IMPACT: जीव्हीपीआरचा ठेकेदार ताळ्यावर;रस्त्याने घेतला मोकळा श्‍वास

वाहनचालकांची त्रासातून सुटका
Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : येथील जालनारोड-सोहम मोटर्स ते  महालक्ष्मी मार्गावर सिडको एन-दोन सी सेक्टर शेजारी जीव्हीपीआरने जलकुंभाच्या बांधकामालगत पाईप टाकले होते. त्यातील वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे सर्व पाईप  हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे चौकाने अपघाताच्या विळख्यातून मोकळा श्वास घेतला.

Sambhajinagar
Mumbai : मनोर ते पडघा मार्गासाठी सल्लागार नेमणार; 'MMRDA'चे टेंडर

याबाबत माहिती अशी, की येथे जालनारोड, सोहम मोटर्स, कासलीवाल-सारागार्डन, एसटी काॅलनीकडून सी सेक्टर समोरून वळसा घेत ज्ञानप्रकाश विद्यामंदीर, विनय काॅलनीकडून थेट महालक्ष्मी चौकाकडून येणारी वाहने सी सेक्टर मुख्य चौकात एकत्र येतात. तेथूनच हा रस्ता अनेक भागात जातो त्यामुळे चौकात वाहनांची गर्दी होते. रस्त्याच्या बाजूला शिवाजी मैदानात छत्रपती संभाजीनगर नवीन पाणीपुरवठा योजनेदरम्यान जलकुंभाचे बांधकाम सुरू आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : शरणापूर-साजापूर रस्ता टेंडरमध्ये नियमानुसार कारवाई

ठेकेदार जीव्हीपीआर कंपनीने थेट चौकाच्या दिशेने पाईपांची थप्पी लावल्याने एल टाइप चौकात वाहने येताना दिसत नव्हती. चौकात वाहने व नागरिकांची गर्दी होते असे. दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूच्या गाड्या दिसत नसल्याने त्यामुळे रस्त्यावर तुफान गर्दी होत होती. अनेक वेळा अपघातही घडले होते. असे अपघात घडल्यामुळे वाहनधारकांवर दादागिरीचे प्रमाण वाढले होते. काही वाहनधारकांनाही मारहाण करण्यात येत होती. अशा गोष्टीला लगाम लावण्यासाठी वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे पाईप हटवण्याबाबत टेंडरनामाने वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर जीव्हीपीआर कंपनीचे प्रोजेक्ट मुख्य व्यवस्थापक निर्णय अग्रवाल यांनी वृत्त प्रकाशित होताच क्षेत्र व्यवस्थापकाची चांगलीच कान उघाडणी केली.  त्यानंतर आकाश मगरे या अभियंत्याने सदर पाईप हटवले. उशिरा का होईना पाइप हटवण्यास सुरवात झाली. यामुळे चौक मोकळा दिसू लागला आहे. वाहनधारकांचा त्रास कमी झाला आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com