Sambhajinagar : चिकलठाणा रेल्वे भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात पण शिवाजीनगर भुयारी मार्गाचे...

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील चिकलठाणा रेल्वे क्राॅसिंग गेट क्रमांक-५७ येथील भुयारी मार्गाची बारा महिने मुदत असताना कंत्राटदाराने चार महिन्यांत भुयारी मार्गाचे काम पूर्ण केले. येत्या पंधरा दिवसात हा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. मात्र दुसरीकडे गेल्या सहा महिन्यांपासून शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक-५५ येथील भुयारी मार्ग अडथळ्यांच्या भुयारातच अडकला आहे. येथील भुयारी मार्गाची बारा महिन्यांची मुदत असताना दिलेल्या कालावधीत काम पूर्ण होण्याची सुतराम शक्यता नाही. भुयारी मार्गाच्या कासवगतीवर "टेंडरनामा"ने प्रहार करताच महापालिकेने मल: निवारण वाहिनी व महावितरण कंपनीने भुमिगत केबल हटविण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू केले. मात्र आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत शहर पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनी टाकणाऱ्या जीव्हीपीआरच्या कंत्राटदाराकडून खोडा घातला जात आहे.

Sambhajinagar
Tendernama Impact: 13 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर टाकळीशिंपी रस्त्याचे भाग्य उजळले; 2 कोटींचे टेंडरही निघाले

शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक-५५ येथे भुयारी मार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी टेंडरनामाने पाठपुरावा सुरुच ठेवला आहे. रेल्वेने रेल्वेच्या हद्दीत गतीने काम सुरू केले आहे. भुयारी मार्गातील देवळाईच्या दिशेने रेल्वे रुळाखाली बाॅक्सचे काम युध्दपातळीवर सुरू केले आहे. मात्र वाणी मंगल कार्यालयाच्या दिशेने महापालिकेची मल:निसारण वाहिनी, महावितरणची अकरा के.व्ही. अतिउच्च दाब भुमिगत वाहिनी यामुळे मंध्यंतरी हे काम रखडले होते. टेंडरनामाने या कामांचा खरपुस समाचार घेतल्यानंतर महावितरण व महापालिका प्रशासनाने काम सुरू केले. दरम्यान आता जलवाहिनीसाठी खोदकाम करण्यात येणार असल्याने कामाचा खोळंबा झाला आहे. शिवाजीनगर भुयारी मार्गातील ॲप्रोच रस्त्यांसाठी शिवाजीनगरच्या दिशेने वाणी मंगल कार्यालयापर्यंत कंत्राटदाराने रस्त्याचे पंधरा ते वीस फुटापर्यंत खोदकाम केलेले आहे. दरम्यान खोदकामात महावितरण कंपनीची भुमिगत केबल आणि महापालिकेची मलनिःसारण वाहिनी असल्याचे निदर्शनास आल्याने कंत्राटदारामार्फत पुढील काम थांबविण्यात आले होते. यासंदर्भात टेंडरनामा प्रतिनिधीने कंत्राटदार जीएनआय कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अभियंत्यांना विचारले असता त्यांनी महापालिकेच्या मलनिःसारण वाहिनीचा व महावितरण कंपनीच्या केबलचा अडथळा असल्याचे कारण पुढे करत काम रखडल्याचे सांगितले होते.

Sambhajinagar
Sambhajinagar : बंधाऱ्यावर ताबा अन् शेतकऱ्यांचा वहिवाटीचा रस्ताच केला गायब

यावर टेंडरनामा प्रहार करताच महापालिकेने अतितातडीची बाब म्हणून देखभाल दुरुस्ती अंतर्गत विनाटेंडर दहा लाखाचे काम काढत मलनिःसारण वाहिनी स्थलांतराचे काम सुरू केले. पाठोपाठ महावितरण कंपनीने देखील केबल स्थलांतरित करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना आता जलवाहिनीसाठी रस्ता खोदावा लागणार असल्याचे उशिरा शहाणपण सुचल्याने काम रखडल्याचे टेंडरनामा तपासात समोर आले आहे. दरम्यान खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे सातारा-देवळाई अन् बीड बायपासकरांची दमछाक होत आहे. सातारा - देवळाई भागात मोठी सब्जीमंडी, आरोग्याच्या सुविधा व जीवनावश्यक वस्तूंची चांगली सुविधा नसल्याने या भागातील नागरिकांना रेल्वेगेटच्या पलिकडे वाहने लाऊन रूळ ओलांडून शिवाजीनगरात उपचारासाठी यावे लागते, भाजी व किराणा खरेदी करण्यासाठी यावे लागते. दरम्यान खड्डयाच्या किनारेला दोन फुटाच्या रस्त्यावरून चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. भुयारी मार्गाच्या कामासाठी जबाबदार रेल्वे, महानगरपालिकेसह महावितरण व जागतिक बॅंक प्रकल्प शाखा व वाहतुक शाखेतील अधिकार्यांनी योग्य समन्वय राखून भुयारी मार्गाच्या कामातील अडथळे दुर करून कामाची गती वाढवावी , अशी मागणी बद्रिनाथ थोरात, असद पटेल, हरिभाऊ हिवाळे, आबासाहेब देशमुख, पद्मसिंह राजपुत, सोमीनाथराव शिराणे, रमेश बहुले, राजु राजपुत, हनुमंतराव सोनवने, कांता कदम, स्मिता पटारे, स्वाती कुलकर्णी, ॲड. शिवराज कडू पाटील, ॲड. वैशाली कडू पाटील, मेघना थोरात यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com