Nashik
Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : संस्कृत विद्यापीठासाठी नाशिकला मिळणार 300 कोटी; जिल्हा प्रशासनाकडून जागेचा शोध

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय विभागाने नाशिक येथे संस्कृत विद्यापीठ उभारण्यासाठी जागा मिळावी, असे पत्र नाशिक जिल्हा प्रशासनाला दिले आहे. जिल्हा प्रशासनाकडून जागा उपलब्ध करून दिल्यास या संस्कृत विद्यापीठासाठी पहिल्या टप्प्यात ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक नाशिक येथे होऊ शकणार आहे.

खासदार हेमंत गोडसे यांनी या विद्यापीठासाठी नाशिक तालुक्यातील शिलापूर येथील इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब लगतची ४० एकर जागा प्रस्तावित केली असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे या विद्यापीठासाठी जागा निश्चित असल्याने लवकरच नाशिकला संस्कृत विद्यापीठ मिळणार आहे.

संस्कृत भाषेला देशात आणि देशाबाहेरही अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून संस्कृत भाषा जतन करण्यासाठी हवे तसे प्रयत्न होत नसल्याने आज मितीस संस्कृत भाषा अडगळीला पडल्याची चित्र समोर येत आहे. केंद्र सरकारकडून सध्या संस्कृत भाषेला प्रोत्साहन दिले जात आहे. त्याचाच एक म्हणून संस्कृत भाषेचे जतन व्हावे, भाषा सामान्यांपर्यंत पोहचावी यासाठी केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय विभागाकडून महाराष्ट्रात जागेचा शोध सुरू आहे.

पहिल्या टप्प्यात मुंबईत पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याने त्यांचा इतर ठिकाणी जागेचा शोध सुरू असतानाच नाशिक येथे जागा उपलब्ध होऊ शकते, असे खासदार हेमंत गोडसे यांनी लक्षात आणून  केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय विभागाने नाशिक जिल्हा प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. योग्य आणि विस्तीर्ण जागा उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला पत्र पाठविले आहे.

यातूनच जिल्हा प्रशासनाने शिलापूर शिवारातील सुमारे चाळीस एकर जागेची पाहणीही केलेली आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून पारंपारिक भारतीय ज्ञान प्रणालींना प्रोत्साहन देण्यात येणार असून शैक्षणिक उत्कृष्टतेला चालना मिळणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.