Pankaja Munde
Pankaja Munde Tendernama
टेंडर न्यूज

PM Modi : भाजप नेत्या पंकजा मुंडेंना पंतप्रधानांकडून गिफ्ट!

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तनानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात (Budget) रेल्वे प्रकल्पांसाठी (Railway Projects) १३ हजार ५३९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळणार आहे.

गेल्या वर्षी मध्य रेल्वेला ७,२५१ कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला होता. यात ४६ टक्क्यांहून अधिक वाढ करण्यात आली आहे. यंदा मध्य रेल्वेच्या रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी १० हजार ६०० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.

यामध्ये सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १०, ११, १२ आणि १३ वर २४ डब्याची गाडी उभी करण्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्याकरिता २० कोटी रुपये, पनवेल - कळंबोली कोचिंग टर्मिनस फेज -१ टप्पा १ साठी १० कोटी, बडनेरा वंगण दुरुस्तीसाठी ४० कोटी, रत्नागिरी रोलिंग स्टॅक कारखान्यासाठी ८२ कोटी, रेल्वे मार्गिकेच्या नुतनीकरणसाठी १४०० कोटी, पुलांच्या व बोगद्यांच्या कामासाठी ११३ कोटी आणि सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशसाठी २३७ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

नवीन रेल्वे लाईन -

अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ २५० किमी- २०१ काेटी

वर्धा-नांदेड (व्हाया यवतमाळ-पुसद) २७०किमी - ६०० कोटी

धुळे - नंदुरबार ५० किमी - ११० कोटी

साेलापूर-उस्मानाबाद व्हाया तुळजापूर ८४ किमी - ११० काेटी

कल्याण- मुरबाड व्हाया उल्हासनगर २८ किमी - १०० कोटी

फलटण - पंढरपूर १५० किमी - २० कोटी

दुहेरीकरण -

कल्याण-कसारा ३ री रेल्वे लाईन- ६८ किमी- ९० कोटी

जळगाव-भुसावळ ४थी लाईन- २४ किमी- २० कोटी

वर्धा-नागपूर ३ री लाईन- ७६ किमी- १५० कोटी

वर्धा-बल्लारशहा ३ री लाईन- १३२ किमी- ३०० कोटी

इटासरी-नागपूर - २८०किमी- ३१० काेटी

पुणे-मिरज-लोढा दुहेरीकरण - ४६७किमी- ९०० काेटी

दौेण्ड-मनमाड दुहेरीकरण - २४७ किमी- ४३० कोटी

मनमाड-जळगाव ३री लाईन- १६०किमी- ३५० कोटी