पुणे (Pune) : आगामी कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी रेल्वेकडून पुण्याहून १२ जादा गाड्या सोडण्यात येतील.
इतर गाड्यांमधील प्रवाशांची गर्दी कमी व्हावी आणि कुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी या उद्देशाने पुणे-मऊ कुंभमेळा विशेष रेल्वे (क्रमांक ०१४५५) ८, १६ व २४ जानेवारी, तसेच ६, ८ व २१ फेब्रुवारी या दिवशी सुटेल. सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी ही गाडी रवाना होईल. ती मऊला दुसऱ्या दिवशी रात्री दहा वाजता पोहचेल.
मऊ-पुणे कुंभमेळा विशेष रेल्वे (०१४५६) मऊ येथून रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी सुटेल. ती तिसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजून ४५ मिनिटांनी पुण्याला पोहचेल. ही गाडी ९, १७ व २५ जानेवारी, तसेच ७, ९ व २२ फेब्रुवारीला धावणार आहे.
दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, मनमाड, जळगाव, भुसावळ, खांडवा, तलवडिया, छनेरा, खिरकीया, हरदा, बानापुरा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छियोकी, चुनार, वाराणसी, शहागंज आणि आझमगड आदी स्थानकांवर या गाडीला थांबा असेल.