Sambhajinagar : जायकवाडी धरणात विस्थापित झालेल्या तेराव्या शतकातील हेमांडपंथी मंदिराची होणार पुर्नस्थापना

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जायकवाडी धरणात विस्थापित झालेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील व पैठण तालुक्यातील शेवता येथील तेराव्या शतकातील महादेव मंदिराची पुर्नस्थापना करण्यासाठी राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाने प्रशासकीय व तांत्रिक मान्यता दिली असून, त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल छत्रपती संभाजीनगर येथील पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालकांनी तयार केला आहे. यात ३ कोटी ५६ लाख ९३ हजार ७४७ रूपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. पैकी मंदिराच्या पुनर्बांधणी कामासाठी २ कोटी ५६ लाख २ हजार ३५१ इतक्या रकमेचे टेंडर काढण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. सद्यस्थितीत लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागली असल्यामुळे निवडणूकीची आचारसंहिता संपल्यानंतर सरकारी नियमानुसार टेंडरची कार्यवाही पूर्ण करून मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात येईल, असे पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक जया वहाने यांनी "टेंडरनामा" प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Sambhajinagar
Sambhajinagar : झाडाझडती सुरू, बडे मासे अडकणार; 2019 पासूनच्या दस्तनोंदणीच्या चौकशीचे आदेश

येथील महादेव मंदिराच्या पुर्व उभारणीच्या कामाचा सविस्तर प्रकल्प विकास आराखडा व अंदाजपत्रक मे.छत्रपती संभाजीनगर येथील ज्योतिर्मय आर्किटेक्टस् यांच्याकडून तयार केल्याचेही त्या म्हणाल्या. 

काय आहे प्रकल्प अहवालात

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील शेवता व सावखेडा ही गावे पैठण शहराच्या उत्तर - पश्चिमेस २० कि.मी. अंतरावर गोदावरीच्या उत्तर तिच्यावर होती. जायकवाडी प्रकल्प योजनेतील पाणलोट क्षेत्राखाली सदर गावं येत असल्यामुळे सदर गावांचे स्थलांतर करण्यात आले. गावाच्या स्थलांतरासोबतच पाणलोट क्षेत्रात विस्थापित होणाऱ्या १३/१४ व्या शतकातील हेमांडपंथी मंदिराच्या प्रकल्पात बुडणाऱ्या या मंदिराच्या वास्तुंचे स्थलांतर पुनर्बांधणी करण्याच्या दृष्टीकोनातून वर्ष १९७३ या वर्षात छत्रपती संभाजीनगर येथील सोनेरी महाल परिसरात तेथील मंदिराच्या वास्तू स्थलांतरित करण्यात आल्या होत्या. सर्वप्रथम शेवता येथील मंदिराचे तद्नंतर सावखेडा येथील मंदिराचे स्थलांतराचे काम पूर्ण करण्यात आले होते. गेली अनेक वर्षे सांस्कृतिक वारसा आणि परंपरा कायम ठेवल्याचा अभिमान असणारी या गावातील ऐतिहासिक वास्तू जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आल्यामुळे सदर वास्तू कायम स्वरूपात नष्ट होण्याच्या मार्गावर होती. हा समृध्द वारसा जिवंत ठेऊन पुढील पिढीस प्रेरणादायी होण्याच्या दृष्टीने जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विस्थापित झालेली मंदिरे पुरातत्व विभागाकडुन सोनेरी महल परिसरात हलविण्यात आली होती. 

Sambhajinagar
Mumbai Metro : अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्राची मेट्रो-1 मधून का झाली गच्छंती?

मराठा स्थापत्य केलेचं प्रतिनिधीत्व करणारं हेमाडपंथी मंदिर 

जायकवाडी पाणलोट क्षेत्रातून वर्ष १९७३ या काळात विस्थापित करण्यात येऊन शेवता व सावखेडा येथील ही शिव मंदीरे मराठा स्थापत्य कलेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हेमाडपंथी प्रकारात असून शेवता येथील मंदिराची रचना प्रवेश मंडप, अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे. मंदिराचे स्तंभ देवकोष, द्वारशाखा या कलाकुसरीनी युक्त आहेत.तसेच सावखेडा येथील मंदिर हे त्याच्या विपूल कोरीव खांबामुळे वैशिष्ट्यपूर्ण आहे. एकंदरीत सदरील वास्तू अवशेष हे तत्कालीन स्थापत्य शैलीच्या वैभवाची साक्ष देणारी आहे. पुरातत्व विभाग या विभागाकडून जायकवाडी पाणलोट क्षेत्रातून स्थलांतरित करण्यात आलेले स्मारकाचे स्थलांतर हे महाराष्ट्रात प्रथमच बहुदा भारत आणि आशिया खंडात सुध्दा अशाप्रकारचे स्थलांतर दुसर्यांदा केले असावे , असा पुरातत्व विभागाने दावा केला आहे.

का होणार मंदिरांची पुर्नबांधणी

सद्य:स्थितीत जायकवाडी पाणलोट क्षेत्रातून पुनर्वसित करण्यात आलेल्या शेवता व सावखेडा येथील महादेव मंदिरांचे अवशेष सोनेरी महाल परिसरात ठेवण्यात आले असून सद्य:स्थितीत ठेवण्यात आलेल्या अवशेषांची उन, वारा, पाऊस यामुळे झीज होत असून भविष्यात मंदिर अवशेष नामषेश होण्याची भीती नाकारता येत नाही. तसेच काही असामाजिक तत्वांकडुन मंदिर अवशेषांची नासधुस करण्याचे प्रकार घडत आहेत. मंदिरांचे पुर्नबांधणीचे काम करणेबाबत सोनेरी महाल परिसरात भेट देणार्या पर्यटकांकडुन तसेच समाज माध्यमातून पुरातत्व विभागाकडे तक्रारी व वारंवार विचारणा केली जात होती.

Sambhajinagar
Mumbai : नाल्यात टाकण्यात येणारा कचरा रोखण्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

इतक्या रकमेचे अंदाजपत्रक

उपरोक्त बाबींचा विचार करता जायकवाडी पाणलोट क्षेत्रातून विस्थापित करून आणलेल्या मंदिर अवशेषांचे पुर्नवैभव तसेच पर्यटकांच्या अभ्यासाच्या दृष्टीकोनातून सोनेरी महाल परिसरात विखुरलेल्या गेलेल्या शेवता येथील महादेव मंदिराच्या पुर्व उभारणीच्या कामाचे सविस्तर प्रकल्प विकास आराखडा तयार करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील मे. ज्योतिर्मय आर्किटेक्टस् यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या वतीने अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.सदर अंदाजपत्रकात सद्यस्थितीत सोनेरी महाल परिसरातील पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेल्या उत्तर भागातील टेकडीवर मंदिर पुर्नबांधण्याचे काम प्रस्तावित केले असून, त्यामध्ये सद्यस्थितीत असलेल्या मंदीराच्या अवशेषांची पुर्नबांधणी करणे त्याशिवाय उपलब्ध नसलेले मंदिर अवशेष नव्याने तयार करून पुर्नबांधणी करणे तसेच मंदिर परिसराचा सर्वांगिण विकास करणे इत्यादी बाबींचा समावेश असलेले अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.

आचारसंहितेचा फटका

छत्रपती संभाजीनगर येथील पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक कार्यालयामार्फत शेवता येथील महादेव मंदिराच्या पुर्नबांधणी करण्याच्या कामासाठी ३ कोटी ५६ लाख ९३ हजार ७४७ इतक्या रकमेच्या जतन दुरुस्ती कामाच्या अंदाजपत्रकास शासनाची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता प्राप्त झाली असून या विभागाकडुन शेवता येथील महादेव मंदिराच्या पुर्नबांधणी कामाचे २ कोटी ५६ लाख २ हजार ३५१ इतक्या रकमेचे टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. सद्यस्थितीत लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागली असल्यामुळे निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर सरकारी नियमानुसार टेंडरची कार्यवाही पूर्ण करून शेवता येथील मंदिराचे पुर्नबांधणीचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे "  टेंडरनामा " प्रतिनिधीशी बोलतांना पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक जया वहाने यांनी सांगितले.

(जायकवाडी धरणात या पाण्याखाली आहे प्रकल्पग्रस्त शेवता गावातील मंदिर. धरणाची पातळी खोल गेल्यावर उघडे पडते मंदिर)

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com