Dapoli
DapoliTendernama

रायगडातील दिवेआगार येथे 5 एकरवर सुपारी संशोधन केंद्र; साडेपाच कोटी निधी

मुंबई (Mumbai) : रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथे डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत सुपारी संशोधन केंद्र उभारण्यास कृषी विभागाने मान्यता प्रदान केली असून, यासाठी 5 कोटी 64 लाख रुपये निधी खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

Dapoli
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंनी यवतमाळमध्ये काय केली मोठी घोषणा?

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत 27 सप्टेंबर रोजी यासंदर्भात बैठक पार पडली होती, या बैठकीत सुपारी संशोधन केंद्र दिवेआगार येथील 5 एकर जागेत उभारण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला होता. रायगड जिल्ह्यात सुपारीचे बागायती पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळावी यादृष्टीने सुपारी संशोधन केंद्र उभारले जावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आग्रही होते.

Dapoli
Mumbai : राज्याची वित्तीय शिस्त बिघडलेलीच; कंत्राटदारांचे 10 हजार कोटी का थकले?

या सुपारी संशोधन केंद्राच्या माध्यमातून सुपारीच्या बुटक्या तसेच अधिक दर्जेदार व अधिकचे उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित करणे, दिवे आगार व परिसरातील हवामानाचा विचार करून आंतरपिके घेण्याचे तंत्रज्ञान विकसित करणे, विकसित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन, रोजगार निर्मिती, रोपवाटिका उभारणे, कलमे विकसित करणे, परिसरातील गावांचा ग्रामविकास आराखडा तयार करणे असे अनेक उपक्रम राबविण्यात येतील. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com