Aurangabad : सहकारनगरातील कोट्यावधींच्या उद्यानाला पालिकेचा असहकार

Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : शहरातील उच्चभ्रू वसाहत म्हणून गणल्या जाणाऱ्या टिळकनगरातील भारतमाता मंदिर, ज्योतीनगरातील कवितेची बाग यासारखीच कोट्यावधीचा खर्च करून साकारलेल्या कै. अशोक परांजपे लोककला उद्यानांची दुरवस्था झाल्याचे टेंडरनामा पाहणीत दिसून आले आहे.

Aurangabad
Ashwini Vaishnav: महाराष्ट्रातील 'या' नेत्यामुळे रखडली बुलेट ट्रेन

या उद्यानाला गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी प्र. क्र. ७४ च्या माजी नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांनी सलग चार वर्ष पाठपुरावा केला. उद्यान दुरूस्तीसाठी २५ लाखाचा बजेट ठेवण्यात आले. विशेषतः ५ जानेवारी २०१९ रोजी ई-टेंडर प्रसिद्ध करण्यात आले. त्याच्या पंधरा दिवसानंतर नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने मात्र मनपातील तिजोरीचा अंदाज घेत दुरूस्तीकडे कानाडोळा केला. नंतर सहकारनगरातील या लोककला उद्यानाला पालिकेचा असहकार असल्याचे ओळखुन त्रस्त नगरसेविकेने शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्याकडे पाठपुरावा केला. येत्या मार्चमध्ये उद्यानासाठी अत्यावश्यक निधी उपलब्ध करून देणार, असे आश्वासन दिले आहे. आता त्याची पुर्तता कधी होते, याकडे टेंडरनामाचे लक्ष असेल.

Aurangabad
Mumbai : हवा शुद्धीकरणासाठी 5 एअर प्युरिफायर; 10 कोटी खर्च

महाराष्ट्रातील लोककला, लोकपरंपरा जतन व्हावी. लोककलेचा हा अनोखा ठेवा अनोख्या रितीने साकार करताना त्याचे शहरातील आबालवृद्धांना तसेच देश-विदेशातील पर्यटकांना बघता यावे, नवीन पिढीला त्याबाबत माहिती व्हावी, यासाठी तत्कालीन प्रभाग क्र. ८९ च्या माजी नगरसेविका तथा माजी महापौर विजया रहाटकर यांनी प्रभागातील सहकारनगरात लोककला उद्यान साकार करण्याचा संकल्प केला होता. सांस्कृतिक संवर्धन करणारा हा उपक्रम त्यांनी पालिकेचे तत्कालीन आयुक्त डाॅ. पुरूषोत्तम भापकर, तत्कालीन कार्यकारी अभियंता व शहर अभियंता सखाराम पानझडे, तत्कालीन कार्यकारी अभियंता डी. पी. कुलकर्णी व अफसर सिद्दीकी , तत्कालीन उद्यान अधिकारी जे. एम. भडके यांच्या सहकार्याने साकारला.

Aurangabad
Aurangabad : 'त्या 'उड्डाणपुलाखालील अंडरपास ओलांडताना कोंडी होणारच

लोककला उद्यानाची निर्मिती करताना रहाटकरांना लोककलेचे गाढे अभ्यासक अशोक परांजपे यांच्याकडून मोठी प्रेरणा  प्रेरणा मिळाली होती. मात्र उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्याआधीच त्यांचे निधन झाले. अशोक परांजपे यांनी महाराष्ट्रातील लोककलांचे दर्शन सातासमुद्रापार नेले होते. राज्यासह मराठवाड्यातील लोककलावंतांसाठी त्यांचे मोठे योगदान होते. विशेष म्हणजे ज्या भागात लोककला उद्यान आकार घेत होते. त्याच भागात त्यांचे वास्तव्य होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या उद्यानाला कै. अशोक परांजपे लोककला उद्यान हे नाव देण्यात आले आहे. लोककला उद्यानासाठी संशोधन कार्य आणि कलांचे शंब्दांकन जेष्ठ पत्रकार सारंग टाकळकर, तसेच सुबक शिल्प साकारण्यासाठी मुकुंद गोलटगावकर यांनी रहाटकर यांना सहकार्य केले होते.

Aurangabad
Aurangabad : सुनावणीआधीच बीड बायपासवरील पूल वाहतुकीस खुला कसा?

अकरा वर्षात पार वाटोळे

माजी महापौर विजया रहाटकर यांनी पालिका फंडातून कोट्यावधी रूपये खर्च करून या भागात भारत माता मंदिर, कवितेची बाग पाठोपाठ लोककला उद्यान साकार करण्याच स्वप्न पुर्ण केल. त्यांच्या स्वप्नातली वाट ध्येयापर्यंत पोहोचली. त्यांना त्या काळात समाधान देखील मिळालं. मात्र भारतमाता मंदिर, काव्यबाग प्रमाणेच लोककलेचं स्वप्न नभांगणी अटळ ठेवण्यासाठी लोककला उद्यानाकडे पालिकेतील कारभाऱ्यांनी म्हणावे तसे लक्ष दिले नाही. परिणामी आज सहकारनगरातील अशोक परांजपे लोककला उद्यानातील लोककलावंतांच्या म्युरल्स बेरंग झालेल्या आहेत. पावसाळा आणि हिवाळ्यात पाणी मुबलक असताना केवळ पाईपाअभावी झाडाफुलांना आणि बागेतील हिरवळीला पाणी देता येत नसल्याने ऐकेकाळी डोळ्यांना सुखावणारी ही बाग कोरडी पडली आहे.

Aurangabad
Aurangabad: नवीन पाणीपुरवठा प्रकल्पाचा कंत्राटदार अखेर ताळ्यावर

एक एकरच्या परिसरात असलेल्या या उद्यानाची निर्मिती १९८९ मध्ये झाली. आदर्श उद्यानात अपेक्षित असणार्‍या सर्वच गोष्टी या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या असल्या तरी, खेळण्यांच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे. विशेष म्हणजे या उद्यानातील महाराष्ट्रातील लोककला प्रकारातील लावणी, गोंधळ, वाघ्या-मुरळी, पोवाडा, भारूड, नंदीबैलवाला, लेझीम, वासुदेव, किर्तनकार, डोंबारी, शाहीर आणि अभंग यांची प्रात्यक्षिकांसह माहिती देणारे म्युरल्सचा रंग उडालेला असून, म्युरल्सचूया पाठीमागेच लोककलेची माहिती देणार्या फलकातील अक्षरे देखील पुसली गेलेली आहेत. शहराचे वैभव जपणाऱ्या या बागेला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या माळीच्या निवासस्थानाची देखील भयंकर दुरावस्था झालेली आहे. जॉगिंग ट्रॅकचीसुद्धा फुटतुट झालेली आहे.

Aurangabad
औरंगाबाद - जळगाव रस्त्याला प्रशासन का घाबरतेय? कोर्टाचा सवाल

काय चुकते नेमके कारभाऱ्यांचे 

● कोट्यावधी रूपये खर्चातून लोककला उद्यान, कवितेची बाग, भारतमाता मंदिर उभारण्यात आले. शहरात आलेल्या पर्यटकांनी या पर्यटनस्थळांना भेट द्यावी असा यामागील उद्देश होता. प्रत्यक्षात नियमित देखभाल आणि प्रचाराचा अभाव असल्याने ही पर्यटन स्थळे अडगळीत पडली.

● स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सायकल ट्रॅकसाठी जवळपास चार कोटी रूपये खर्च केले. मात्र आज त्याची उखडलेली अवस्था पाहुण कोट्यावधी रूपये वाया गेले. तितके कोटी इकडे खर्च केले असते, तर आज या बागामधून विदेशी पाहुण्यांना खर्या अर्थाने महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्वभुमी काय आहे , हे खऱ्या अर्थाने दाखवता आली असती.

● 'पर्यटन राजधानी’ औरंगाबाद शहरात महापालिकेने पर्यटकांच्या आनंदात भर घालण्यासाठी ही नवीन पर्यटनस्थळे विकसित केली. प्रचंड गाजावाजा, कोट्यवधी रूपयांचा खर्च आणि उद्घाटन झाल्यानंतर नेहमीप्रमाणे सोयीस्कर दुर्लक्ष हा क्रम कायम राहिला. परिणामी, कवितेची बाग, लोककला उद्यान, भारतमाता मंदिर यांची पूर्ण वाताहत झाली. पर्यटक दूरच; पण, शहरातील नागरिकांनाही या पर्यटनस्थळांची माहिती नाही. औरंगाबाद शहराचा ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेश झाल्यानंतर या प्रकल्पांच्या देखभालीकडे लक्ष देणे गरजेचे होते.

● विदेशी पाहुण्यांच्या वाटांवर केवळ उत्तम रस्ते, आकर्षक सुशोभिकरण, रंगरंगोटी, विद्युत रोषणाई आणि वाॅलपेंटींग,  यातून शहर चकचकीत केल्याचा भास निर्माण केला जात आहे. हे सर्व बघुन त्यांना शहराविषयी भुरळ पडेल असा कारभार्यांचा दृढ समज आहे. 

● प्रत्यक्षात ‘स्मार्ट सिटी’साठी प्रशासनाने आश्वासक पाऊल टाकले तरच शहराचा कायापालट शक्य आहे. औरंगाबाद जिल्ह्याला प्राचीन वारसा लाभला आहे. जागतिक वारसास्थळ असलेल्या अजिंठा-वेरूळ लेणी, बीबी का मकबरा, सोनेरी महल, औरंगाबाद लेणी, पानचक्की आदी मार्गावर विदेशी पाहुण्यांना आकर्षित करण्यासाठी आज जो कारभार्याःचा आटापिटा सुरू आहे. अशी तत्परता पर्यटकांबाबत दाखवली जात नाही.

●ही स्थळे पाहणारा पर्यटक औरंगाबाद शहरात मुक्काम करतो. साहजिकच औरंगाबाद शहराचा फेरफटका मारण्यासाठी तो उत्सुक असतो. पर्यटकाने फक्त पर्यटनस्थळे पहावी. स्थानिक व्यवस्थेची माहिती घेऊ नये अशी काहीजणांची प्रांजळ धडपड असते. कारण शहरात फेरफटका मारताना पर्यटकाला नानाविध समस्यांचा सामना करावा लागणार असतो. कचऱ्याचे ढीग, तुंबलेले नाले, अनियंत्रित वाहतूक, मार्गदर्शक केंद्रांचा अभाव अशा परिस्थितीत पर्यटक शहर पाहू शकत नाही. या परिस्थितीत ‘पर्यटन राजधानी’चे गोंडस बिरूद मिरवणाऱ्या शहरात पर्यटकांची प्रचंड निराशा होते. 

● जगभरातील पर्यटक शहरात नियमित येत असल्याने सुशोभित चौक, विकसित उद्याने, एंटरटेन्मेंट पार्क, स्थानिक कलादर्शन अशी कुठलीही सुविधा अस्तित्वात नाही. 

● महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व महापालिका प्रशासन यांच्या विचारातून सहकारनगरमध्ये लोककला उद्यान साकारण्यात आले. महाराष्ट्रीय परंपरा व लोककलांची माहिती देणारे उद्यान निश्चितच खूप आकर्षक आहे. या उद्यानात पर्यटकांनी फेरफटका मारणे अपेक्षित आहे; मात्र मागील आठ वर्षात पर्यटनदृष्ट्या प्रयत्न करण्यात आले नाही. उद्यानाची निगराणी नसल्याने शिल्पाकृतींचे नुकसान झाले. नियमित देखरेख नसल्याने उद्यानाला बकालपण आले आहे. 

● ज्योतीनगर येथील ‘कवितेची बाग’ हा राज्य पातळीवरील भन्नाट प्रयोग होता. नामवंत कवींच्या गाजलेल्या कवितांचे शिल्प उभारण्याची कल्पना अफलातून आहे. महाराष्ट्रीय साहित्य-संस्कृतीचे दर्शन घडवणारी ही बाग अडगळीत आहे. सभोवताली साचलेला कचरा आणि सुविधांचा अभाव असलेली कवितेची बाग कुठे आहे याची शहरवासीयांनाही माहिती नाही. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com