Nagpur
Nagpur Tendernama
विदर्भ

Nagpur : कधी लागणार 36 लाखांचे 12 स्मार्ट ट्रॅफिक बूथ?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या स्मार्ट सिटी व्यवस्थापनाने बेंगळुरू येथे बघून शहरात स्मार्ट ट्रॅफिक बूथ तयार केले आहेत. पोलिस विभागामार्फत शहरात सुमारे 35 ठिकाणी अत्याधुनिक वाहतूक बूथ बसविण्यात येणार आहेत. पहिल्या तुकडीत पोलीस आयुक्त कार्यालयाला सुमारे 12 वाहतूक बूथ देण्यात आले आहेत.

सुशोभीकरण अंतर्गत शहरात लावणार होते बूथ

उपराजधानीत 21 आणि 22 मार्च रोजी प्रस्तावित जी-20 बैठकीमुळे अनेक सुविधांसह सुशोभीकरण केले जात आहे. अशा स्थितीत वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी स्मार्ट सिटीने उभारलेल्या अत्याधुनिक ट्रॅफिक बूथची मागणी पोलिस विभागाने केली आहे, मात्र हे बूथ उभारण्यासाठी मूलभूत सुविधा तयार करण्यासाठी कोणत्याही साधनांची व्यवस्था केली गेली नाही. अशा स्थितीत पोलिस आयुक्त कार्यालयाच्या मागील बाजूस पहिल्या टप्प्यातील 12 वाहतूक बूथ सुमारे 1 महिन्यापासून धूळ खात पडून आहेत. उघड्यावर ठेवल्याने बुथची अवस्थाही बिकट झाली आहे. यासंदर्भात माहितीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात केला असता, अधिकाऱ्यांनी फोन आणि मेसेजलाही प्रतिसाद दिला नाही.

जोधपूरच्या कंपनीने बूथ केले निर्माण : 

बंगळुरूच्या धर्तीवर स्मार्ट शहरातील महाव्यवस्थापक डॉ. शील घुले यांच्या संकल्पनेतून वाहतूक बूथ तयार करण्यात आले आहे. बूथमधील सुविधा आणि संरचना जोधपूरस्थित कंपनीने तयार केली आहे. प्रति बूथ सुमारे तीन लाख रुपये खर्च करून ते तयार करण्यात आले आहे. बूथच्या आत एकाच वेळी दोन जवानांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्ण बंदमुळे बूथच्या आतील तापमान बाहेरील तापमानापेक्षा सुमारे 2 ते 3 अंशांनी कमी होईल. हवेसाठी साध्या पंख्यासोबत एक्झॉस्ट फॅनही बसवण्यात आला आहे. बूथच्या आतील पोलिस कर्मचारी सार्वजनिक घोषणा प्रणालीद्वारे चालकांना सूचना देऊ शकतात.

डिजिटल कोडने होणार ऑपरेट

बूथ रिकामे असले कि बूथच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. असामाजिक तत्व रात्रीच्या वेळी बूथच्या आत पोहोचतात आणि अस्वच्छता आणि तोडफोड करतात. अशा परिस्थितीत भक्कम सुरक्षेच्या दृष्टीने डिजिटल कोडने काम करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. चौकाचौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला डिजिटल कोड दिला जाईल. कोडच्या आधारे फक्त पोलीसच बूथ उघडू आणि बंद करू शकतात. सौरऊर्जेवर चालणाऱ्या बुथमध्ये सेन्सरच्या मदतीने दिवे आणि पंखे आपोआप सुरू आणि बंद करता येतात.

अधिकाऱ्याशी संपर्क होऊ शकला नाही : 

पोलिस मुख्यालयाच्या उपायुक्त अश्विनी पाटील यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र उपायुक्त पाटील यांचाशी संपर्क झाला नाही. प्रशासकीयअधिकारी दावा करीत आहेत की, लवकरच स्मार्ट बूथ लावले जाईल, परंतू वास्तविक स्थिति पाहता समोर आले की, बूथची अवस्था बिकट होत चालली आहे. उघड्यावर बूथ धूळ खात पडले आहेत. त्यामुळे बुथांची वाईट अवस्था झाली आहे.