव मारणारी मोकाट जनावरे नेहमी रस्त्याच्या विरूध्द दिशेने वावरत असल्याने अपघाताचा धोका कायम आहे. साफसफाईकडे ठेकेदाराने लक्ष देणे बंधनकारक करावे.
●  रस्त्यालगत वाहतूकीला अडथळा निर्माण करणारे जाहिरात फलक आणि रस्ता शोल्डरमध्ये नर्सरी, खेळणी आणि चहानाश्त्याच्या हातगाड्या लावणाऱ्यांच्या अतिक्रमणाकडे कंत्राटदाराचा कानाडोळा आहे. अपघाताला आमंत्रण देणारे हे अतिक्रमन देखील तात्काळ हटवावे.
● कॅम्ब्रीज ते नगरनाकाच्या धर्तीवर कॅम्ब्रिज ते जालना या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने काॅक्रीट गटाराचे काम व्हावे. त्यावर फुटपाथ बांधला जावा.जेणेकरून रस्त्यावर पावसाचे पाणी साचून रस्ता खराब होणार नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजुने सर्विस रस्ता मोकळा करावा.
● रस्त्याच्या दुभाजकात सुभोभिकरण केवळ टेंडरची पुर्तता करण्यासाठी नावालाच ठराविक अंतरात बारीक रोपटे लावलेले आहेत. त्यात पाणी ओतले जात नसल्याने ते देखील वाळलेले आहेत. चांगले सुशोभिकरण करावे.
● रस्त्याच्या दोन्ही बाजुने भारतीय वंशाची वड, पिंपळ, औदुंबर , चिंच , लिंब गुलमोहराची झाडे लावावीत
● कॅम्ब्रिज  - जालना आता दोन्ही शहराच्या मधोमध आल्याने व शेंद्रा पंचतारांकीत औद्योगिक वसाहत, डीएमआयसी, ऑरिक सिटीचा टप्पा वाढल्याने याभागात मोठ्या प्रमाणावर मोठमोठे गृहप्रकल्प साकार होत आहेत. यात रात्रपाळी काम करणारे कामगार , कंपनी अधिकारी व उद्योजकांचा प्रवास वाढल्याने पथदिवे लावावेत.दिशादर्शक फलकांची दुरूस्ती करावी.

●झाल्टा फाटा ते कॅम्ब्रिजनाका दरम्यान उड्डाणपुलांच्या कठड्याची उंची वाढवा , पुलाच्या मधोमध दुभाजकाचे बांधकाम आवश्यक

● बीड बायपासचे रूंदीकरणाची गती वाढवा, पुलांच्या खालचे जोडरस्ते , सर्व्हिस रस्ते तातडीने पूर्ण करा, स्टाॅम वाॅटर गटाराचे जोड पूर्ण करून खड्डे बुजवा.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com