Devendra Fadnavis Tendernama
पुणे

PMRDA : मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचा पीएमआरडीएला विसर पडलाय का?

Pune : ‘पीएमआरडीए’च्या संपूर्ण हद्दीत नियमावली लागू करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मुख्यमंत्र्यांनी मान्यता देऊनही पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (PMRDA) अंमलबजावणी होत नाही.

त्यात तातडीने लक्ष घालून प्राधिकरणाच्या हद्दीत एकात्मिक बांधकाम विकास नियंत्रण व प्रोत्साहनपर नियमावली (यूडीसीपीआर) लागू करण्याचा आदेश ‘पीएमआरडीए’ला द्यावा, अशी मागणी नागरी हक्क संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

‘पीएमआरडीए’च्या संपूर्ण हद्दीत नियमावली लागू करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे ‘पीएमआरडीए’ने हद्दीतील ८१४ गावांकरिता नियमावली लागू करणे अपेक्षित आहे. तसेच, मेट्रोच्या ५०० मीटरच्या परिसरातील ‘टीओडी’ झोनमध्येही त्याची अंमलबजावणी केली पाहिजे.

परंतु, ‘पीएमआरडीए’चे अधिकारी निर्णयाचा वेगवेगळा अर्थ काढून बांधकाम परवानगीचे प्रस्ताव अडविण्याचे काम करत आहेत. त्यातून हित साधण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे तातडीने याची दखल घेऊन नियमावली संपूर्ण हद्दीसाठी लागू करण्याबाबतचा आदेश ‘पीएमआरडीए’ला द्यावा, अशी मागणी संस्थेचे सुधीर कुलकर्णी यांनी निवेदनात केली आहे.