Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Tendernama
विदर्भ

Devendra Fadnavis : नागपुरातील झोपडपट्टीधारकांना फडणवीसांनी दिली गुड न्यूज! डिसेंबरपर्यंत...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूर शहरातील झोपडपट्टीवासीयांना मालकी हक्काचे पट्टे वाटप येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले.

फडणवीस यांच्या हस्ते देवगिरी शासकीय निवासस्थानी अनधिकृत भूखंडाचे नियमितीकरण पत्र व झोपडपट्टी वासियांना पट्टे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 18 भूखंडाचे नियमितीकरणपत्र व 11 झोपडपट्टी धारकांना प्रातिनिधिक स्वरुपात पट्टे वाटप करण्यात आले. यावेळी नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी उपस्थित होते. 

शहरातील शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी मालकीच्या जागावरील झोपडपट्टीतील अतिक्रमण धारकांचे अतिक्रमित क्षेत्र नियमीत करून त्यांना स्थायी पट्टे वाटप करण्यासाठी महानगरपालिका, सुधार प्रन्यास तसेच महसूल विभागातर्फे संयुक्त मोहीम राबवावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. महानगरपालिका क्षेत्रात 426 झोपडपट्ट्या असून त्यापैकी 298

घोषित तर 128 अघोषित आहेत. सुधार प्रन्यासतर्फे 360 झोपडपट्टी वासियांना घरकुल पट्टे वाटपाचे काम प्राधान्याने पूर्ण केले आहे. मिश्र जागेवर असलेल्या 200 झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण शासनाच्या भूमापन विभागाने स्थानिक मोजणी करून तत्काळ संबंधित विभागांना अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

घरपोच नियमितीकरण पत्र

अनधिकृत भुखंडाचे नियमितीकरण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सुधार प्रन्यासला दिल्या होत्या. त्यापैकी 1 हजार 200 अनधिकृत भूखंडधारकांना नियमितीकरण पत्र पोस्टाद्वारे घरपोच पाठविण्यात येणार आहे. नियमितीकरणासाठी सुधार प्रन्यासतर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती सभापती तसेच खाजगी मालकीच्या जागावरील प्रन्यासतर्फे 360 झोपडपट्टी वासियांना मनोजकुमार सूर्यवंशी यांनी यावेळी दिली.