बाळासाहेब ठाकरे स्मारकातील 'पुतळ्याचा'चा निर्णय मुख्यमंत्री घेणार

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : प्रियदर्शनी इंदिरा गांधी उद्यानाच्या जागेत उभारण्यात येत असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकातील पुतळ्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याची माहिती ठेकेदाराकडून मिळाली.

Sambhajinagar
Sambhajinagar : जलकुंभाचे काम दोन वर्षांपासून रखडले

प्रकल्पातील कामाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकाम देखील असमाधानकारक असताना ठेकेदार ९० टक्के काम झाल्याचा दावा करत आहे. आता महापालिका आणि सरकारने ठेकेदाराची आर्थिक अडचणीतून सुटका केली असताना देखील कामात प्रगती दिसून येत नाही. इतक्या मोठ्या प्रकल्पावर मध्य प्रदेशातील बऱ्हानपुर येथील केवळ सात मजूर काम करताना दिसले. मुळ ठेकेदाराने सिव्हील वर्कचे काम शहरातील सोनटक्के नामक व्यक्तीच्या साई सर्वेश कन्स्ट्रक्शन कंपनीला परस्पर हे काम देण्यात आले आहे. त्याने २५ मजुर काम करत असल्याचा दावा करत काही मजुर सुटीवर गेल्याचे सांगितले. उपलब्ध मजुरांना मजुरी देखील वेळेवर मिळत नसल्याचे समोर आले आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar: पालकमंत्री पावले; क्रीडा संकुलाचा चेहरामोहरा बदलणार

आत्तापर्यंत सदर काम पूर्ण करण्याचे आदेश माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून पालकमंत्री सुभाष देसाई त्यानंतर मविआ सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री संदीपान भुमरे, तत्कालिन महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, विद्यमान प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी तसेच विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी आदेश देऊनही ठेकेदार बधत नाही. कामाची मुदत १८ महिने असताना २४ महिन्याचा कालावधी लोटला अद्याप सर्वच प्रकल्पाचे बांधकामच पुर्ण झालेले नाही.

Sambhajinagar
Nagpur सौंदर्यीकरण, स्वच्छतेत राज्यात अव्वल; पुरस्कारात मिळाले...

सिडको येथील एमजीएम परिसरातील प्रियदर्शनी इंदिरागांधी उद्यानाच्या जागेवर बाळासाहेब ठाकरे यांचे  स्मारक उभारण्यात येत आहे. सरकारने महानगरपालिकेची कार्यान्वीय यंत्रणा म्हणून नेमणूक केलेली आहे. यासाठी २१ कोटी ७४ लाख रूपये खर्च येत आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर कंत्राटदाराला १८ महिन्याच्या मुदतीवर २५ मार्च २०२१ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आल्यानंतर स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली. १७ एकर जागेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक व म्युझियम उभारणे, रिफ्रेशमेंट सेंटर तयार करणे व भारतीय वंशावळीची मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे आदी कामांचा यात समावेश करण्यात आला आहे. 

Sambhajinagar
Nashik : 11 कोटींच्या देयकाला आधी नकार मग होकार! कारण काय?

स्मारकाचे काम दोन टप्प्यात करण्यात येणार असून पहिला टप्प्यात  स्वच्छतागृहे,  चबुतरा, वाॅटर बाॅडी,  प्रवेशद्वार आदी कामे पुर्ण होणे अपेक्षित होते. मात्र या टप्प्यातील बांधकाम (सिव्हिल वर्क) देखील पुर्ण  केले गेले नाही. यातील सिव्हिल वर्क अद्याप बाकी असल्याने स्मारक व म्युझियम उभारणे, रिफ्रेशमेंट सेंटर तयार करणे व त्या अनुषंघाने स्थापत्य, विद्युत, वातानुकूलित यंत्रणा उभारणी, इमारतीची अंतर्गत आणि बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी, बगिचा तयार करणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग इत्यादी कामे कधी पार पडणार, हा मोठा प्रश्न आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com