Raigad: रातवडेत पादत्राणे, चर्मोद्योग क्लस्टर;केंद्राकडून 125 कोटी

Eknath Shinde
Eknath ShindeTendernama

मुंबई (Mumbai) : केंद्र सरकारने रायगड जिल्ह्यातील रातवड येथे चर्मोद्योग क्लस्टरला मंजुरी देऊन १२५ कोटीचा निधी दिला आहे. त्यामाध्यमातून चर्मोद्योगांसाठी एकीकृत सुविधा उपलब्ध होऊन रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे.

Eknath Shinde
शिंदेजी हे काय? ठाणे पालिकेच्या भुयारी गटार योजनेत 50 कोटींचा चुना

केंद्र सरकारच्या भारतीय पादत्राणे, चर्मोद्योग आणि साहित्या विकास कार्यक्रमाच्या उपयोजनेतून पादत्राणे आणि चर्मोद्योगासाठी हा विशाल समूह प्रकल्प करण्यात येणार आहे. ३२३ कोटींच्या या प्रकल्पासाठी १२५ कोटी रुपये केंद्र शासनाने मंजूर केले आहे. उर्वरित पायाभूत सुविधांच्या खर्चाला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी रायगड जिल्ह्यातील रातवाडा औद्योगिक क्षेत्राची निवड केली त्यातून सुमारे २५ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, त्याचबरोबर चर्मोद्योग करणाऱ्या उद्योगांसाठी एकीकृत सुविधा उपलब्ध होणार आहे.

Eknath Shinde
मुंबई तुंबली तरी Mumbai Metro नाही थांबणार; 'MMRDA'चा मोठा निर्णय

राज्यात विविध क्षेत्रात औद्योगिक मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असून नुकतेच उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ४० हजार कोटींच्या गुंतणूक प्रकल्पांना मान्यता दिली आहे. लेदर क्लस्टरसाठी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याची निवड केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com