Devendra Fadnavis Tendernama
मुंबई

Maharashtra मध्ये ₹2.56 लाख कोटींची Mega Investment: 18 प्रकल्पांना मंजुरी, 1 लाख रोजगार

Green energy, EV, defence, electronics क्षेत्रात गुंतवणूक; राज्यभर औद्योगिक वाढीला चालना

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): राज्यात 2.56 लाख कोटी रुपयांच्या 18 विशाल प्रकल्पांना मंजुरी देत सरकारने मोठा गुंतवणूक आणि रोजगार बूस्ट दिला असून, 1 लाखांहून अधिक रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.

राज्यात औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती घडवून आणण्यासाठी सरकारने ₹2,56,137 कोटींच्या 18 विशाल व अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.

या प्रकल्पांमधून सुमारे 1 लाखांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री Eknath Shinde, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या गुंतवणुकीत सोलर सेल, ग्रीन स्टील, ग्रीन अमोनिया, इलेक्ट्रिक वाहन, लिथियम-आयन बॅटरी, संरक्षण व अवकाश तंत्रज्ञान यांसारख्या उच्च तंत्रज्ञान क्षेत्रांवर भर देण्यात आला आहे. राज्यातील विविध भागांमध्ये हे प्रकल्प उभारले जाणार आहेत.

नाशिकमध्ये Virtuoso Compressors 800 कोटींची गुंतवणूक करणार असून, 500 रोजगार निर्माण होतील. अमरावतीमध्ये Tembo Defence 1000 कोटींच्या गुंतवणुकीसह प्रकल्प उभारणार आहे. पुण्यातील Shirur येथे Jabil Circuit 1500 कोटींची गुंतवणूक करून 3000 रोजगार निर्माण करेल.

गडचिरोलीत Hariom Pipe Industries 3135 कोटींच्या गुंतवणुकीतून 8000 रोजगार निर्माण करणार आहे, तर Rashmi Metallurgical Industries 40,000 कोटींच्या गुंतवणुकीसह 20,000 रोजगार देणार आहे. भंडाऱ्यात Ashok Leyland 10,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे.

नागपूरमध्ये ACME Cleantech Solutions 11,400 कोटींच्या प्रकल्पातून 7000 रोजगार निर्माण होतील. रायगड/पालघरमध्ये ACME चा ग्रीन अमोनिया प्रकल्प 37,800 कोटींचा असून 4500 रोजगार देईल.

सर्वात मोठी गुंतवणूक Essar Exploration and Production कडून रायगडमध्ये ₹56,852 कोटींची होणार असून त्यातून 25,000 रोजगार निर्माण होतील.

या प्रकल्पांमुळे कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होण्यासोबतच MSME क्षेत्रालाही मोठा फायदा होणार आहे.

महत्त्वाचे मुद्दे

  • ₹2.56 लाख कोटींची गुंतवणूक मंजूर

  • 18 Mega Projects ला प्रोत्साहन

  • 1 लाख+ रोजगार निर्मिती

  • EV, Green Energy, Defence क्षेत्रावर भर

  • Essar ₹56,852 कोटी सर्वात मोठा प्रकल्प