Shivajinagar Station Local
Shivajinagar Station Local Tendernama
पुणे

Pune : शिवाजीनगरहून सुटली लोणावळा लोकल; असे आहे वेळापत्रक...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : Shivajinagar Railway Station शिवाजीनगर रेल्वे स्थानकावरच्या नव्या फलाटाचे (Local Terminal) उद्‍घाटन सोमवारी झाले. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते दुपारी दीड वाजता शिवाजीनगरहून लोणावळाला (Shivajinagar To Lonaval Local) जाणाऱ्या लोकलला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

दिवसातून चार वेळा या फलाटावरून लोणावळ्यासाठी लोकल सुटणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. ३३० मीटर लांबीच्या फलाटसाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा खर्च आला.
शिवाजीनगर रेल्वे स्थानकावर लोकलसाठी स्वतंत्र फलाट बांधण्याचा निर्णय २०१८ मध्ये घेण्यात आला. त्याचे काम देखील सुरू झाले. २०१९ नंतर मात्र या कामास ब्रेक लागला. २०२२ मध्ये पुन्हा कामास सुरवात झाली. २०२२ च्या डिसेंबरअखेर हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, त्यालाही विलंब लागला. जानेवारी २३ मध्ये काम पूर्ण झाले अन् सोमवारी याचे उद्‍घाटन झाले.

खासदार गिरीश बापट यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. उद्‍घाटनप्रसंगी आमदार सुनील कांबळे, माजी नगरसेवक गणेश बिडकर, खासदार बापट यांचे चिरंजीव गौरव बापट, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बी. के. सिंग यांची प्रमुख प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक डॉ. स्वप्नील नीला, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता ज्वेल मॅकेन्झी, विजय दडस आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शिवाजीनगर स्थानकावरून वेळ
- सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांनी सुटेल, लोणावळा येथे सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी पोचेल.
- सायंकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी सुटेल, लोणावळा येथे ६ वाजून ३८ मिनिटांनी पोचेल.
- रात्री ८ वाजून ३५ मिनिटांनी सुटेल, लोणावळा येथे ९ वाजून ५० मिनिटांनी पोचेल.
- रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी सुटेल, लोणावळा येथे पोचेल १० वाजून २२ मिनिटांनी

लोणावळा स्थानकावरून वेळ
- दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुटेल, शिवाजीनगरला सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी पोचेल.
- सायंकाळी ७ वाजता सुटेल,शिवाजीनगरला ८ वाजून २५ मिनिटांनी पोचेल.
- सायंकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी सुटेल, शिवाजीनगर ला ८वाजून ५५ मिनिटांनी पोचेल.
- रात्री १० वाजून ३५ मिनिटांनी सुटेल, शिवाजीनगरला ११ वाजून ५० मिनिटांनी पोचेल.