Sambhajinagar : चार गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील पूल धोकादायक

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : विटखेडा-कांनवाडी-सातारा-देवळाई या चार गावांना जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या रस्त्यावरील पूलही धोकादायक बनले असून, प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता ग्रामस्थांकडून वर्तविण्यात येत आहे. या पुलांवरून दररोज विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या रिक्षा, बस, ट्रॅक्टर, पाण्याच्या गाड्या आणि दुचाकींची वर्दळ असते. त्यामुळे पुलाचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar: अवघ्या 2 वर्षांत 50 कोटींचा सिमेंट रस्ता खड्ड्यात

नऊ वर्षांपूर्वी पश्चिम मतदार संघाचे आमदार संजय शिरसाट यांनी पुढाकार घेऊन विटखेडा-कांचनवाडी-सातारा-देवळाई गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम करण्यासाठी जवळपास साडेसात कोटी रुपये मंजूर करून आणले होते. यापैकी रस्त्याचे काम कालिका कन्स्ट्रक्शनमार्फत करण्यात आले होते. या कामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आली होती. ठेकेदाराने आधीच निकृष्ट काम केले. त्यात अधिकाऱ्यांनी एकदा काम झाल्यावर दोष निवारण कालावधीत रस्त्याची दुरूस्ती न करताच सुरक्षाठेव रक्कम परत केली. परिणामी रस्त्याची भयंकर अवस्था झाली आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar: 'या' स्मारकाच्या सुशोभिकरणातही खाबुगिरी

विटखेडा, कांचनवाडी-सातारा-देवळाई-सिंदोन-भिंदोन-परदरी-गाडीवाट-घारदोन-कचनेर या गावांना जोडणाऱ्या प्रमुख जिल्हा मार्ग ३५ या मार्गासाठी २०१८ मध्ये सातारा गावातील पूलासाठी एक कोटी ९१ लाख ४७ हजार २१२ रूपये मंजुर करण्यात आले होते. चारणिया कन्स्ट्रक्शन मार्फत पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. यानंतर लक्ष्मीनगरातील दोन पुल आणि महादेव मंदिराजवळील धोकादायक पूलासाठी एक कोटी १४ लाख रूपये मंजुर केले होते. यापैकी लक्ष्मीनगर दरम्यान दोन पूलांचे काम झाले. मात्र अद्यापही ते अर्धवट स्थितीत आहे. महादेव मंदिरासमोरील पूल अत्यंत धोकादायक बनला आहे. पुलाखाली पाणी साचत असल्याने पूल ढासळत आहे. सध्या पंधरा फुटांचा रस्ता पूल केवळ पाच फूट शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पुलावरून मोठी वाहने जाऊ शकत नाहीत. ही वाहने पुलाच्या बाजूने चिखलातून न्यावी लागतात. प्रशासन ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मात्र, टेंडरनामाने सत्यस्थिती थेट स्पाॅटवर जाऊन तपासली असता येथील शेतकऱ्यांनी पूलाचे व रस्त्याचे काम अडवले आहे. रस्ता व पूल आमच्या जमिनीतून जात असल्याचे म्हणत त्यांनी सरकारकडे जागेचा मोबदला मागितला आहे. सदर प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याचे देखील समोर आले आहे.

Sambhajinagar
Nashik DPC : निधी पुनर्नियोजनात आमदारांपेक्षा ठेकेदारांवर कृपा?

- शेतकरी, अधिकाऱ्यांच्या वादात अनेक गावांना जोडणाऱ्या सातारा-देवळाई मार्गावरील हा पूल पावसाळ्यात खचतो. शिवाय सातारा डोंगरातून उगम पावलेली नदीतून पाणी वाहत असल्याने पूल अधिक खचला आहे.

- आधीच धड रस्ता नाही. त्यात या पूलावरून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तीन वेळा पुलाचे काम करण्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा केला. ठेकेदार देखील नेमला. मात्र शेतकऱ्याची अडचण येत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे काम ठप्प आहे.

- रात्री या रस्त्याने ये-जा करणे धोकादायक होते. आता पूल जास्तच ढासळत चालला असून दिवसाही यावरून ये-जा करणे जिवावर बेतू शकते. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र शेतकऱ्याचे नाव पुढे करत काम करण्यात हलगर्जीपणा करत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com