पुणे (Pune) : वाहतूक कोंडीवर मात्रा ठरणाऱ्या पुणे मेट्रोने सहा मार्च रोजी तीन वर्षांचा प्रवास पूर्ण केला.
सहा मार्च २०२२मध्ये मेट्रोची प्रवासीसेवा सुरू झाली. या तीन वर्षांत मेट्रोने पाच कोटी ९८ लाख ७६ हजार ७४३ प्रवाशांनी प्रवास केला. तीन वर्षांत मेट्रोचा विस्तार झाल्याने पुणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा वेगवान व कार्यक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे.
मार्गिका कधी सुरू झाली :
कॉरिडॉर एक :
पीसीएमसी ते फुगेवाडी : ६ मार्च २०२२
फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय : १ ऑगस्ट २०२३
जिल्हा न्यायालय ते स्वारगेट : २९ सप्टेंबर २०२४
कॉरिडॉर दोन :
वनाज ते गरवारे महाविद्यालय : ६ मार्च २०२२
गरवारे महाविद्यालय ते जिल्हा न्यायालय : १ ऑगस्ट २०२३
जिल्हा न्यायालय ते रूबी हॉल क्लिनिक : १ ऑगस्ट २०२३
रूबी हॉल क्लिनिक ते रामवाडी : ६ मार्च २०२४
प्रवासी संख्येत वाढ :
१. मेट्रोसेवा सुरू झाल्यावर पहिल्या वर्षी २१,४७,७५७ प्रवाशांकडून प्रवास
२. मार्गिकेचा विस्तार जिल्हा न्यायालयापर्यंत झाला, प्रवासी संख्या १,२३,२०,०६७
३. रूबी हॉल क्लिनिक ते रामवाडी विस्तार, प्रवासी संख्या १,६९,६९,५५४
४. एकूण प्रवासी संख्या ५,९८,७६,७४३
५. प्रवासी उत्पन्न : ९३ कोटी
या दिवशी सर्वाधिक प्रवासी
१५ सप्टेंबर २०२४ : २,२५,६४४, उत्पन्न : २७,९५,४३२
१७ सप्टेंबर २०२४ : ३,४६,६३३, उत्पन्न : ५४,९२,४१२
२३ डिसेंबर २०२३ पर्यंत : १ कोटी प्रवासी
फेज-१
पीसीएमसी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी (३३.१ किमी) मार्ग वापरात आहेत, तर पीसीएमसी ते निगडीचे काम सध्या सुरू आहे. स्वारगेट ते कात्रज विस्तार (५.५किमी) टेंडर प्रक्रियेत आहे.
फेज-२ (नवीन मार्गिका)
- वनाज ते चांदणी चौक (१.१२ किमी, २ स्थानके)
- रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (११.६३ किमी, ११ स्थानके)
- खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी (३१.६४ किमी, २८ स्थानके)
- नळ स्टॉप ते वारजे-माणिकबाग (६.१२ किमी, ६ स्थानके)
- हडपसर ते लोणी काळभोर (१६.९२ किमी, १४ स्थानके) आणि हडपसर ते सासवड रस्ता (५.५७ किमी, ४ स्थानके)
(केंद्र सरकारकडून अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत)