'टेंडरनामा'च्या वृत्तानंतर तहसिलदारांकडून अधिकाऱ्याची कान उघाडणी; रस्ता 8 दिवसांत मोकळा करा

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेकटा परिसरातील गट क्रमांक - ११८ मधून गट क्रमांक ११९, ६८, ६५, ६७, ६४ या शेतांकडे जाणार्‍या बंधाऱ्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी तातडीने उप अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयातून मोजणी अहवाल मिळवा, बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूने दहा फुटाचा लवकरात लवकर रस्ता मोकळा करा, असे स्पष्ट आदेश तहसिलदार रमेश मुंडलोड यांनी मंडळ अधिकारी गोरे आणि तलाठी कृष्णा घुगे यांना मंगळवारी दिले. 'टेंडरनामा'च्या वृत्तानंतर सर्व संबंधित शेतकऱ्यांना नोटीसा बजावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

Sambhajinagar
Nashik : मंत्री दादा भुसेंच्या पीएविरोधात आमदार कोकाटेंनी का थोपटले दंड?

शेकटा गावातील गट क्रमांक ११८ मधून गट क्रमांक ११९, ६८,६५,,६७,६४ या शेतांकडे जाणार्‍या बंधाऱ्यावर गट क्रमांक -११८ चा जमीन मालक बाबुराव रामभाऊ वाघ याने बंधाऱ्यावर अतिक्रमण करून अनेक वर्षांपासून वापरात असलेला वहिवाटीचा रस्ता गिळंकृत केल्याचा 'टेंडरनामा'ने पर्दाफाश केला. त्यानंतर प्रतिनिधीने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांसह उप विभागीय अधिकाऱ्यांची या प्रकरणी भेट घेतली व आता तुम्हीच या प्रकरणात स्वत: लक्ष घालावे व या शेतरस्त्याचा गुंता सोडवावा, अशी विनंती करत पाठपुरावा केला. यानंतर सर्व संबंधितांनी तहसिलदार रमेश मुंडलोड यांना नियमानुसार कारवाई करून रस्ता मोकळा करण्यासाठी निर्देश देण्यात आले.

Sambhajinagar
Samruddhi Mahamarg : अपघात टाळण्यासाठी प्रत्येक 25 किमीवर उभारणार रबरी गतिरोधक 

वरिष्ठांचे आदेश प्राप्त होताच तहसिलदार रमेश मुंडलोड यांनी मंडळ अधिकारी गोरे यांना समक्ष बोलावून या शेत रस्त्यांबाबत तुम्हाला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम १४३ नुसार रस्ता मोकळा करण्यासाठी २८ तारखेला आदेश दिले होते. संबंधित शेतकऱ्यांनी पोलिस बंदोबस्तासाठी शुल्क देखील भरले होते, पोलिसांचा फौजफाटा असताना आपण का रस्ता मोकळा केला नाही, असा थेट सवाल करताच गोरे यांची भंबेरी उडाली. त्यानंतर मुंडलोड यांनी नव्याने रस्ता मोकळा करण्याचे आदेश काढत आणि संबंधित सर्व शेतकर्‍यांना नोटीसा बजावण्याच्या सूचना देत आठ दिवसांत रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले.

शिवाय उप अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयातून मोजणी अहवाल आणि नकाशा घेऊन बंधाऱ्यावरील अतिक्रमण काढून रस्त्याचा तिढा सोडण्यासाठी हालचाली लवकर सुरू करा, असे आदेश तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी दिले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com