Nitin Gadkari
Nitin Gadkari Tendernama
विदर्भ

मेरा शहर बदल रहा है...; ‘रोप-वे’ बस सुरू होणार

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : पंचवीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रीत मोठे खेडे अशी हेटाळणी होत असलेल्या नागपूर शहर झपाट्याने बदलले आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी उड्डाण पुलांचे जाळे शहरभर विणले असून मेट्रो रेल्वेसुद्धा धावू लागली आहे आहे. यात आता रोप-वे बसची लवकरच भर पडणार आहे.

प्रशस्त रस्ते, उड्डाणपुलामुळे नागपूर शहर आता ओळखायलाच येत नाही. काही वर्षांपूर्वी ज्यांनी नागपूर बघितले ते आता आले तर त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसू शकतो. आपण बघितलेले हे तेच शहर आहे का असा प्रश्न त्यांना पडू शकतो. नागपूरच्या सभोवताल दोन रिंग रोड झाले आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रवाशाला चुकल्यासारखे होते. नेमके कुठे जायचे हेच कळत नाही. इतर भागातून आलेल्या प्रवाशांना एखाही वस्ती वा घर शोधायचे असेल तर गुगल मॅप लावूनच फिरावे लागते. मेट्रो रेल्वेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्यालाही मंजुरी मिळाली आहे. नागपूर शहराच्या शेजारी असलेले तालुकेही मेट्रो रेल्‍वेने जोडण्यात येत आहे. त्यात आला रोप वे बसची भर पडणार आहे.

वाडी ते आरटीओ उड्डाणपूल तयार करताना रोप-वेबाबतही विचार करून जागा सोडवी अशा सूचना नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. हिंगणा टी-पाईंट ते जयप्रकाशनगर आणि पुढे पारडी या मार्गाने रोप-वेची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. वाडी तसेच आरटीओ उड्डाणपूलाच्या बांधकामाच्या भूमीपूजनप्रसंगी गडकरी यांनी ही माहिती दिली.

आऊटर रिंग रोडचे काम पूर्ण झाले असून वाडीपासून एमआयडीसीपर्यंत सिमेंट रस्त्यालाही मंजुरी दिली. काही दिवसांमध्येच काम सुरू होईल. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या जागेवर १८० कोटींचे ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटरचेही काम सुरू होईल. येथे हॉटेल पासून सारेच काही राहणार आहे. आरोग्य सेवेबाबतही शहर स्वयंपूर्ण झाले. कोरोनाच्या काळात ऑक्सिजन, व्हेंटीलेटरचा तुटवडा होता. अनेक जीव गेले. आज शहरात अनेक ऑक्सिजन प्लांट उभे झाले. व्हेंटिलेटरही मोठ्या प्रमाणात आहे. आमदार मेघे यांनी हिंगणा येथे एक हजार खाटांचे मेडिकल कॉलेज उभे केले. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांंना मोठी सुविधा होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.