Sambhajinagar : बंधाऱ्यावर ताबा अन् शेतकऱ्यांचा वहिवाटीचा रस्ताच केला गायब

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जालना रोडलगत शेकटा या गावांमधील बंधाऱ्यावर एका शेतकऱ्याने पिकांची लागवड करून आणि घास लाऊन थेट ताबा घेतला आहे. यामुळे गट क्रमांक ११९, ६८, ६५, ६७, ६४ या पाच गटातील शेतकऱ्यांचा शेतरस्ताच रस्ताच गायब झाला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी तेरा वर्षांपूर्वी तहसिलदारांकडे रस्ता मोकळा करण्यासंदर्भात अर्ज केला. तहसिलदारांनी मंडळ अधिकाऱ्यांमार्फत अहवाल मागितला. त्याने पंचनामा करून संबंधित शेतकऱ्याने रस्ता अडविल्याचा पंचनामा करून अहवाल सादर केला. तहसिलदाराने त्यावर रस्ता मोकळा करण्याचे एकदा नव्हे तीनदा आदेश काढले. त्यावर मंडळ अधिकाऱ्याने पोलिस बंदोबस्त देखील मागवला. मात्र अद्याप रस्ता मोकळा झालाच नाही. रस्ता अडविल्याने यात संबंधित शेतकऱ्याच्या मानसिक तणावाखाली दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. पुढे हा लढा शेतकऱ्यांच्या वारसांनी चालुच ठेवला. याबाबत संबंधित वारसदार शेतकऱ्यांनी गेल्या १३ वर्षांपासून तहसीलदारांकडे तक्रारी केल्या, तहसिलदारांनी दखल घेत वेळोवेळी रस्ता मोकळा करण्याचे आदेश पारित केले. पण वरिष्ठांच्या आदेशानुसार एकाही मंडळ अधिकारी आणि तलाठ्याने त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे अतिक्रमनधारक शेतकऱ्याला आणखी बळ मिळत आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : अवकाळीने वाढवल्या 'अवकळा'; कोणी रस्ते देता का रस्ते?

औरंगाबाद-जालना या रस्त्यालगत शेकटा हे गाव आहे. या गावातील गट क्रमांक ११८ मध्ये बाबूराव रामभाऊ वाघ यांची ३ हेक्टर ५४ आर जमीन आहे. याच जमिनीच्या उत्तर बाजूकडून लाहुकी नदी असून सदर नदीच्या काठाने गट क्रमांक ११८ ही जमीन आहे. सदर जमिनीच्या उत्तर बाजूस गट नंबर ११९ मध्ये रामराव बाबुराव वाघ, छगन विठोबा वाघ व बाजीराव विठोबा वाघ यांच्या जमीनी आहेत. गट क्रमांक ११८ च्या बाजूस असलेल्या नदीच्या काठावरून गट क्रमांक ११८ बांधालगत उत्तरेकडे गट क्रमांक ११९ , ६८, ६७,,६४ , ६५ या जमिनीत जाण्याचा रस्ता असल्याचे पंचनाम्यात मंडळ अधिकाऱ्याने नमूद केले आहे. मात्र सदर रस्ता गट क्रमांक - ११८ चा मालक बाबुराव रामभाऊ वाघ याने ब़ंद केला आहे. मात्र गट क्रमांक - ११८ मध्ये माझी खाजगी जमीन आहे. गट क्रमांक - ११९ मध्ये जाण्यासाठी माझ्या जमिनीतून रस्ताच नसल्याचे बाबुराव रामभाऊ वाघ याचे म्हणणे आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : स्मशानभूमीचे झाले जंगल; समस्यांकडे महापालिकेचा कानाडोळा

मात्र त्रस्त शेतकऱ्यांच्या अर्जावरून तहसिलदारांनी रस्ता मोकळा करण्यासाठी प्रकरण हाती घेतले. प्रकरणात गैर अर्जदार बाबुराव रामभाऊ वाघ व अर्जदारांना नोटीस बजावण्यात आली. त्यात स्वतः तहसिलदारांनी स्थळ पाहणी केली. त्यात गैर अर्जदार बाबूराव रामभाऊ वाघ यांनी नदीपासून म्हणेजच दक्षिण बाजूकडून दक्षिण-उत्तर गट क्रमांक-११८ च्या बांधावरून पुर्वपार चालत असलेला रस्ता यांनी त्यांच्या बांधावर बंद केल्याचे तहसिलदारांच्या लक्षात आले. अर्जदारांची शेती उत्तर बाजूस आहे. त्यांना त्यांच्या शेतात जाण्या-येण्यासाठी व शेतातील माल वाहतूक करण्यासाठी व शेती कसण्यासाठी रस्ताच नसल्याचे स्वतः तहसिलदारांच्या निदर्शनास आल्याने तहसिलदारांनी गैर अर्जदार बाबुराव रामभाऊ वाघ याचा अर्ज फेटाळला व अर्जदारांचा अर्ज मंजुर करत गट क्रमांक-११९, ६८, ६५, ६७ व ६४ या जमीनीत जाण्यासाठी गट क्रमांक - ११८ मधून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदीनुसार अडविण्यात आलेला रस्ता मोकळा करण्यासाठी संबंधित मंडळ अधिकारी व तलाठ्याला आदेश पारित केले.  मात्र, मंडळ अधिकार्यांनी तहसिलदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. बाबुराव वाघ याने पानंद रस्त्याची ओळख बदलून गट क्रमांक-११८ मधून ११९ मध्ये जाण्यासाठी पूर्वीपासून असलेल्या रस्त्यावर पिकपाणी घेण्याचा उद्योग सुरू केला आहे. त्यात पिकांची लागवड करत रस्ताच गिळंकृत केला आहे. त्यामुळे इतर  शेतक-यांचा रस्ताच बंद झाला आहे.

Sambhajinagar
Mumbai : अर्थसंकल्पात गोलमाल, कंत्राटदार मालामाल! शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पावर विरोधक का संतापले?

'टेंडरनामा'कडे इत्यंभूत माहिती
हा बंधारा पूर्ववत करून तेथुन रस्ता मिळावा, आणि वडिलोपार्जित वहिवाटीचा रस्ता पूर्वीप्रमाणेच करावा,संबंधित शेतक-याने केलेल्या अतिक्रमणाचा पंचनामा करावा आणि रस्ता मोकळा करावा, या मागणीसाठी गेल्या १५ वर्षांपासून शेतकरी शासनदरबारी चकरा मारत आहेत. यातील छगन विठोबा आणि विलास वाघ या पिता पुत्राचा शेवटी मृत्यु झाला. मात्र त्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता मिळालाच नाही. शेवटी यातील काही त्रस्त शेतक-यांनी ‘टेंडरनामा' कडे धाव घेतली. चमूने गावक-यांच्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी तहसिल कार्यालयातील अभिलेख कक्षातून याप्रकरणाचा संपुर्ण लेखा जोगा बाहेर काढला. या प्रकरणात २३ ऑगस्ट २०१३ रोजी शेतकरी छगन विठोबा वाघ यांनी गैर अर्जदार बाबुराव रामभाऊ वाघ यांच्या विरूध्द प्रकरण दाखल केल्यानंतर त्यात ७ सप्टेंबर २०१५ रोजी तहसिलदार रमेश मुंडलोड यांनी गैर अर्जदार बाबुराव रामभाऊ वाघ याचा अर्ज नामंजूर करून फेटाळला होता. त्यात छगन विठोबा वाघ यांचा अर्ज मंजुर करून मौज शेकटा येथील गट क्रमांक ११९, ६८, ६५, ६७, ६४ या जमीनीत जाण्यासाठी गट क्रमांक ११८ मधुन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदीनुसार अडविण्यात आलेला रस्ता मोकळा करणेबाबत सक्षम अधिकार्यांना परवानगी दिलेली होती. विशेषतः प्रतिनिधीने स्वतः गावात जाऊन शेतपाहणी, टोच नकाशा, भूमी अभिलेखचा नकाशा आणि मंडळ अधिकारी, तलाठी  यांनी वेळोवेळी केलेले पंचनामे,तसेच तहसीलदारांचे आदेश आदी सर्व कागदपत्रांची पाहणी केली. त्यातून बाबुराव रामभाऊ वाघ याने रस्ता दाबल्याचे सिद्ध झाले. बाबुराव रामभाऊ वाघ या मुजोर शेतकर्याने शेतरस्ताच गिळंकृत केल्याने इतर शेतक-यांना दैनंदिन शेत कसण्यासाठी, शेत मालाची व इतर फळभाजी, दूध आणि इतर कामांसाठी जा-ये करताना गैरसोय होते.

Sambhajinagar
Mumbai : मुंबईतील 'त्या' म्हाडा वसाहतीच्या समूह पुनर्विकासाबाबत सरकारचा मोठा निर्णय

प्रशासनाची टोलवाटोलवी

याप्रकरणी तहसिलदारांच्या आदेशाच्या विरोधात बाबुराव रामभाऊ वाघ याने गट क्रमांक ११९ ही माझी खाजगी जमीन असून मी ति खरेदी खताआधारे विकत घेतल्याचे म्हणत तिथे पूर्वीपासूनच रस्ता नसल्याचा दावा न्यायालयात दाखल करत त्यात तहसिलदारांच्या आदेशाला स्थगिती मिळावी, अशी विनंती न्यायालयापुढे केली होती. मात्र तब्बल आठ वर्षानंतर त्याचा दावा फेटाळला. बाबुराव रामभाऊ वाघ याचा दावा फेटाळताच संबंधित गटातील सर्व त्रस्त शेतकर्यांनी तहसिलदार रमेश मुंडलोड यांच्याकडे २ फेब्रुवारी रोजी रस्ता मोकळा करून देण्याबाबत अर्ज केला होता. त्यावर तहसिलदारांनी १४ फेब्रुवारी रोजी मंडळ अधिकाऱ्याला रस्ता मोकळा करून देण्याबाबत आदेशित केले होते. या आदेशानंतर शेतकर्यांनी पोलिस बंदोबस्तासाठी व जमीनीची मोजणी करण्यासाठी शुल्क देखील भरले. इतके सारे असताना वरिष्ठांच्या आदेशानंतरही मंडळ अधिकारी गोरे आणि तलाठी कृष्णा घुगे यांनी बघ्याची भुमिका घेत तहसिलदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत मौन पाळले. शेतक-यांनी याबाबत सर्व पातळ्यांवर तक्रारी दिल्या, पण प्रशासनाने तक्रारदारांची बोळवण करण्यासाठी पंचनामे, अहवाल आणि नोटिसांचा सोपस्कार करत फक्त कागदी घोडे नाचवले. त्यामुळे अधिकारी-कर्मचा-यांची यात मिलीभगत असल्याचा संशय येतो. प्रकरण ‘टेंडरनामा’कडे आल्याचे कळताच शेकटा विभागाचे मंडळ अधिकारी व तलाठ्याची तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी चांगलीच कान उघाडणी केली.या प्रकरणात बाबुराव रामभाऊ वाघ याचा दावा फेटाळला आहे. त्यामुळे पुन्हा मंडळ अधिकार्याला गट क्रमांक ११८  मधील हा बंधार्यावरून रस्ता मोकळा करा आणि तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याचे मुंडलोड यांनी सांगितले. मात्र परिस्थिती जैसे थे आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com